Nawrisathi ukhane | नवरीसाठी नवीन उखाणे

नवरीसाठी नवीन उखाणे: एक सुंदर परंपरा!

Nawrisathi ukhane: लग्न हा एक अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण असतो आणि त्यात उखाणे हे एक महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक घटक आहे. नवरीसाठी नवीन उखाणे रचणे ही एक सुंदर परंपरा आहे जी तिच्या नवीन आयुष्यातील शुभेच्छा आणि आनंद व्यक्त करते.

जेव्हा लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम चालू होतात तेव्हा जोडप्यांना नाव घेण्याचा आग्रह केल्या जातो आणि तेव्हा आपल्याला एकही धड उखाणा आठवत नाही त्याच साठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Ukhane in marathi for bride, जे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि ज्यांचे लग्न होणार आहे अश्या आपल्या मैत्रिणींना पाठवू शकता जेणेकरून उखाणा घेतांना त्यांची फजिती होऊ नये, चला तर मग बघुयात नवीन उखाणे. 

उखाण्यांचे महत्त्व:

  • प्रेम आणि आदर दर्शवणे: उखाणे हे नवरीसाठी प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
  • आशीर्वाद देणे: उखाण्यांद्वारे नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जातात.
  • मनोरंजन: उखाणे हे लग्नाच्या कार्यक्रमात मनोरंजनाचा एक उत्तम स्त्रोत आहेत.
  • कल्पकता आणि विनोद: उखाण्यांद्वारे कल्पकता आणि विनोदाची भावना व्यक्त होते.
Nawrisathi ukhane

Nawrisathi ukhane | नवरीसाठी  नवीन उखाणे

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,

 ……..रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले, 


 प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात, 

 …….रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.


नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,  

………रावां सोबत आली मी सासरी. 


 गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, 

 …….रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट. 


 शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, 

 आता………….राव माझे जीवनसाथी. 


 आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, 

 ……….रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश. 


 मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, 

 ……..…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. 


 गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, 

 ……….रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी. 


 पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, 

 ………..रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन. 


 “नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद , 

 ……….रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!” 


 “दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, 

 ………….चे नाव घेते तुमच्या साठी!” 


 मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, 

 ……… रावांचे हेच रुप मला फार आवडले, 


 आज सारे सुख माझ्या दारी दाटले, 

 ……….रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले. 


 मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, 

 …….राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा. 


 सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, 

 ……रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

तुम्हाला खालील उखाणे सुद्धा वाचायला आवडतील:

Sharing Is Caring:

Leave a Comment