प्रेम कविता मराठी | prem kavita in marathi | prem kavita marathi

prem kavita in marathi – आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येकालाच प्रेम होते ही भावना शब्दात व्यक्त करणे खूप अवघड जाते तिथे साथ मिळते ती कवितेची, प्रेम कविता मराठी मध्ये व्यक्त होताना इतक्या मोठ्या भावना या काही शब्दांत आपण पुढच्यापर्यंत पोहचवू शकतो, प्रेम कविता मराठी हे भावना व्यक्त करण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे आणि आपण आज वेग वेगळ्या प्रेमाच्या भावनांची, प्रेम कविता मराठी शायरी च्या माध्यमातून केलेली मांडणी आपण आज या लेखात बघू, जर या कविता तुमच्या मनाला जराही भिडल्या तरी आठवणीने टिप्पण्यांमध्ये कळविण्यास विसरू नका.

prem kavita in marathi

प्रेम कविता मराठी

जेव्हा पासून तुझ्याशी मैत्री केली,

मला जग आपलेशे वाटायला लागले,

याआधी कोणत्याही गोष्टीची सवय

नव्हती,पण आता जणू तुझी आठवण

येण्याचे रोगच लागले..!

मिठीत तू घेतल्यावर…

वेळ इथेच थांबावा,

कायमची मी तुझी

आणि तू माझा व्हावा.

मिठीत तू घेतल्यावर…

श्वास माझा मी विसरावा,

बिलगून तुझ्या हृदयाशी

माझ्या हृदयाने संवाद साधावा.

मिठीत तू घेतल्यावर…

सगळी जगाची चिंता सोडावी,

कायम मनात राहावी

अशी अविस्मरणीय भेट घडावी.

जणु डोळ्यासमोर दिसावी ती मला दारी,

फुलून जाओ मि पौर्णिमेच्या चंद्रावानी,

बघुनी मला खुदकन हसे ती मनोमनी,

वाटतंय सुरू होणार माझ्या प्रेमाची नवी कहाणी.

   🥰🥰🥰🥰🥰🥰🥰


हेही वाचा: चारोळ्या मराठी प्रेम कविता


तू तुझ्या घरात अस्खलित एकटेपणात व्यस्त होतीस,

घड्याळाचे काटे संथ हवेप्रमाणे आवृत्त,परावृत्त होत होते, 

तुला हे जाणवत होते कि,

जस डोक्यावरती कित्येक हाथोडे बरसत आहेत,

तुझ्या खुर्ची चे ते किर्र,भेदक आवाज,

तुझ्या एकटेपणावर जणू राक्षसी हसत होते !

इकडे मी माझ्या रंगीन आयुष्यात जगत होतो,

माझ्या दिशेने आयुष्य उगवत होते,

वसंत माझ्या आत्म्यात नांदत होता,

फुलांच्या बागा माझ्या डोळ्यांत सजत होत्या 

आनंद पूर्वेला उगवून माझ्या हृदयातच मावळत होता !

मग झालं असं कि एक दिवस तू भेटलीस,

भेटी वाढत गेल्या,

प्रेमाच्या वाटा असीम जिव्हाळ्यातून प्रवाहित झाल्या,

श्वास एकमेकांशिवाय उसना वाटू लागला,

मग रस्त्यात कुठूनतरी कस एक वळण आले,

स्वप्नांच्या जगातून धुकं गंधाळू लागले,

तू मला सोडून गेलीस,

तुझे हाथ पिवळे होऊ लागले !

आता काय,तू तुझ्या रंगीन आयुष्यात जगतीयेस,

मी माझ्या घरात अस्खलित एकटेपणात व्यस्त आहे !!!

_______________

सकाळी सकाळी तुमच्यासाठी

आम्ही उठून गच्चीवर यावं,

आईला अभ्यासाचा बहाणा सांगून

तुमचा wait करत बसावं.

मानतो आम्ही सुद्धा

की तुम्हालाही अभ्यास असतो,

पण तुमची एक झलक बघायला

आमचा जीव खूप तरसतो.

आमचं लक्ष नसताना

तिरक्या नजरेने बघता येतं,

अभ्यास करा म्हटल्यावर

लगेच पुस्तक दाखवता येतं.

दुर्लक्ष केलं तुमच्याकडे

तर ते ही सहन होत नाही,

थोडा वेळ ही दिसलो नाही आम्ही

तर तिकडूनही तुम्हाला करमत नाही.

_______________

मला तुझं पहिलं नी शेवटचं 

प्रेम व्हायचयं….,

मृत्यु तुझ्या मिठित नी आयुष्य 

तुझ्या सोबत काढायचयं….,

________ prem kavita in marathi______

दुःख तर आहेच कि तुझ्याविना विराण आहे मी 

पण हा विचार हि आहे कि तुझा कोण आहे मी 

बेचिराख आहे माझीच अस्मिता घरातच माझ्या 

गर्द मैफिलीत तुझ्या नखशिखांत मौन आहे मी 

तू आहेस, होतीस,असशील विश्व माझ्यासाठी 

तुझ्यासाठी त्या विश्वात फक्त एकजण आहे मी 

कुणास ठावे त्या दिवशी माझं नाव तू कस घेतलं 

सगळ्यांना जाणवलं कि तुझा प्रियजन आहे मी 

पोहोचलो तुझ्या दारावरती तर असं जाणवलं कि,

लांब एका रांगेत उभा असणारा निर्जन आहे मी 

तू अतितृप्त,विलसित जेवणाचं भरलेलं ताट आहे,

तुझ्या खरकट्या ताटातलं खरकटं द्रोण आहे मी  

जागा स्वाभिमान सांगतो विसर तिला अनिल पण 

अजूनही तुझाच आहे एकटा नाही दोन आहे मी


हेही वाचा: Poem in marathi on love | मराठी प्रेम कविता


      ❣️प्रेमरंग ❣️

💙💚💛💜❤️

प्रेमात भिजवून जानारा हँप्पी होली म्हनत तो तिला 

मागून बिलगलाआणि तिच्या उरल्या सुरल्या देहाच उत्तर झाल 

तिच्या गालावर त्याने लावलेला 

त़ो गुलाल त्याने अलगद 

टिपून घेतला काऴजात त्याच्या घामाच्या धारांनी 

तिचा चिकट़ झालेला पदर 

तिला सुंगधी वाटू लागला

 तेव्हा देहभर कस्तुरी सम दरवळली 

ती तिचा विरोध नाही हे पाहून 

त्याने तिचा मानेवर रेगनारे केंस बाजूला

 अलगद सारलेआणि तिच्या मानेवर अलगद चु़ब़न घेतले

तिच्या मानेवरचा मादक रंग सोड 

कोनीतरी पाहील 

ख़ूप चावट झाला आहेस तू 

ती हे सग़ळ बड़ेबडेच म्हनाली

 पण फारसा विरोध केला नाही 

श्वासांची गती वाढ़त राहीली

 तिची आणि त्याच्या हीआणि सागराला भरतीच्या

 लाटा सुरू झाल्या

प्रत्येककाच्या आयुष्यात असच कोनीतरी स्पेशल असत !!

___________

“❤️असेही एकदा व्हावे❤️

शांत मनाचे वादळ सुटावे

अबोल भावनांचे वारे वाहावे

अन् हळूच तु झुळूक देऊन जावे

❤️असेही एकदा व्हावे❤️

नजरेत तुझ्या मीच दिसावे

ओठी तुझ्या माझेच नाव असावे

ह्रुदयात तुझ्या मीच स्पंदन घ्यावे

❤️असेही एकदा व्हावे❤️

नदी मी किनारा तु व्हावे

त्या नितळ पाण्यासारखे

सख्या मीही तुझ्या प्रेमात वाहून जावे

❤️असेही एकदा व्हावे❤️

असंख्य ताऱ्यात फक्त तूच दिसावे

मी तुझ्या अन् तू माझ्या स्वप्नी असावे

अन् तुला बघता मी हळूच लाजून जावे

❤️असेही एकदा व्हावे❤️

तु प्रियकर मी प्रियसी व्हावे

मी तुझ्या,तू माझ्या प्रेमात पडावे

शेवटच्या क्षणी मी तुझ्या मिठीत विसावे

❤️असेही एकदा व्हावे❤️

– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)”

______ प्रेम कविता marathi _____

भान गवसले स्थिरले रुपावरी

शब्द फुटेनासे हरपले क्षितिजावरी

ओठांनी भिजले मन जणू काठावरी

भाळले वेडे कसे केव्हा कुणावरी

ते नयन बोलले काहीतरी…

                प्रेमकिरण उधडले भिडले मेघासही

                तेथून बरसले संचारले रोमांच तनुवरी

                काळीज धडकले विखुरले अन् भूवरी

                रंजनात रमले हरवले मग युगलातही

                ते नयन बोलले काहीतरी…

शरमेने झुकले नयन पाणावले किंचितही

हास्य बोलके निरागस अवतरले गालावरही

डोह भरले आनंदाचे अदभुत चैतन्य देहातही

बंधनात या अडकले स्वच्छंदी हे जीवही

ते नयन बोलले काहीतरी…

               क्षण हे फुलले झाले रेशमी सुगंधितही

               मन अन् जुळले तन अवचितही

               सप्तरंग झळकले चांगले आकाशी

               प्रेमहंस विहरले सुखात उमलले कमळही

               ते नयन बोलले काहीतरी…

                                       –Amol Gade

___________

मी विसरले होते सगळं,त्यालाही विसरले होते…

पण तो दूर निघून जाताना मन काहीतरी सांगत होते…

स्वप्नातही यायचा तो तरी त्याला ओळखू शकत नव्हते,

रोज रोज प्रयत्न करूनही दूर जाऊ शकत नव्हते,

सगळ्यांना विसरले होते तरी तोच का आपलासा वाटे?

सार जग खोटं आणि त्याचा शब्दांवर विश्वास बसे…

हेच ते नात शब्दांचा पलीकडचं सतत हवं हवं वाटणार,

कोणते बंध होते आमच्यात आम्हाला कळलच नाही…

मी बेबंध होते आधीपासून त्याने मला बांधून ठेवले,

मैत्रीची मर्यादा जपूनच मला आपलंसं केलं…

आयुष्याचा पुस्तकातली ती सर्वात सुंदर गोष्ट होती,

पूर्णत्वाकडे चालू लागली गोष्ट त्याची अन् माझी…

                                              Jagruti Pujare

“नजरेसमोरून जाताना 

त्या नजरेतच सामावलास,

नजर एकरूप होताना 

नयनपुष्पीच विसावलास…

बोलत बोलत हे चंचल मन

आपसूकच जाणून घेतलस,

माझ्या मनीचा मनकवडा होऊन 

मनाच्या घरट्यात स्थिरावलास…

माझ्या दुःखात मला आनंदी केलस

माझ्या सुखात स्वतःचाही आनंद शोधलास,

ह्रदयातल्या तुझ्या निश्चल विसाव्याने

नकळतच माझा होऊन गेलास…

माझ्यात तु अन् तुझ्यात मी दिसेपर्यंत 

विचारांची झाली देवाणघेवाण, 

तुझ्यातच माझं प्रतिबिंब निरखलं 

हरपून सारं देहभान…”

                             रुचा…❤

______ प्रेम कविता sms marathi _____

“प्रेम आयुष्यात आल्यावर…..❤️💝💫

प्रेम आयुष्यात आल्यावर

जगणं मात्र बदलून जातं…..

सर्वस्व ओवाळून टाकावं 

इतकं कुणी आवडून जातं…..

दोन आत्म्यांच मिलन 

प्रेम भेटता होऊन जातं…..

ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव

त्यालाच प्रेम कळून जातं……

बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे

वेड्यांचं जग होऊन जातं…..

❤️❤️❤️”

                  Tanu ❣️

___________

“तुझी नी माझी भेट ती स्मरली, 

रोमांचित हे झाले तन मन।

कातरवेळी छळू लागली, 

मला सख्या रे तुझी आठवण।

धुंद फुलांचा गंध पसरला, 

गंधाळले ह्रदयाचे स्पंदन।

हवाहवासा स्पर्श तुझा तो, 

आठवला अन शहारले मन।

वाऱ्यावरती भास तुझे अन, 

कणाकणावर तुझेच शासन।

जगावेगळे नाते अपुले, 

जसे वाटते रेशीम बंधन।”

                               Nilam

___________

“तुझ्या प्रेमाच्या जगात रमलेली मी इथे आहे

शोधू नकोस कुठेही थांबलेली मी इथे आहे

तुझ्या आठवणींच्या अवकाळी पावसात

चिंब भिजलेली मी इथे आहे

प्रेमाची उब देणाऱ्या तुझ्या हृदयात

प्रेम स्पर्शाने वसलेली मी इथे आहे.

माझ्या डोळ्यात साठवून विरहाचा पूर सारा

प्रेम नदी बनून वाहलेली मी इथे आहे.

तुझ्या प्रेमाच्या कोऱ्या कागदावर निळ्यागर्द शाईने

कवितेतील अलंकाराने सजलेली मी इथे आहे.”

                                                         🅢︎🅤︎🅜︎🅘︎🅣︎ 🅡︎🅐︎

___________

“मनाच्या कोपर्‍यात जी सलते

ती जखम साजणा भरेल का?

तुझ्या नि माझ्या नात्यामधली

काळरात्र ही कधी सरेल का?

हळू  हळू जे उडून  गेले

ते प्रेम पुन्हा अवतरेल का?

जुनी शपथ जी विसरून गेलो 

मनांस अपुल्या ती स्मरेल का?”

                                  Nilam

___________

जपलंस मला तू

पुस्तकातल्या मोरपिसासारखं

अलगद जवळ घेतलंस 

गुलाबाच्या फुलासारखं

मोरपिसातील रंग जणू उधळून लावले मनी

गुलाबाच्या स्पर्शाने धुंद झाले या क्षणी

आलास तू जवळी असा 

चिंब ओली मी झाले

आपल्या प्रेमाचे क्षण हे

अलगद तुलाही जाणवले

गुणगुणले गीत सवे

दोघांनी गायिले

प्रेम नाही प्रेम नाही म्हणता

शेवटी शब्द ओठांवर उमटले

किती गोड क्षण तो

मी प्रत्येक क्षण अनुभवला

कणात कणात आवाज तुझा

जणू कोरून ठेवला

गुलमोहर असा हा

अनंत असाच राहूदे

त्याच्या फुलांचा सडा

फक्त मला वेचूदे

                    Aakanksha Mali

___________

मराठी प्रेम कविता

“अवखळ वारा,थंड गारवा 

मौन गोठले,नयनात चांदवा.

नव आयुष्य, नवीन वाटा 

पाय मातीत,जुनाच काटा

स्वप्न सारे,आवेग आशेचा 

हात जुनाच सोबती हवा.

चाहूल नवनगरीची 

सुख,दुःख एकत्र आभासी.

भासास आभास होतो 

या आभासी जगाचा.

स्मरणात श्याम,त्यागात राधा 

चालती आहे नवीन वाटा 

चालती आहे नवीन वाटा.”

                           Shalini Wagh

___________

“मौनाचे बंधन सोड जरासे बोल तू 

डोळ्यांमधून दे ना मनाचा कौल तू 

कळ्या उमजून आल्या कधीच्या

लाजेचा पडदा आतातरी ग खोल तू

हवेमधे उधळून दे जरा गंध तुझा

बनू दे ना आता प्रेमाचा माहौल तू

विरहाच्या ऊन्हात सुकेल स्वप्न हे

दे प्रितीचा पाऊस अन दे ओल तू”

                                     Nilam

“हरवतो मी माझ्याच विचारात पण काही समजतच नाही…

 मनाला ही विचारून पहिले उत्तर काही भेटले नाही… 

प्रश्न तसा खूप सोपा होता उत्तर उमगलेच नाही… 

ओठांपर्यंत आलेले उत्तर मनाने कधी मानलेच नाही…

फिरून पुन्हा तिथेच आले मनाचे कोडे सुटतच नाही…

काय आहे हे नेमके?? माझे मलाच कळत नाही…

प्रेम आहे की फक्त तुझा आभास हे ही मी जाणत नाही…😊”

                                                               अंकुश लोखंडे

___________

तुझ्याशी बोलताना मी मालाच विसरते,

नकलत मग्रॅ मझ्या गालावर खळी पडते,

प्रेम म्हणजे नक्की काय आहे,

हे जाणून घेण्याची मन सतत तयारी करत असते,

कोण आपल्याबादल काय विचार करते

याची पर्वा नसनरी मी तुझे मन जानून घेण्यासाठी आसूसलेली असते,

स्वप्नांचे ढग येऊन जाते,

अलगद माझ्यावर तुझ्या प्रेमाचा वर्षाव करते,

का मन हे माझे तुझ्यावर इतके प्रेम करते .

                                       Tejal Adbal

___________

______ prem kavita _____

गंध गंध प्रेमाच्या पुष्पात 

दरवळत नात तुझं माझं

मुक्त मुक्त आभाळ जस

स्वच्छंद मैत्र तुझं माझ

प्रिय प्रिय सहवास तुझा

हवाहवासा स्वर्ग सुखाचा

प्रेम प्रेम वाढते रोज अन् 

सोहळा होतो जीवनाचा

मधुर मधुर प्रीत ही तुझी

सुखाच्या जणू पाऊसधारा

विरले विरले तुझ्यात अशी

जशी भेटते नदी प्रेमसागरा 

गोड गोड आठवणी अशा

आठवणीने व्याकुळ होतील

दूर दूर अंतर असले जरी

मनाने नित्य बोलक्या होतील

ओढ ओढ भेटीची आपल्या

अन् साक्ष असतील चंद्र तारे

मिठीत तुझ्या जग भासे माझे

आज झाले हे हळवे क्षण सारे

सावली सावली तुझी मी सख्या

आरसा तू माझ्या प्रतिबिंबाचा

भाग्य भाग्य लाभले पत्नी होऊन

प्रेमबंध जुळला साताजन्माचा.

                             🅢︎🅤︎🅜︎🅘︎🅣︎ 🅡︎🅐︎

🌹प्रेम🌹

मनाची व्यक्तता भावनेतून उमलते

नजरेतून बोलते . .. . .

प्रेम अगाध, अचाट, अमर्याद असते 

नजर असूनही आंधळ असते तितकंच फसवं

नजरेने पाहिले तर चरा चरांत दडलेलं दिसतं

हृदयातून हसतं तरीही एकाकी असतं

प्रेमाला उपमा नाहीत ते कसंही असतं

तरीही स्वतः पुरतं मर्यादित कधीच नसतं

कितीही भरभरून घेतलं तरी कमीच पडतं

अबोला तून बोलतं, लपवून लपतं नसतं

ते जगच निराळं असतं

असामान्य अस फक्त ते एकच असतं

कितीही दाखवलं तरी दिसत नसत ते फक्त जाणणावं लागतं .

असं एक प्रेमच असतं …

Jayshree Jadhav

मी तुझ्यावर प्रेम करतो, 

हे ओठवर आणता येत नाही, 

प्रेम असाच असत, 

हे शब्दात सांगता येत नाही

                  Vishal Lokhande

___________

आपलं नातं अस 

नदीचे दोन काठ,

आतुरता कायम भेटीची 

पण मी रात्र तू पहाट

                Arjun Rathod

______prem kavita marathi_____

तुमच्या कविता तुम्ही आम्हाला लिहून पाठवू शकता आम्ही इथे त्या तुमच्या नावासकट पोस्ट करू – कविता पाठवा

Sharing Is Caring:

1 thought on “प्रेम कविता मराठी | prem kavita in marathi | prem kavita marathi”

Leave a Comment