Nawardevasathi ukhane | नवरदेवासाठी उखाणे

Nawardevasathi ukhane

Nawardevasathi ukhane

नवरदेवासाठी उखाणे: प्रेमाचे आणि विनोदाचे मिश्रण!

Nawardevasathi ukhane: लग्न हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो आणि नवरा-नवरीसाठी हा क्षण खास असतो. लग्नामध्ये अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात आणि त्यातील एक म्हणजे उखाणे. उखाणे हे प्रेमाचे आणि विनोदाचे मिश्रण आहे ज्याद्वारे नवरदेव आणि नवरी आपापले मनोगत व्यक्त करतात.

या लेखात, आपण नवरदेवासाठी विविध प्रकारची उखाणे पाहणार आहोत. यात सोपी, विनोदी, रोमँटिक आणि अगदी चावट उखाणेही समाविष्ट आहेत. आपण हे उखाणे लग्नात वापरू शकता आणि नवरा-नवरीला आनंद देऊ शकता.

हे उखाणे सुद्धा वाचा:

आणखी काय आहे?

या लेखात, आपण नवरदेवासाठी उखाण्यांचे काही प्रकार आणि उदाहरणे पाहिली. आपण आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार उखाणे निवडू शकता.

याव्यतिरिक्त, आपण स्वतःची उखाणेही तयार करू शकता. थोडी कल्पकता आणि विनोदबुद्धी वापरून आपण नवरदेव आणि नवरीला आनंद देऊ शकता.

तर मग, काय वाट बघताय? आजच नवरदेवासाठी उखाणे निवडा आणि लग्नाला खास बनवा!

“स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान,

…चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,


काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,

… सोबत जीवनात मला आहे आनंद.


इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी

सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!.


अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,

…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.


हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी

सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!.


देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,

_______शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.


श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण,

______ ला सुखात ठेवीन हा माझी पण.


दासांचा दासबोध अनुभवाचा साठा

….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!.


संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका

…..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!.


नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड,

_____… राणी माझा तळहाताचा फोड.


आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन

सौ…..सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!.


नंदनवनात अमृताचे कलश,

_____… आहे माझी खुप सालस.


देवाला भक्त करतो मनोभारे वंदन,

_____… मुळे झाले संसाराने नंदन,


सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी

सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!.


भाजीत भाती मेथीची,

…______ माझी प्रितीची,


चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा

सौ…..चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!.


दही चक्का तुप,

____… आवडते मला खुप.


हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी,

____… झाली आता माझी सहचारिणी.

Sharing Is Caring:

Leave a Comment