मराठी किवर्ड रिसर्च साठी मोफत टूल्स | Marathi keyword research tools

मराठी ब्लॉगर्सना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मराठी किवर्ड रिसर्च कसे , आणि हा प्रश्न पडणे साहजिकच आहे कारण जसे टूल्स इंग्रजी किवर्ड शोधण्यासाठी उपलब्ध आहेत तसे मराठी किवर्ड शोधण्यासाठी उपलब्ध नाहीत, अश्या वेळेस आपल्याला आपली विवेक बुद्धी आणि काही युक्त्या/क्लुप्त्या वापरून आपली पोस्ट लिहिण्यासाठी किवर्ड शोधावे लागतात, आणि त्यातही फ्री मध्ये किवर्ड शोधणे म्हणजे थोडेसे अवघड वाटते पण चिंता नसावी, आज आपल्या मराठीकंटेंट वर मी तुम्हाला सांगणार आहे की मोफत मराठी किवर्ड रिसर्च कसे करायचे, चला तर मग,

मराठी किवर्ड रिसर्च

मराठी किवर्ड शोधून त्यावर आर्टिकल लिहिणे हे आपल्या आजच्या पोस्टचे उद्दिष्ट असेल आणि आता आपण त्यासाठी विविध मोफत टूल्स (सामग्री) बघू,

1. उबरसजेस्ट (ubersuggest)

Ubersuggest हे निल पटेल यांचे टूल असून या टूल च्या मदतीने आपण आपल्या मराठी किवर्ड ला असलेली मागणी तपासू शकतो आणि त्या किवर्ड वर किती स्पर्धा आहे ते बघून त्यावर छान असे आर्टिकल लिहू शकतो, पण या टूल द्वारे आपण दिवसात तीनच किवर्ड बघू शकतो जे एका नवीन ब्लॉगर साठी पुरेसे असते, आता बघुयात यावर आपण किवर्ड कसे शोधू शकतो,

समजा माझ्या डोक्यात एक किवर्ड आहे ज्यावर मला पोस्ट लिहायची आहे, उदाहरणार्थ : वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर हा किवर्ड मी उबरसजेस्ट मध्ये टाकून सर्च करेन आणि मला त्या किवर्ड च्या संबंधित सर्व माहिती मिळेल, समजून घेण्यासाठी खलील स्क्रीनशॉट बघा.

मराठी किवर्ड रिसर्च


मराठी किवर्ड रिसर्च


उबरसजेस्ट मध्ये किवर्ड शोधण्यासाठी काही टिप्स

1. उबरसजेस्ट मध्ये सर्च करण्याआधी सर्च बार च्या खाली जी भाषा असते ती नेहमी English/India ठेवा जरी तुम्ही मराठी किवर्ड शोधत असाल तरीसुद्धा, 

2. वरील स्क्रीनशॉट्स मध्ये तुम्हाला हिरव्या रंगात जे किवर्ड दिसताहेत त्यांची seo difficulty(SD) ही 0 ते 35 दरम्यान असेल याचा अर्थ असा आहे की त्या किवर्ड वर स्पर्धा कमी आहे, पण त्याबद्दल लोक जाणून घेण्यास किती उत्सुक आहेत हे आपल्याला VOLUME या तक्त्यात समजते, जर volume सुद्धा अपेक्षेप्रमाणे असेल आणि स्पर्धासुद्धा कमी असेल अश्याच किवर्ड्स वर आपण आर्टिकल लिहावे, यामुळे तुमचा ब्लॉग गुगल वर लवकर रॅंक होण्याची संधी वाढते.

अश्याप्रकारे तुम्ही तुमचा नवीन ब्लॉग ubersuggest या मोफत टूल चा वापर करून गुगल वर रॅंक करू शकता, आजसाठी इतकंच पण जर तुम्हाला अजूनही ubersuggest बद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलं आहे, आणि जर तुम्हाला अश्याच टूल्स बद्दल अजून माहिती हवी असेल तर तेसुद्धा कॉमेंट मधून नक्की कळवा, मी भेटतो तुम्हाला अश्याच एका नवीन मोफत टूल सोबत तोपर्यंत, मराठीकंटेंट ला भेट देत राहा, महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहचवत राहा, पोस्ट वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

हेही वाचा: SEO म्हणजे काय ? | SEO कशाप्रकारे करतात

Sharing Is Caring:

Leave a Comment