हसायचे उखाणे | funny ukhane in marathi for female

हसायचे उखाणे

हसायचे उखाणे

हसायचे उखाणे: लग्नसमारंभ, संक्रांत व इतर समारंभात जोडप्याला आपल्या जोडीदाराचे नाव घेणे आपल्या इथे अनिवार्य असते पण यामध्ये जर थोडा comedy उखाणे मराठी चा फ्लेवर असेल तर अजूनच मजा येईल आणि त्या समारंभाचा आनंद द्विगुणित होईल त्यासाठी आज marathicontent घेऊन आले आहे funny उखाणे मराठी funny उखाणे मराठी यामध्ये असतील marathi ukhane for groom funny आणि marathi ukhane funny for bride यामध्ये काही

chavat marathi ukhane for male funny सुद्धा समाविष्ट असतील जे तुम्ही गांभीर्याने न घेता एक विनोद म्हणून घेणे अपेक्षित आहे कारण गुगल सर्च मध्ये अश्या विनोदी उखाण्यांसाठी मोठ्या प्रमाणात शोध केले जातात आणि त्यानुसारच marathicontent तुमच्यासाठी लेख लिहीत असते.

गुगलवर विनोदी उखाण्यांच्या संदर्भात केल्या गेलेले शोध: हसायचे उखाणे, funny ukhane in marathi for female

तुम्हाला हेसुद्धा आवडेल:

शेलापागोटे | फिशपॉंड्स

फेसबुक कॉमेडी लॉकडाउन मराठी कमेंट्स

हसायचे उखाणे

चला तर सुरुवात करूया काही मजेदार काही व्यंगात्मक आणि मजेशीर उखाण्यांना जे तुम्हाला हासावतील आणि जर तुम्ही हे उखाणे पाठ केलेत तर तुम्ही एखाद्या समारंभात लोकांचे मनोरंजन सुद्धा करू शकता.

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा

लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा


अमेरिकेचे प्रेसिडेंट होते (बुश)

सुंदर मुलगी दिसताच ___ राव एकदम खुश


___ रावांची थोरवी मी सांगत नाही

कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाही


इरानाच्या चहाबरोबर मिळतो मस्का पाव

___ रावांचे बाहेर किती लफडी विचारू नका राव


पावाबरोबर खाल्ले अमूल बटर

___ चे नाव घ्यायला अडलंय माझ खेटर


एक होती चिऊ, एक होती काऊ

____ रावांचे नाव घेते, डोक नका खाऊ.


funny ukhane in marathi for female


कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र

____ नि गळ्यात बांधले मंगलसूत्र


इवले इवले हीन, त्याचे इवले इवले पाय

___ राव आले नाही, पिऊन पडले कि काय.


अंगणात पेरले होते पोतेभर गहू

लिस्ट आहे मोठी, कुणा कुणाचे नाव घेऊ


चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे

घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.


बागेमध्ये असतात, गुलाबांच्या काळ्या

____ रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या


कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला

___ शी लग्न करून ____ जन्माचा धुपला


कॉम्पुटरला असते हार्ड डिस्क

हिच्याशी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क


रेशमी सदर्याला प्लास्टिक चे बक्कल

____ रावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.


लाडाने जवळ गेले, केली जरा घासत

गणपतराव एकदम खेस्क्ले, फारच बाई तिरसट


बदामाचा केला हलवा, त्यात टाकले काजू किसून

___ राव बिड्या पितात संडासात बसून


यशोमती मय्यासे बोले नंदलाला

___ चे नाव घेतो लाइफ झिंगालाला.


एका हातात पर्स, दुसर्या हातात रुमाल,

जेव्हा आहे ____, कशाला हवा हमाल


टेनिसच्या मैदानात आहे माझा FIRST HAND

___ रावांचे नाव घेते, नवरा माझा SECOND HAND


भल्या पहाटे करावी पूजा,

___ च्या जीवावर करते मी मजा


___राव आमचे पैलवान व्यायाम करतात कसून

पण जरा मी व्हासकले तर बसतात पोरीवानी रुसून


लग्नाआधी __राव करायचे माझ्यावर चारोळ्या।

लग्न झाल्यावर कळालं राव हाकलतात नुसत्या उंटावरून शेळ्या.


प्रेमाने बोलले __रावांशी तर थोडं बहेकतात।

पण डोळे मोठे केले की ते माझं सर्व काम ऐकतात😂


यांच्याशी लग्न करण्याचे एकच कारण होते फक्त।

___ राव होते मोदींचे भक्त.

Sharing Is Caring:

Leave a Comment