होळी सणाची माहिती मराठी | होळी शुभेच्छा संदेश | रंगपंचमी मराठी शुभेच्छा

होळी सणाची माहिती मराठी: होळी , धुळवड आणि रंगपंचमी या तिन्ही दिवसांना आपल्या महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे पण जर भारताचा विचार केला तर या तिन्ही दिवसांना होळी या नावाने संबोधले जाते तर आपण महाराष्ट्रात होळी ही फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत होळी साजरी करण्यात येते म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला मुख्य होळी नावाचा सण आपण साजरा करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ती धुळवड किंवा धूलिवंदन आणि मग पाचव्या दिवशी असते ती रंगपंचमी पण हल्ली आपण रंगपंचमीला आपण विसरत चाललो आहोत आणि धुलीवंदनाच्या दिवशीच आपण रंग खेळतो आणि काही लोक धुलिवंदनालाच रंगपंचमी म्हणतात, आपण या लेखात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि याबद्दलच्या कथा शुभेच्छा सुद्धा आपण या लेखात बघणार आहोत.

होळी का साजरी केली जाते?

होळी सणाची माहिती मराठी: होळीचा सण का साजरा केला जातो? होळीच्या या सणाशी अनेक पौराणिक कथा निगडित आहेत, त्यापैकी प्रल्हाद आणि त्याच्या भक्तीची सर्वात लोकप्रिय कथा आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता, त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की त्याला कुठलाही मनुष्य किंवा प्राणी मारू शकत नाही आणि तो  , कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने, ना घराच्या बाहेर, ना घराच्या आत ना दिवसा, ना रात्री, ना पृथ्वीत ना आकाशात मरू शकत नाही.

या हिरण्यकश्यपू  राक्षसाकडे असलेल्या अफाट शक्तीमुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने कुठल्याही देवाला न मानता तो स्वतःलाच देव समजू लागला. तो त्याच्या राज्यातील सर्व लोकांचा छळ करायचा आणि सर्वांना भगवान विष्णूची उपासना करण्यास मनाई करायचा आणि त्यांना त्याची पूजा करण्याची सूचना देत असे कारण त्याला भगवान विष्णूने मारलेल्या आपल्या धाकट्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता.

हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. असुराचा पुत्र असूनही तो वडिलांचे न ऐकता भगवान विष्णूची पूजा करत असे. हिरण्यकशिपूच्या भीतीने त्याचा पुत्र प्रल्हाद व्यतिरिक्त त्याने सर्वांना त्याला देव मानण्यास भाग पाडले. त्याच्या मुलाने विष्णूचे नाव घ्यावे हे त्याला कदापि मान्य नव्हते, त्याने खूप प्रयत्न केले की आपल्या मुलाने भगवान विष्णूची भक्ती सोडावी, परंतु प्रत्येक वेळी तो त्याच्या प्रयत्नात अपयशी ठरला. या रागाच्या भरात त्याने आपल्याच मुलाला मारण्याचा निर्णय घेतला.

या घृणास्पद युक्तीसाठी त्याने आपल्या प्रिय बहीण होलिकेची मदत घेतली. होलिकालाही भगवान शिवाकडून वरदान मिळाले होते ज्यामध्ये तिला वस्त्र मिळाले. जोपर्यंत ते कापड होलिकेच्या अंगावर आहे तोपर्यंत कोणीही होलिकेला जाळू शकणार नाही.

याचाच फायदा घेऊन हिरण्यकश्यपूने एक कट रचला बहीण होलिकेला भक्त प्रह्लादाला मांडीवर घेऊन अग्निमध्ये बसण्यास सांगितले. होलिका अग्नीत जळू शकत नाही कारण तिला वरदान मिळाले आहे, परंतु भक्तप्रल्हाद त्या अग्नीत भस्म होईल, जेणेकरून प्रत्येकाला एक धडा मिळेल की जर कोणी तिची आज्ञा मानण्यास नकार दिला तर त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल.

जेव्हा होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली तेव्हा भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचा जप करत होता. आपल्या भक्तांचे रक्षण करणे हे भगवंताचे सर्वात मोठे कर्तव्य आहे, म्हणून देवानेही एक युक्ती लढवली आणि असे वादळ आले की होलिकेच्या अंगाभोवती गुंफलेले कपडे उडून गेले आणि अग्नीने न जळण्याचे वरदान मिळालेली होलिका भस्मसात झाली. दुसरीकडे, अग्निदेवाने प्रल्हादला स्पर्शही केला नाही.

तेव्हापासून आत्तापर्यंत हिंदू धर्मातील लोक हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहतात आणि त्या दिवसापासून होळीचा सण सुरू झाला.

होळी सणाची माहिती मराठी: होळी कशी साजरी केली जाते?

फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळी गोवऱ्या रचून त्यामध्ये एरंडाची फांदी घालून होलिका दहन केले जाते काही लोक आपापल्या अंगणात स्वतंत्रपणे होळी पेटवतात तर काही ठिकाणी याचे स्वरूप सार्वजनिक असते व मोठे असते त्यामध्ये होळीत जाळण्यासाठी आपापल्या परिसरातील घरांमधून गोवऱ्या गोळा केल्या जातात व सार्वजनिक होळी पेटवण्याच्या ठिकाणी आणल्या जातात व होळी पेटवली जाते, होळी पेटल्यानंतर होळी रे होळी पुरणाची पोळी…. ओरडून बोंब मारण्याची प्रथा असते.

होळीच्या दिवशी कोणकोणते पदार्थ बनविले जातात?

होळी पुरण पोळी आणि आमटी याशिवाय अपूर्णच त्यासोबतच  कढी, दूध,भात, कुरडया,भजी हे पदार्थसुद्धा या दिवशी केले जातात.

धुळवड किंवा धुराडा कधी साजरा केला जातो?

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी तीच राख अंगाला लावून आंघोळ करतात म्हणजे शारीरिक समस्या कमी होतात असे पूर्वज सांगून गेले, या दिवसालाच धुळवड असे म्हणतात आणि धुळवड म्हणजे नक्कीच रंगपंचमी नव्हे, महाराष्ट्रात पूर्वी या दिवशी कधीच रंग खेळले जात नसत.

आता बघुयात मग रंगपंचमी केव्हा साजरी केली जाते

फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच हा दिवस रंगपंचमी म्हणून ओळखला जातो. परंतु उत्तर भारतातील परंपरा आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा प्रभाव यामुळे महाराष्ट्राची रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची पद्धत लोप पावत चालली आहे आणि शिवाय रंगपंचमीच्या दिवशी सुट्टी नसते हेसुद्धा कारण त्यासाठी जबाबदार आहे, यामुळे आपण होळीच्या दुसऱ्याच दिवशी रंग खेळून मोकळे होण्यातच धन्यता मानतो.

या दिवशी आपण आपल्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना शुभेच्छा देत असतो पण आजकालचे शुभेच्छांचे स्वरूप काहीसे बदलले आहे त्यासाठी आम्हीसुद्धा नवीन ढंगात होळी शुभेच्छा मराठीत आणि  रंगपंचमी मराठी शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत या शुभेच्छा तुम्ही निःसंकोचपणे आपल्या मित्र नातेवाईक यांच्यासोबत सामाईक करू शकता व त्यांना या वैशिष्ट्यपूर्ण दिवसाच्या शुभेच्छा एका विशेष पद्धतीने देऊ शकता.

या विषयाशी संबंधित गोष्टी:

होळी शुभेच्छा संदेश | रंगपंचमी मराठी शुभेच्छा

तुम्हाला एक रंगीत संदेश पाठवला आहे,

त्याला निव्वळ गुलाल समजू नका.

हे रंग आनंदाचे प्रतीक आहेत,

त्यांना हृदयापासून स्वीकारा.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

कोणी उडवतो पिचकरीने रंग,

कोणी लावतो हाताने गुलाल

हा तर आहे सण रंगांचा 

प्रत्येक रंग संदेश देतो आनंदाचा असो हिरवा पिवळा किंवा लाल।

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगपंचमी जणू पृथ्वीवर अवतरले इंद्रधनुष्य

या दिवशी रंगांचा आनंद घेतो प्रत्येक मनुष्य।

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

घेऊनि सप्तरंगांचा वर्षाव आली रंगपंचमी।

रंगवा प्रत्येकाला ना कुणाला जास्त ना कुणाला कमी।

जीवनात आहेत अनेक रंग।

भेटतात जेव्हा अनेक तरंग।।

भरतात जेव्हा प्रेमाचे रंग।

तेच आहेत सणाचे खरे रंग।

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

रंगाच्या सणात नाचत आहे मन।

आशा आहे माझ्यासोबत रंगाल तुम्हीपण।।

सुखाचे रंग आज उधळूया एकमेकांवर।

जल्लोषात साजरा करू रंगपंचमीचा सण।

प्रियजनांच्या प्रेमात मन न्हाऊन निघते

हे प्रेम नेहमीसाठी असेच ठेवा।।

रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।

सगळीकडे आज रंगांची उधळण।

रंगपंची जीवनातले रंगीत वळण।।

घरामध्ये पंचपक्वान्नांचा सुवास

आणि जुन्या मित्रांना भेटण्याची ती आस।।

सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

या वर्षी होळीचा वेगळाच आहे रंग

खेळणार रंग बायको संग

उठतील प्रेम तरंग

होऊनि एकमेकांत दंग।

सर्व नवविवाहित जोडप्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

चला असे खेळूया रंग 

नको कुठलाच भेद

आज मनसोक्त रंग खेळूया

मनात नको कुठलाच खेद.

रंगपंचमीच्या सर्व लहान मोठ्या माझ्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा।

ना रंगांचे राहिले आकर्षण ।

ना पक्वानांची राहिली ओढ।।

मजा तर तेव्हाच यायची।।

जेव्हा मित्रांना रंगवण्याची चालायची चढाओढ।।

आठवणीतील रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगपंचमीचे ते दिवस आठवतात।

जेव्हा सर्व भाऊ मला त्रास द्यायचे।।

आता ती बालपणीची होळी कधीच सजणार नाही।

पण तरीही त्या आठवणीत रमायचे।।

किती अनोखाच आहे हा सण।

ज्यादिवशी जुने कपडे घालतात सर्वजण।।

नसते अंघोळीची या दिवशी कुठलीच घाई।

आळशी लोकांना तर या दिवशी काही चिंताच नाही।।

सर्व माझ्यासारख्या आळशी मित्रांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगाचा सण आज आला।

कुणाचा भरवसा आज ना उरला।।

जे होते प्रामाणिक माझे सोबती।

त्यांनीच माझ्यासाठी पिचकारीत रंग भरला।।

रंगपंचमीच्या दिवशी दगाबाजी करून रंगावणाऱ्या माझ्या सर्व 😂🤣मित्रांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

फक्त तिला म्हटलं होतं

“तुझ्यासोबत रंग खेळण्यास उत्सुक आहे”

ती लगेच टँकर घेऊन आली अन रंगाने धुवून गेली।

अश्याच रिस्की मैत्रिणींना रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा।😂

कुणाला रंग लावल्याचा आनंद दोन क्षणच टिकतो.

शत्रूला कधीच मिठी मारून तर बघा

तो हसत हसत तुमच्या सदैव सोबत असेन…

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।।

घाबरायचे मी रंग पाहून

लपायचे मी रंग खेळताना पाहून

येते आठवण आपल्या लोकांची आज

जे रंगासोबतच जीवही तेवढाच लावायचे😐

होळीच्या सप्तरंगी रंगाने आयुष्याला नवा बहर येऊ दे…

पूर्ण होऊदे स्वप्ने सारी, यश तुम्हाला वेळोवेळी मिळू दे…

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा !

रंगपंचमीचे सप्तरंग जणू, महती देती विविधतेची..

सारे एकमेकांत रंगुनी, साक्ष देती एकात्मतेची..

विकारांची करूनी होळी

खावी माधुर्याची पुरणपोळी

स्नेह, सौहार्द, समानता, संवेदनक्षमता

रंग मानवतेचे लावूनी व्हावी साजरी रंगपंचमी

कृष्णाने उधळले सप्तरंग…

राधेचे भिजले अंग अंग…

राधा ही मग होऊन दंग…

कृष्णाच्या प्रीतीत खेळी रंग…

“होळी, धुलीवंदन, रंगपंचमी “

रंगांसह प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.

आशा आहे की होळीच्या या पवित्र अग्नी मध्ये तुमच्या सर्व दुःखाचे दहन होऊन, रंगाप्रमानेच आपले जीवन नेहमी सर्व प्रकारच्या आनंदांनी आणि प्रेमाने परिपूर्ण होवो.

सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात देखील सुखाची सतत उधळण होत राहू दे हीच सदिच्छा पुनश्च तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रैगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगपंचमी शुभेच्छा

रंग उधळूया प्रेमाचा

जपूया ओलावा स्नेहाचा

टिकवूया गोडवा आपुलकीचा

मन रंगलेले

तन रंगलेले,

रंगात बेधुंद

क्षण रंगलेले…

सप्तरंगी रंगात रंगून जाऊ आज

अखंडपणे उमलुदे प्रेमाचे तरंग….

जोडुनी सारे नात्याचे रेषमाचे बंध

चला उधळुया मिळुनी आकाशी रंग…

रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

मायमराठी संस्कारांचा

मनामनात मृदंग हवा

लाल माझिया रक्तामध्ये

आपुलकीचा रंग हवा…

रंगात मिसळले रंग,

मन माझे रंगात दंग…

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगून जाऊ रंगात आता,

उठू दे मनी तरंग

सर्वांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगांचा हा गंध वेगळा पसरत जाई

उन्हा वाऱ्यात खेळावा तो गंध स्वेच्छा

 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा,,

प्रत्येक नातं रंगीबेरंगी असावं,

त्याला विशिष्ट छटा असावी।

रंग कोणताही असला तरी,

त्या नात्यात एक ओढ असावी ।

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

नवे ऋणानुबंध जोडुया, लावुनी रंग आपुलकीचा.

 सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तोडून सारे बंध सारे, उधळूया आज हे रंग

रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा…

पुन्हा एकदा आला हा रंगपंचमीचा सण

आजमनसोक्त रंगवेन मी प्रत्येक जण….

रंगून गेलंय रंगहीन होत जे माझ मन…

म्हणून मी म्हणतोय रंगू द्या आता तन

पळू नये कोणी जेव्हा लावेन मी रंग…

Just chill and भिजू द्या पूर्ण अंग…

करू नये अपमान रंगाचा करू नये त्याचा भंग….

मी तुमचा मित्र रंगेन तुमच्या संग…

जर हरकत कोणाची असेल काही…

त्याच्याशी मला देणं घेणं नाही…

रंगतील ह्या जेव्हा ह्या दिशा दाही…

मग मी का तुम्हाला रंगवायच नाही….

त्यालाच जास्त मी लावेन जो नाही नाही म्हणतो…

रासायनिक रंग आहेत वाईट हेही मी जाणतो.

मग भारी भारी इकोफ्रेंडली रंग लावायला मी आणतो…

तुम्ही मला रंगवले तरी त्यातही धन्यता मानतो

तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा।

काय तुमची पण आहे मला रंगवायची इच्छा?

बर मग तयार राहा माझा करायला तुम्ही पिच्छा..

तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा।

या होळीच्या पवित्र अग्नीत

नष्ट करूया अपप्रवृत्तींना आणि अंधश्रद्धांना..

मतभेद आणि वादविवादांना…..

निराशा आणि भीतीच्या राक्षसाला स्वार्थ आणि अहंकाराला…….

सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

FAQ

 प्रश्न : रंगपंचमी कधी असते?

 उत्तर: होळीनंतरच्या पंचमीला रंगपंचमी म्हणतात.

 प्रश्न: 2022 मध्ये रंगपंचमी कधी आहे?

 उत्तर: 22 मार्च रोजी

 प्रश्न: रंगपंचमीशी संबंधित धार्मिक श्रद्धा काय आहे?

 उत्तर : भगवान श्रीकृष्ण गोपिकांसोबत रंगपंचमी खेळतात.

 प्रश्न: रंगपंचमीची तारीख कोणती?

 उत्तर: 22 मार्च रोजी सकाळी 6:24 ते 23 मार्च रोजी सकाळी 4:21 पर्यंत

 प्रश्न: रंगपंचमीचे दुसरे नाव काय आहे?

 उत्तर: कृष्ण पंचमी

Sharing Is Caring:

Leave a Comment