गजानन महाराज कविता सुविचार संग्रह | gajanan maharaj quotes in marathi

गजानन महाराज कविता

गजानन महाराज कविता सुविचार संग्रह

गजानन महाराज कविता: गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते. त्यांच्या अलौकिक शक्ती आणि करुणामय स्वभावामुळे ते आजही लाखो भक्तांच्या हृदयात राज्य करतात.

या पोस्टमध्ये, गजानन महाराज यांच्या जीवनावर आणि शिकवणुकीवर प्रकाश टाकणाऱ्या काही सुंदर कविता आपण पाहणार आहोत.

या कविता सुद्धा वाचा: gajanan maharaj quotes | श्री गजानन महाराज कोट्स

कविता हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे आणि गजानन महाराज यांच्यावरील भक्ती व्यक्त करण्यासाठी अनेक भक्तांनी कविता लिहिल्या आहेत.

या पोस्टमध्ये आपण गजानन महाराज यांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित कवितांचा आनंद घेणार आहोत.

चला तर मग, गजानन महाराज यांच्या चरणी वंदन करून, या कवितांच्या प्रवासाला सुरुवात करूया!

जय गजानन!

गजानन महाराज कविता सुविचार संग्रह

तूच माझा माय बाप तुजवीण जाऊ कोठे ।

तूच सर्वस्व माझ्यासाठी तुजवीण कोणी ना मोठे ।।

नामस्मरण करता तुझे मन हे प्रसन्न होते ।

म्हणुनी सदैव ओठी माझ्या गण गण गणात बोते ।।

रचना: Vijay Shrinath


करण्या दृष्टांचा अंत ।

शेगावी अवतरले संत ।।

संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा

gajanan maharaj quotes in marathi

।।🌺जय गाजनन🌺।।

माझे चित्त माझे मन।

बोले जय गजानन।।

जीवनातील प्रत्येक क्षण।

गजाननाला अर्पण।।

कणांपासून सृष्टी बनली।

त्यातील मी एक क्षुल्लक कण।।

मात्र प्रत्येक कणात आहे।

माझा गजानन।।

भक्त मी गजाननाचा।

गुरुवार माझा सण।

गुरुवारी कामे मार्गी लागती।

कठीण असुदे कितीपण।


गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष।

वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श।

यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष।

येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष।


gajanan maharaj quotes in marathi

कासावीस झालो आता

विरह सहावेना ।

दर्शनाविना तुझ्या

माऊली राहवेना।।

योग्य भेटीचा हा

देवा येऊदे सत्वर ।।

अधीर झाले मन

आणखी वाट पहावेना।।

।।गण गण गणात बोते ।।

रचना : मधुकर गणेशपुरे


gajanan maharaj quotes

देवा झाले तुझे उपकार।

उघडलेसी तू द्वार।।

तुझ्या दर्शनासाठी।

आहोत आम्ही तय्यार।।


gajanan maharaj quotes photo

ध्यानी ध्यास,मनी आस

सदैव आहे तुझाच भास

दूर असो की आसपास

चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास।

🌺गण गण गणात बोते🌺


gajanan maharj quotes



तू सद्गुरु माऊली।

आम्ही लेकरं सकळ।।

आम्हा लेकरांची सुखदुःख।

तुला न सांगताही कळं।।

प्रामाणिक प्रयत्न सुद्धा।

जेव्हा होतात निष्फळं।।

काळजावर उमटती।

तेव्हा अपयशाचे वळं।।

मग नाम तुझे घेता।

आसरा पायरीचा मिळं।।

तव कृपेने लाभे देवा।

अंगी जगण्याचे बळं।।

रचनाकार – मधुकर गणेशपुरे 🙏


करुनी शेगावची वारी

मन रमु दे या संसारी

राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास

तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास ।।

येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी,

आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी ।।

मोठा होता होता कधी तुझा दास झालो हे कळले नाही,

आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही ।।

घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची,

नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची ।।

भक्त संकटी पडता न बोलवताही तू धावत येसी,

गण गण गणात बोते बोलुनी भक्ता भवपार तारून नेसी ।।

वंदुनिया तुजला सकळ जन्म हा सार्थकी झाला,

आपल्या भक्तांच्या भेटीसाठी गजानन स्वर्गातून खाली आला ।।

💐जय गजानन श्री गजानन💐

gajanan maharaj quotes in marathi

करतो मी स्पष्ट।

नाही मी गर्विष्ठ।।

फक्त झुकतो गजानापुढे।

तेच माझ्यासाठी श्रेष्ठ।।

🙏जय गजानन माऊली🙏

gajanan maharaj quotes in marathi

गजाननच संपूर्ण ब्रह्मांड

तर आपण एक क्षुल्लक कण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन ।।

गजाननाच्या भक्तीत

उपयोगी नाही धन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ

तर फक्त कर तू श्रवण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

जीवनातील त्रास थोडे

कर तू सहन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

गजानन आपुले गुरू

आणि गुरुवार आपला सण।

भक्ता एकमुखाने म्हण

जय गजानन।।

🌺जय गजानन माऊली🌺


चुको न माझा मार्ग खरा ।

दुखो न कुणाचे मन जरा ।।

वाहू दे सुखाचा झरा ।

गजानना कृपा करा ।।

🙏जय गजानन माऊली🙏

संकटातून तारत असे।

विघ्ने दूर सारत असे।।

शेगाविचा गजानन भक्तांवर।

नेहमीच माया करत असे।।

।। जय गजानन माऊली ।।

ज्याचे नाम सदैव ओठी।

त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी।।🙏

|| गजानन महाराज की जय ||

सर्व कोटचे स्रोत – गजानन महाराज app

Sharing Is Caring:

1 thought on “गजानन महाराज कविता सुविचार संग्रह | gajanan maharaj quotes in marathi”

Leave a Comment