10 छान छान गोष्टी | नवीन मराठी छान छान गोष्टी

१. सिंहाच्या त्वचेतील गाढव

sinhachya twachetil gadhav gosht

एका जंगलात एक गाढव राहत होता. तो अतिशय मूर्ख आणि अहंकारी होता. एके दिवशी जंगलात सिंह मरण पावला. त्याचा मृतदेह पाहून गाढवाला एक कल्पना सुचली. त्याने सिंहाची कातडी काढून ती आपल्या अंगावर परिधान केली.

त्यानंतर तो जंगलात फिरू लागला. इतर प्राणी त्याला पाहून घाबरून पळू लागले. त्यांना खरोखर सिंह दिसत होता. गाढवाला खूप आनंद झाला. त्याला असे वाटू लागले की तो खरोखरच सिंह आहे.

त्यानंतर तो एका तळ्याजवळ पोहोचला. त्याने पाण्यात आपले प्रतिबिंब पाहिले. त्याला त्याच्या अंगावर सिंहाची कातडी आणि त्याचे कान, नाक आणि शेपटी दिसली. त्याला खूप हसू आले. तो मोठ्याने हसण्यास सुरुवात झाली.

त्याच्या हसण्याच्या आवाजामुळे जवळपास एका शेतात काम करणारे शेतकरी त्याच्याकडे पळत आले. त्यांनी गाढवाला सिंहाच्या कातडीत पाहिले आणि ते ओळखले. त्यांनी लाकडी काठ्या घेऊन गाढवावर हल्ला केला. गाढवाला खूप वेदना झाली आणि तो ओरडू लागला.

त्याने सिंहाची कातडी सोडून दिली आणि पळू लागला. शेतकऱ्यांनी त्याला पळवून लावले.

गाढवाला त्याच्या मूर्खपणाचा पश्चाताप झाला. त्याला समजले की बाहेरून दिसण्यापेक्षा आपले गुण महत्वाचे असतात.

बोध: बाहेरून दिसण्यापेक्षा आपल्या आतील गुण महत्वाचे असतात.

२. भांडणारे कोंबडे आणि गरुड

bhandnare kombde ani garud

एकेका शेतात दोन लढाऊ कोंबडे राहत होते. ते एकमेकांना बघू शकत नव्हते. एक दिवस त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला आणि चोची आणि नखांनी एकमेकांवर हल्ला केला. तेव्हा एक कोंबडा हरला आणि लाजून एका कोपऱ्यात लपला. जिंकलेला कोंबडा कुंपणावर उडाला आणि पंख फडफडत जोरात आरडाओरडा करून आपला विजय साजरा करू लागला.

पण, आकाशातून उडणारा गरुड हा आरडा ऐकून त्या कोंबड्याकडे आला आणि त्याला आपल्या पंज्यात पकडून आपल्या घरट्याकडे घेऊन गेला.

हरलेला कोंबडा कोपऱ्यातून बाहेर आला आणि शेतावर पुन्हा राज्य करू लागला.

बोध : अहंकाराचा एके दिवशी नाश होतोच.

३. कोंबडा आणि कोल्हा

kombda ani kolha bodhkatha

एका सकाळी, एका शेतकऱ्याच्या कोंबड्यांच्या खुराड्याजवळ फिरताना एक कोल्हा सापळ्यात अडकला. त्याला भूक लागली होती, हे खरं होत, पण त्याच्या मनात चोरी करण्याचा विचार नव्हता. लवकर उठलेला एक कोंबडा, काय गडबड आहे ते पाहण्यासाठी बाहेर आला. त्याला माहित होते की कोल्हा सापळ्यातून सुटू शकणार नाही, म्हणून तो त्याच्या शत्रूला जवळून पाहण्यासाठी थोडं जवळ गेला.

लबाड कोल्ह्या जाळ्यात अडकल्यामुळे त्याची पळून जाण्याची शक्यता फारच कमी होती पण तरीही त्याने कोंबड्याला विनवणी करत म्हटलं, “प्रिय मित्रा, मी नुकताच एका आजारी नातेवाईकाला भेटायला जात असताना या दोरीत अडकून गेलो आणि सगळं गोंधळून गेलं. पण कृपया याबद्दल कोणाालाही सांगू नकोस करण कोणालाही दुख झालेलं मला आवडत नाही, आणि मला खात्री आहे की मी लवकरच या दोरीचे तुकडे करून या सापळ्यातून सुटेन.”

पण कोंबडा इतक्या सहज कोल्ह्याच्या लबाड बोलण्याला फसणारा नव्हता. त्याने लगेचच संपूर्ण कोंबड्यांना ओरडून जागं केलं आणि मग त्यांच्या आवाजामुळे शेतकरीसुद्धा धावत बाहेर आला आणि त्याने कोल्ह्याला अद्दल घडवली

बोध : दुष्ट हे कधीच दयेस पात्र नसतात

4. लांडगे आणि मेंढ्या

landge ani mendhya bodhkatha

मेंढ्यांच्या कुरणाजवळ लांडग्यांची एक टोळी लपून बसली होती. पण कुत्र्यांनी त्या सर्वांना मेंढ्यांपासून सुरक्षीत अंतरावर ठेवलेले होते त्यामुळे सर्व मेंढ्या सुरक्षितपणे चरत होत्या. पण आता लांडग्यांनी मेंढ्यांना फसवण्याची योजना आखली.

“आपल्यात का बरे नेहमीच वैर असते?” असे ते लांडगे मेंढ्यांना म्हणाले, आणि पुढे ते असे म्हणाले कि “हे त्रास देणारे कुत्रे आपल्यामध्ये नसते तर मला खात्री आहे की आपल्यामध्ये खूप छान मैत्री असती जर तुम्ही त्यांना दूर पाठवले तर आपण किती चांगले मित्र बनू शकतो ते तुम्हा सगळ्यांना कळेल.”

मेंढ्या सहज फसवल्या जाऊ शकतात. त्यांनी कुत्र्यांना दूर जाण्यास सांगितले आणि त्या संध्याकाळी लांडग्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य मेजवानी मिळाली.

बोध: आपले खरे मित्र ओळखा.

५. सिंहाचा वाटा

hinhacha wata bodhkatha

एकदा बऱ्याच वर्षांपूर्वी एक सिंह, कोल्हा, ढोल आणि लांडगा यांचे असे ठरले की आपण शिकारी जीव आहोत तर आपण कोणीही शिकार केली तर ती आपसात वाटायची.

एका दिवशी लांडग्याने हरणाची शिकार केली व ठरल्याप्रमाणे आपल्या साथीदारांना त्या हरणाची वाटणी करण्यासाठी बोलावून घेतले.

सिंहाने कोणालाही न विचारता त्या मेजवणीचा प्रमुख म्हणून स्वतःला प्रस्थापित करत त्याने निष्पक्षपणे पाहुणे मोजण्यास सुरुवात केली.

पंज्यावर मोजत तो म्हणाला एक मी स्वतः सिंह, दुसरा तो लांडगा, तिसरा ढोल आणि चौथा कोल्हा.

काळजीपूर्वक सिंहाने त्या हरणाची चार भागांत वाटणी केली.

आता सिंह म्हणाला “मी राजा आहे व म्हणून पहिला भाग मला हवा दुसरा भाग सुद्धा माझा आहे कारण मी तुमच्या मध्ये मध्यस्थी केली तिसरा भागही मीच घेणार कारण मी सगळ्यात मजबूत आहे.”

आता सिंह कोल्हा, ढोल आणि लांडग्याकडे क्रूरतेने पाहून बोलला “की कुणाला उरलेल्या चौथ्या भागावर दावा करायचा आहे?” तो आपले पंजे पसरवत ओरडून म्हणाला “आताही संधी आहे.”

६. सिंह, गाढव आणि कोल्हा

sinh gadhav ani kolha bodhkatha

एक सिंह, एक गाढव आणि एक कोल्हा सोबत शिकार करत होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शिकार पकडली. गाढवाला शिकार वाटून घेण्यास सांगण्यात आले. प्रत्येकाला समान वाटा देऊन त्याने हे अतिशय निष्पक्षपणे केले.

कोल्ह्याचे समाधान झाले, परंतु सिंह त्याच्यावर प्रचंड रागाने धावून गेला आणि त्याने आपल्या मोठ्या पंजाच्या एका फटक्यातच गाढवालासुद्धा मारणाऱ्यांच्या यादीत जोडले.

मग तो कोल्ह्याकडे वळला.

तो रागाने ओरडला “तु हे वाटून टाक,”

कोल्ह्याने बोलण्यात वेळ घालवला नाही. त्याने पटकन सगळ्या शिकारीचा एक मोठा ढीग केला. त्यातून त्याने स्वत:साठी खूप लहान भाग घेतला, शेळीची शिंगे आणि खुर आणि बैलाच्या शेपटीचे टोक असे त्याने घेतले.

हे पाहून सिंहाच्या चेहऱ्यावर एक हसू खुलले.

त्याने आनंदाने कोल्ह्याला विचारले “तुला इतकं न्यायाने वाटायला कोणी शिकवलं?.”

कोल्ह्याने उत्तर दिले “मी गाढवाकडून धडा घेतला,” .

बोध: दुसर्यांच्या चुकांपासून शिका

७. गिरणीवाला त्याचा मुलगा आणि गाढव

girniwala tyacha mulga ani gadhav bodh katha

खूप वर्षांपूर्वी, एक म्हातारा गिरणीवाला आणि त्याचा मुलगा गाढव घेऊन बाजारात जात होते, जे त्यांना विकायचे होते. त्यांनी त्याला खूप हळू चालवू लागले, कारण त्यांना वाटले की जर त्यांनी त्याला चांगल्या स्थितीत ठेवले तर त्यांना त्याची चांगली किंमत मिळेल. ते रस्त्यावरून चालत असताना काही लोक त्यांच्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले.

एक ओरडला, “काय मूर्खपणा,” “जेव्हा ते गाढवावर बसून चांगले प्रवास करू शकतात तर पायी चालणे यामध्ये तुम्हाला मूर्खपणा वाटत नाही?.”

गिरणीवाल्याला लोकांचे असे थट्टा करणे आवडत नव्हते, म्हणून त्याने आपल्या मुलाला वर गाढवावर बसण्यास सांगितले आणि मग ते पुढे चालू लागले.

ते थोडे पुढे गेले असता रस्त्याने तीन व्यापारी जात होते त्यांनी मुलाला गाढवावर बसलेले पहिले.

ते ओरडले. “अरे, हा काय प्रकार आहे म्हाताऱ्या वडिलांना गाढवावर बसवण्याएवजी खुशाल तू गाढवाची स्वारी करतोय आणि त्यांना पायी चालावतोय?” “त्यांच्या म्हातारपणाचा थोडा विचार कर आणि त्यांना गाढवावर स्वर होऊ दे.”

जरी गिरणीवाला थकला नव्हता तरीही त्याने व्यापाऱ्यांना शांत करण्यासाठी मुलाला खाली उतरवले आणि स्वत: वर चढला.

पुढच्या वळणावर काही स्त्रिया बाजारातून भाजीपाला आणि इतर वस्तू घेऊन जात होत्या.

त्यातली एकजण ओरडली, “बघा बघा हा विचित्र माणूस.” “जो स्वतः गाढवावर बसून, बिचाऱ्या मुलाला पायी चालवत आहे.”

या सगळ्या गोष्टींमुळे गिरणीवाल्याची प्रचंड चिडचिड झाली, पण त्याने होकार दिला आणि मुलाला त्याच्या मागे वर चढण्यास सांगितले.

ते आता नुकते निघालेच होते तर मागून पुन्हा लोकांची आरडाओरड त्यांना ऐकू आली.

एक ओरडला, “काय मूर्खपणा आहे,” “एखाद्या गरीब मुक्या प्राण्याला असे लादणे किती क्रूरपणाचे आहे ” “बसलेले दोघेही त्या गाढवापेक्षा धष्टपुष्ट दिसतात तरीही त्या मुक्या प्राण्यावर इतका अन्याय का?”

दुसरा म्हणाला, “ते त्या गाढवाची कातडी विकायला बाजारात चालले असतील.”

त्यानंतर गिरणीवाला आणि त्याचा मुलगा पटकन खाली उतरला आणि काही वेळाने बाजारात गोंधळ उडाला कारण ते दोघे त्या गाढवाला त्याचे पाय बांधून एका खांबाला लटकवून घेऊन जात होते, हे विचित्र दृश्य जवळून पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

गाढवाला तसे बांधून वाहून नेणे आवडत नव्हते, आणि त्यातल्या त्यात बरेच लोक त्याच्याकडे बघून हसायला आणि ओरडायला आले, त्यामुळे तो लाथा मारू लागला आणि ओरडू लागला आणि मग, जेव्हा ते पूल ते त्या अवस्थेत पूल ओलांडत होते, गाढव त्याच्या पायांच्या हालचालीमुळे दोर तुटून नदीत पडला.

बिचारा गिरणीवाला आता खिन्न मनाने घराकडे जाऊ लागला. सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करून, त्याच्या हाती शेवटी निराशाच आली.

बोध : जर तुम्ही सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी कोणीच संतुष्ट होत नाही.

8. शेळी, करडू (शेळीचे पिल्लू) आणि लांडगा

sheli kardu ani landga

आई शेळी एके दिवशी सकाळी तिच्या घरासाठी वस्तू आणण्यासाठी बाजारात जात होती, जाताना तिने तिच्या लहान मुलाला सांगितले,

“माझ्या मुला, घराची नीट काळजी घे,” तिने काळजीपूर्वक दार लावताना पिल्लाला सांगितले. आणि “जोपर्यंत कोणी तुला: ‘लांडगा आला रे आला'” हा पासवर्ड देत नाही तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एक लांडगा जवळ लपून बसला होता आणि बकरीने काय म्हटले ते त्याने ऐकले. म्हणून, बकरी नजरेआड होताच, तो वर आला आणि त्याने दरवाजा ठोठावला.

लांडगा हळूवारपणे म्हणाला: “लांडगा आला रे आला”

तो अगदी बरोबर पासवर्ड होता, पण जेव्हा त्या मुलाने दाराच्या एका फटीमधून डोकावले आणि बाहेरची सावलीची आकृती पाहिली तेव्हा त्याला ती आकृती वेगळी दिसली.

तो म्हणाला, “मला तुझा पांढरा पंजा दाखव,” “त्याशिवाय मी तुला आत जाऊ देणार नाही.”

पांढरा पंजा अर्थातच क़्वचितच लांडगे दाखवू शकतील असे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून लांडग्याला निराशेनेच निघून जावे लागले.

जेव्हा शेळीच्या पिल्लाने लांडग्याला जाताना पाहिले तेव्हा तो म्हणाला “एखाद्या गोष्टीविषयी आपण कधीही पूर्ण खात्री बाळगू शकत नाही”

शेळीच्या पिल्लाने स्वताची बुद्धी वापरून लांडग्यापासून स्वताला वाचवले होते.

बोध: "दुसऱ्यांदा खात्री करणे केव्हाही चांगले"

९. कोंबडा आणि सोन्याची अंगठी

kombda ani sonyachi angathi

एक कोंबडा स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अंगणात काहीतरी खाण्यासाठी शोधत असताना त्याला त्याच्या मालकाने गमावलेली एक मौल्यवान सोन्याची अंगठी सापडली.

“अहाहा!” कोंबडा म्हणाला. “हि अंगठी खूप मौल्यवान असेल यात काही शंका नाही आणि ज्याने हि गमावली असेल तो हि अंगठी शोधण्याची चांगली किंमत देईल . पण मी जगातील सर्व दागिन्यांपेक्षा माझ्या व माझ्या परिवारासाठी धान्याचा एक दाणा निवडतो.”

बोध: दागिने भूक शांत करू शकत नाही.

10. मुंगी आणि टोळ

mungi ani tol bodhkatha

उन्हाळ्याचे दिवस होते. एक टोळ सावलीत विश्रांती घेत होता तव्हा टोळच्या शेजारून एक मुंगी पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्यासाठी मोठा साखरेचा दाणा खेचून नेत होती .

मुंगीकडे बघूनच टोळ थकला. आणि त्याने मुंगीला विचारले, “अगं मुंगी, तू दिवसभर का काम करतेस? थोडावेळ बसून माझ्याबरोबर गाणी का गात नाहीस?”

मुंगीने त्याला उत्तर दिले: “मी पावसाळ्यासाठी अन्न गोळा करत आहे जेव्हा खूप पाउस कोसळत असेल आणि अन्न नसेल तेव्हा हे गोळा केलेलेच अन्न उपयोगी येईल आणि तू सुद्धा असेच केले तर चांगले होईल,”

टोळ तिला म्हणाला “अगं मुंगी, हिवाळ्याची आत्ताच का काळजी करायची? अजून तर भरपूर अन्न शिल्लक आहे!” मुंगी आपले ओझे घेऊन निघून गेली आणि तो त्याचे गाणे गात राहिला.

पावसाळा आला आणि मुंगीने सांगितल्याप्रमाणे, टोळ याने काहीच अन्न साठवून ठेवलेले नव्हते. मग तो मुंगीकडे गेला आणि म्हणाला “ए मुंगी! मी तुझ्याकडे खाण्यासाठी अन्न मागण्यासाठी आलो आहे आणि त्या बदल्यात मी तुझ्यासाठी छान गाणं म्हणेन”

मुंगी टोळ ला म्हणाली “संपूर्ण उन्हाळ्यात मी जेव्हा कठोर परिश्रम करत होते , तेव्हा तू गाणी म्हणत होतास आणि माझ्यावर हसत होतास . आता माझ्याजवळ संपूर्ण पावसाळाभर पुरेल असे अन्न आहे आणि तू अन्नाशिवाय भुकेने व्याकूळ झाला आहेस मी माझे पोट भरले आहे आणि तुला भूक लागली आहे.”

बोध : जर भविष्यात यश मिळवायचे असेल तर, सुरुवात आत्तापासून करावी लागते.
Sharing Is Caring:

Leave a Comment