होळी चारोळी | रंगपंचमी मराठी चारोळी | Holi marathi charoli

होळी चारोळी(चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते.

कुठल्याही विषयवार आपण चार ओळींची कविता लिहू शकतो चारोळी ही कुठल्याही विषयांवर कमी शब्दात भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, आज आपण होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने या लेखात काही चारोळी पाहू।

holi marathi wishes

होळी चारोळी

नवीन सुवासीत विचारी रंगांनी उत्साहित होऊया..

नव्या जोशाने ध्येय गाठूया..

उदाशीत विचारांची होळी पेटवूया..

नवं लक्ष गाठूया…

_____________________________

होळी रे होळी,

सुखाची गोळी

होळी रे होळी,

करा दुखाची राख रांगोळी ।

___________________________

नकार राधेचा होळी खेळाला,

पण कृष्ण उत्साही आहे..

बोलावूनी राधेला अंगणात,

रंगाची उधळण करत आहे..

___________________________

होळी च्या दिवशी चेहरा माझा तुझ्या रंगानी रंगला

पण तुझ्या स्पर्शाने त्या रंगानी माझा जीव तुझ्यात दंगला.।

___________________________

काय ओठांवर ठेवू तुझ्या?

माझे जळाले ओठही, शब्दही…

वेचलेल्या आठवांची मोळी केली,

पण शेवटी जाळली होळीत तीही……!

___________________________

रंगात मिसळल्या भावना साऱ्या.

त्या त्यातचं विरघळल्या तर बंर होईल…

कडु भावनांनी केलं मनावर..

ओझ किमान ते तरी कमी होईल..

___________________________

विसरून सारे अपयश

करू नव्याने सुरुवात,

रंगेबीरंगी दुनियेत

या करू अपयशावर मात…

___________________________

माये ची ऊब माये ची बोली

गरीबा च्या घरी अनंदाची झोळी

संस्काराची आज काढली रांगोळी

चला स्वागत करु आलीया होळी..

___________________________

“सगळी कडे रंगांचा वर्षाव व्हावा,

पुरणपोळी, गोड भव्यांचा सुगंध पसरावा, आपसातल्या मत भेद दूर करुनी,

होली हा सन आनंदाने साजरा करावा…”


संबंधित पोस्ट्स :

___________________________

चला एकत्र येऊन सारे 

साजरा कर सण

आनंदी रहावेत सकल जन

माणुसकी जपू या आपण…

___________________________

रंगास ना ठाऊक

जात, धर्म, भाषा,

उधळूनी रंग..

चढू द्या प्रेमाची नशा !!

___________________________

सण आला होळीचा

रंग बदलेल चाळीचा

होळीच्या रंगापेक्षा प्रेमानं भिजवण चांगलं नाही-नाही म्हणताना रंगवणं खूपच चांगलं!

___________________________

मला रंग लावला तरी,

आता सगळे रंग फिके आहे,

तिच्या प्रेमाच्या गडद गुलाबी रंगात

मी आधीच रंगलो आहे…

___________________________

रंग पंचमीचे रंग

एकामेकांत मिसळतात

वेगळे असूनही माणसाला

एकीचे महत्व सांगतात..

___________________________

ही होळी करुया साजरी

आनंदाचा डोहात न्हाऊन

ओंजळ भर संसार सुख

अन् माणूसकीने रंगवून…

___________________________

रंग उत्सवांचा सजवुनी,

बांधुया दोरी नात्यांची.

चला साजरी करुया,

उत्सवांची रंगपंचमी..!!

___________________________

गजबजले आयुष्य माझे

सरड्याच्या गडद रंगांनी

हे होळीचे रंग फिके त्या पुढे..

___________________________

आला फाल्गुन मास

पेटवा होळी रे होळी

भरवा सजना घास

पुरण पोळी रे पोळी…

___________________________

Sharing Is Caring:

Leave a Comment