होळी सणावर मराठी कविता | रंगपंचमी मराठी कविता

होळी सणावर मराठी कविता

होळी सणावर मराठी कविता

जीवन रंग..

चिंब झालो मी दंग झालो मी

उधळुनी रंग बेधुंद झालो मी..

फासूनी रंग विदूषक झालो मी

तुज हसविण्या मात्र निमित्त मी..

सदा व्यस्त मी

भाकरीसाठी वाट पाहतो उद्याची जणू चातक मी..

उडे रंग, उडे गुलाल समायाची परिभाषा मी विसरुनी दुःख अश्रू पुसतौ रंगात मी..

चिंतामणी पावसे

रंगून जाऊ रंगात आता

सोडू उदासी साज

बंध नव्याने जुळवू सारे

रंग खेळूनी आज

विसरूनी क्लेष सारे

अखंड उठू दे मनी तरंग

बंध नव्याने जुळवू सारे

उधळूया आज हे रंग

— Aashlesha


रंगात रंगाच्या…

तिला

रंगाचा तिटकारा होता

म्हणून

ती घरात बसून राहिली आणि

सर्व संपल्यावर

बऱ्याच वेळाने बाहेर पडली..!!

रस्ते सुनसान होते पण जागोजागी रंगांचे अस्तित्व ठळकपणे दिसून येत होते लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी काही सुकलेले तर काही अजूनही ओले होते..!!

ती

दबकत सावरत चालत राहिली रंगहीन रस्ता शोधत राहिली पण तिच्या लक्षात आले नाही की त्याच रंगाने तिची पावले नकळत रंगत गेली..!!

– सुनिल पवार


शिशिराच्या पानगळीला निरोप द्यायची वेळ झाली वसंताच्या नव्या धुमार्यांना सवें घेऊन होळी आली

घरोघरी दरवळले पुरणपोळीचे सुगंध टिमक्यांच्या नादांमुळे वातावरण झाले धुंद

दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून होळीत त्यांचे दहन करूँ होलीका मातेची पूजा करून चैत्रमासाचे स्वागत करू

– भा विमा


मानवा अरे रंग, आकाश, आभाळ चंद्र सूर्य ता-यांनाही आहे. जमिन, नदी नाले, वृक्ष वल्लरी, पाना फुलांनाही आहे. पक्षी, प्राणी व फुलपाखरा सारख्या चिटुकल्या किटकांनाही आहे.

निसर्गाची ही अप्रतिम मुबलक रंग उधळण उधार घे. निसर्गाच्या रंगात रंगून घे. तना बरोबर मन फ्री रंगवून घे.

निसर्गा पेक्षा तू श्रेष्ठ विसरून हा अहं भाव तू निसर्गाचाच भाग हे मनावर कोरून घे. तव निर्मीत कृत्रीम रंग सोडून नैसर्गिक रंगातच रंगून घे.

रंगीत धुळवडीच्या रंगीत शुभेच्छा.

Neelima Naik

इतर वाचण्यासारख्या गोष्टी:

हातात माझ्या रंग सामोरी तू आलेली आहेस रंगवावा हा प्रसंग तू हसून दाद दिलेली आहेस

पण तेवढ्यात दिसतो तुझ्या गालावरील रंग गुलाबी हातचा माझ्या रंग म्हणतो नको बिघडवुस तो थाट नवाबी

विचार हाच करेपर्यंत आकाश निळेशार पार दिसते उडालेल्या निळ्या रंगात दूरपर्यंत तू अदृश्य होत नाजूक पळते

– अक्षय कदम

_____________________________

हे निसर्गा, सूर्याच्या सोनेरी किरणांत उजळू दे, वृक्षांच्या हिरवाईने समृद्ध होऊ दे, आभाळाच्या निळाईने बहरू दे, काळ्या मातीने सावरू दे, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी सजवू दे, रंगांनी रंगलेले हे जीवन तुझ्यात रंगु दे…..

@Nihshbdwriters

_____________________________

रंगांनी रंगलेले आयुष्य हे सारे रंग आनंदाचे पुसुनी घावा दुःखाचा तो रंग ओसंडू द्यावा सुखाचा क्षण कधी सौम्य तर कधी गडद रंगांप्रमाणे आयुष्यात येतात प्रसंग सामोरे जाऊन उधळून द्यावा तो रंग रंगाना जशी असते स्वतःची ओळख तशी आयुष्यालाही असते रंगांची निखळ देऊन शुभेच्छा रंगपंचमीला सण साजरा करुया आजच्या घडीला

रंग बदलू ही दुनिया रंगांशी कसं खेळायचं एकच की अवघा एक ज्याचे त्याने ठरवायचं

रंग हेतू राजकारण समाजकारण बेरंग प्रत्येक झेंडा भिन्न रंगी स्वार्थ सर्वार्थ अनुरंग

चढे माज धन रंगाचा सावकारा मनी तरंग वाढे साज भक्ती रंगाचा सूखे भेटतो पांडुरंग

भांग पिऊन रंगारंग शिवीगाळ करण्यापरी रंगपंचमी आत्मरंगी रंगवून करा साजरी 

-सतिश कुलकर्णी

_____________________________

होळी आली रे बघ होळी आली विविध रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग काढून टाका सांगत आला आहे लाल रंग सकारात्मक विचार करून वाग बोलतो आहे हिरवा हिरवा रंग तुझ्या विचारात क्रांती करण्या आली

सर्वाना आपल्यात सामावून घे संदेश देत आहे बघ निळा रंग इतरांच्या दुःखाचे निवारण कर आदेशाने सांगतो आहे काळा रंग तुझ्या वागण्यात बदल करण्या आली

न डगमगता संकटाला तोंड दे प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग लागतीसाठी अविरत चालत राहा प्रोत्साहित करतोय पिवळा रंग होळी आली व होळी आली

• नासा येवतीकर,

_____________________________

आयुष्य आपले सारे, रंगपंचमीचा सण,

रंग खेळा आवडीने, जिवेभावे मनोमन..!१!

पेटी भारी ही रंगाची, वाहते हो ओसंडून,

निवडून तुम्ही घ्या हो, नका करू आनमान..!२!

रंग खेळता जीवनी, कधी कुठला सांडेल,

नाही येणार अंदाज, कधी कसा मिसळेल..! ३ !

चित्र रंगवू आपले, हर्षभरे आनंदात,

नको रंगाचा बेरंग, दुसऱ्याच्या जिंदगीत..!४!

नवरंगी मोर पिस, प्रति क्षण आयु जणू

जप हृदयी नित्य, प्रिय राधा कान्हा वेणू..!५!

रंग उधळूया चला, सुख समृध्दी वाढवू

सप्तरंगी इंद्रधनू, सर्व जगात रंगवू..!६!

– गणेश गंगाधरराव शिवलाड, परभणी.

_____________________________

उघडली आज रंगांची पेटी, झाल्या सर्व वराडाच्या भेटी जमली होती रंगांची वरात, रंगीबेरंगी गाणे वाजत होते जोरात रंगापंचमी चे मुहूर्त होते, रंगांचे रंगाशी जुळले नाते, वरपक्ष होते पांढरे, वधूपक्षी होते रंग सारे जेव्हा दोनी पक्ष सारखे बसले,, डोळ्याला खूप सुंदर दिसलें अशी अनोखी सोयरीक जूटली, सप्तरंगी मग नवरी नटली रंगीत झाला नवरीचा होबास, पाणेरी पण रंगांची झाली खास रंगांना महत्व एकमेकांचे कळले, मग सर्वांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले….

– RUSHIKESH GADAM

_____________________________

पाहताच तुला झालो मी बेधुंद प्रेमाची तुझ्या चढली मला भांग प्रेम झालं तुझ्यावर चुकलं कुठे सांग तुझ्या प्रेमात रंगताना तुझ्या वरच्या कविता मी रंगवायचो तुझ्या प्रेमात झालो मी ढंग एका क्षणात बदलले तु रंग

चैतन्य पारसे

– Chaitanya Parase

_____________________________

तुझ्या हाती होते रंग, मी दूरुनी पाहिले होते. तू आलीस रंग खेळाया, मी.. नकोच म्हटले होते. शेवटी धरलास तू अबोला, तू माझा मात्र नाईलाज झाला. तुझ्या स्पर्शाने मोहरलेला रंग, क्षणात माझ्या गाली चढला. तेव्हा तुझा तो रुसलेला चेहरा, अगदी खुदकन हसला होता. कारण… हात तुझा मी हाती घेऊन, तो रंग स्वतःस लाविला होता…!

© सिध्दलिखित

_____________________________

आज रंगीन रंगात रंगीत विश्व रंगबेरंगी रंगछटेने रंगून जाणार….

कृष्ण वर्णात मलीन झालेलं हे विश्व आज रंगांमध्ये न्हाऊन निघणार, अविश्वास, क्रोध अशा अनेक कारणाने गुरफटलेलं मन आज माणसांमध्ये एका ठिकाणी स्थिरावणार…

अलिखित नियमातल्या एकांताला विराम लागून पूर्वापार एकतेचा मेळ पून्हा लागणार, स्वविचाराने माखलेलं अबोल चित्त आज सर्वांमध्ये रममाण होणार…

स्वरचित पारतंत्र्याच्या युगाचा उंबरठा ओलांडून तेजोमय पाऊल बाहेर पडणार, महागडा आपला ‘माणुसकी धर्म’ आज विश्वकृपेने मोफत मिळणार…

ममता, आदर इतका बहरणार, भूमीमायसुद्धा अपुरी पडणार अमाप एकता आसमंती अभिमानाने भिडणार, मग नभाला होणाऱ्या अलगद स्पर्शाने प्रफुल्लतेचाही वर्षाव होणार…

•शब्दसम्राज्ञी_

_____________________________

रंगीत आपल्या या नात्यात असा रंगून गेलो नशेत या प्रेमाच्या स्वतःला विसरून गेलो, सप्तरंगी या जीवनात, रंगभेद सगळे विसरून गेलो अशा प्रेमळ रंगात मी नकळत मिसळत गेलो

– Vishnu Pardeshi

_____________________________

प्रेम-रंग…

रंग लावून जाईन मी,

कोणता? हे विचारू नको;

मन फितूर भासले तर,

ही चोरी का? विचारु नको;

रंग, पंचमीचा आहे,

सांग गुलाबी वाटतो का?

झाकल्या क्षणात डोळे,

मी लावल्या रंगाचा,

क्षण आठवतो का?

रंगाचा त्या अर्थ,

कळला जर तूला

तूच उत्तर शोधून घे;

अन् आवडलाच रंग,

तुला ही तर,

मग विलंब नको,

थेट आयुष्यातच ये…

कु. अक्षरा संतोष ढगे.

_____________________________

फक्त जळत न्हवती होळी तर जळत होता अहंकार पेटणाऱ्या लाकडा सोबत मिटत होता अंधार आगीच्या ज्वालेतून आशेची किरणे दिसत होती अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

मी गेलो मोहून पाहता माझ्या सजनेचा शृंगार होळीच्या आगेहून तप्त जणू ती अंगार नमस्कार त्या होळीला ती लांबून घालत होती अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

ती वाढत गेली पुरणपोळी अन वाढत होता माझ्या पोटाचा आकार वाटले मनास झाले पुरे आता !, पण देता ना आला तिच्या प्रेमाला नकार होळीच्या धुरामध्ये ती नवीन श्वास भरत होती अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

केला होळीने आज माझ्यातील दृष्टाचा संहार जन्मलो मी नव्याने भरून नव तेजाची फुंकार गगनभेदी ती ज्वाला आता शांत होत होती अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

– सुरेश गोविंद पवार

_____________________________

“होळी” होळीचा सन असा अनोखा, दुष्प्रवृत्तिंना जाळी…

मनामनाचे रंग उमलते, सुख-आंनदाची होळी..

नवचैतन्याचे रंग पसरती, दिशांत उमटे लाली..

रंग उधळती अवती-भवती, कुण्या देह कुण्या गाली..

कुणी टाकतो रंग कुणावर, कुणी टाकतो पाणी.. रस्त्यावरती तरूनाईची बेधुंद वाजती गाणी..

कुणी नाचतो, कुणी खेचीतो, कुणी माखतो माती.. भिन्न न उरले रंग कोणते, मीसळुनी गेलीत नाती..

_____________________________

होळी रे होळी पुरणाची पोळी रंग उधळीत आली कृष्णाची टोळी

रंगल्या दाही दिशा रंगल्या साडी चोळी कृष्णाला ही भुलली ती राधिका भौळी

गोपिका पुज कृष्णाची नावै सोळी या प्रेमावीण हे जीवन जसे जलावीना मासोळी

-Shubhasvi

_____________________________

रंग तुझा… रंग माझा… YourQuote.in

तुझा हा अट्टाहास मी पूर्ण करू कसा….? ! 

मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर मी शोधु तरी कसा….?

का लाऊ मी हा गुलाल तुझ्या गाली…..?

लाडिक गुलाबी खळीला मी छेडू तरी कसा….? 

आणि जर छेडलाच तो रंग तर दूर जाऊन लाजू नको.. बाव-या मनाला असे वेडे पिसे करू नको…!!

तू उधळशील रंग तोडून सारे बंध… हर्षून…हरपून….बेभान… चिंब चिंब … मी स्तब्द… निशब्द… धुंद… बेधुंद… या व्याकूळ आसुसलेल्या मनाला आवरू तरी कसा….?

सांग तुझा अट्टाहास मी पूर्ण करू कसा….?

मला पडलेल्या प्रश्नाच उत्तर मी शोधु तरी कसा….? !

– रुपाली….. (सायरा )

होळी साठी पर्यावरण पूरक रंग खरेदी करा

<खरेदी करा

Pidilite Rangeela Holi Ke Rang – 4 Fluorescent Shades of Holi Colours

Sharing Is Caring:

Leave a Comment