लोक ब्लॉग का सुरु करतात? | Why People Start a Blog

लोक ब्लॉग का सुरु करतात: यापूर्वी आयुष्य कधीच तंत्रज्ञानात इतकं गुरफटलेलं नव्हतं. यापूर्वी लोकांनी इतकं तंत्रज्ञान कधी पाहिलंच नाही. अजूनही अर्ध्याधिक सामान्य लोकांसाठी “गुगल” म्हणजेच संपूर्ण इंटरनेट आहे. पण सत्यता तर हीच आहे कि गुगल व्यतिरिक्त इंटरनेटवर आहेत अनेक स्ट्रीमींग चेनल, न्यूज वेबसाईट, माहिती आणि मनोरंजन वेबसाईट, टूल्स आणि ब्लॉग्स. आज आपण अर्थातच ब्लॉग बद्दल बोलणार आहोत. जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पिढीतील व्यक्ती आता ब्लॉग लिहितो आणि तो ब्लॉग लिहिण्यामागे प्रत्येकाचे वेग वेगळे कारणं आहेत.

लोक ब्लॉग का सुरु करतात

लोक ब्लॉग का सुरु करतात

एखाद्याला सल्ल्याची गरज असते; तर एखादा आपला वैयक्तिक अनुभव सामायिक करतो.

ब्लॉगच्या जन्मासह, पारंपरिक लिखाण आता मागे ढकलल्या गेले आहे. शाईची जागा आता कीबोर्डने घेतली आहे आणि ब्लॉग लिहिण्यामागे प्रत्येकाचे वेग वेगळे कारणं आहेत. एकाच वेळी जगभऱ्यातील वाचकांना आकर्षित करण्याची चढाओढ देखील सुरु झाली आहे.

सर्वसाधारणपणे, ‘ब्लॉग’ (English : Blog) चा अर्थ वैयक्तिक ऑनलाइन डायरीचा अर्थ असा होतो, सहसा बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड बद्दलच्या समस्या किंवा टेक्नोलोजी संबंधित बातम्या लिहिण्यासाठी याला वापरलं जायचं. वाचा ब्लॉग कसा सुरु करायचा.

परंतु 11 सप्टेंबरनंतर या संपूर्ण क्षेत्रात कमालीचा बदल झाला. (११ सप्टेंबरचा संपूर्ण अहवाल आणि मत)

जसं मी सुरुवातीलाच म्हटलं कि ब्लॉग लिहिण्यामागे प्रत्येकाचे वेग वेगळे कारणं आहेत; त्यावर एक नजर

हेही वाचा :

ब्लॉगर डॉट कॉम वर फ्री ब्लॉग कसा बनवतात | How to make free blog on blogger in marathi

how to create wordpress blog in marathi

नेटवर्किंग:

जागतिक स्तरावर किंवा स्थानिक पातळीवर नवीन लोकांना भेटण्याचा ब्लॉग एक चांगला मार्ग आहे. ब्लॉगिंग भौगोलिक सीमांच्या पलिकडे कल्पना आणि कनेक्शन पसरविण्यात मदत करते. आपण आपल्या मित्रांसह, कुटुंबास किंवा चाहत्यांसह समाजातल्या विशिष्ट समस्यांबद्दल आपल्याला काय वाटते हे त्यांना सांगण्यासाठी आपण कनेक्ट राहू शकता. आपण त्यांना त्यांच्या मताबद्दल विचारू शकता किंवा त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण गोष्टी समाविष्ट करू शकता. ब्लॉगद्वारे आपले नेटवर्क कसे वाढवायचे याबद्दल तुम्ही तुषार भांबरे यांची ब्लॉग पोस्ट वाचा.

छंद/आवड:

ब्लॉगिंग सुरू करणारे हे सर्वात सामान्य कारण आहे. बऱ्याच लोकांना लिहायला आवडतं आणि त्यांना स्वतःसाठी लिहायला आवडतं (जसा मी). अगदीच हेच तर ब्लॉगिंग आहे. याच करणारे ब्लॉगिंग सुरु झालं आणि याच कारणामुळे आजही ब्लॉगिंग अस्तित्वात आहे. म्हणायचं झालं तर ब्लॉग म्हणजे आपली ऑनलाईन एक जागा आहे जी आपण फक्त लिहिण्यासाठी राखून ठेवली आहे. अशे ब्लॉगर्स सर्वोत्तम ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म, अधिक ट्राफिक कशी मिळवावी आणि चांगल्या पोस्ट कश्या लिहाव्या ज्याने जास्त शेयर मिळतील या सगळ्याची काळजी करत बसत नाही; फक्त लिहिणे – हेच एकमात्र ध्येय.

प्रसिद्धी/लोकप्रियता:

जेव्हा आपण कोणत्या यशस्वी माणसाला तेव्हा आपण त्या मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो आणि असा फक्त मीच नाही तरही मानवी प्रवृत्ती आहे. सचिन तेंडूलकरला खेळताना पाहून क्रिकेटर होण्याचं तर अमिताभ बच्चनला पाहून सिनेमात नट होण्याचं स्वप्न वेळोवेळी येत रहायचं. आणि ब्लॉगिंग क्षेत्रातही यात काही नवीन झालं नाहीच. हर्ष अग्रवाल, अमित अग्रवाल किंवा इतर ब्लॉगर जसे पैसे कमावतात तसंच आपणही कमविण्याचा आणि त्यांच्यासारखे होण्याचा लोकं प्रयत्न करतात. हा कोणता वाईट दृष्टीकोन नाही, मुळीच नाही; परंतु आपण हे कधीच विसरू नये कि ते लोकं आपल्या शेत्रात इतके मोठे झे कारण त्यांनी ब्लॉग सुरु केला आपल्या आवडीमुळे आणि त्या क्षेत्रात काम करण्यासाठी असलेल्या उत्साहामुळे. ब्लॉगिंग काही लवकर लोकप्रिय आणि प्रसिद्ध होण्याचा मार्ग नाहीये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला माफ करा पण तुम्ही खरंच आपली दिशा विसरले आहात.

पैसा:

बहुतांश लोकांनी एखाद्या हर्षसारख्या मोठ्या ब्लॉगरकडे बघितलं तर त्यांना वाटते कि “मला तर फक्त २-४ गोष्टींबद्दल लिहायचं आहे; ४-५ बटन क्लीक केल्या कि पैसेच-पैसे” चूक; बिलकुल चूक. बरेच लोकं पैश्यांसाठी ब्लॉगिंग सुरु करतात आणि जेव्हा तुम्हाला ब्लॉगमधून पैसे कमवायचे आहेत तर मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतो “जर तुम्हाला त्या क्षेत्रात आवडत नाही, नवीन गोष्टी जाणून घेण्याचा उत्साह नाही, उत्कटता (English: Passion) तर पैसे कमविणे खूपच कठीण होऊन जाईल”. ऑनलाईन मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ब्लॉगिंग हे सोन्याची खाण होऊ शकते पण त्यासाठी गरजेचे आहे तुमचं योग्य ते नियोजन आणि प्रयोजन.

ज्ञान वाढविणे:

आजच्या स्थितीत इंटरनेटवर जवळपास ५ लाख ते ७ लाख ब्लॉग उपलब्ध आहेत. जवळजवळ प्रत्येक विषयावर आणि प्रत्येक भाषेत. या ब्लॉग्सवरून तुम्ही माहिती मिळवू शकता आणी तुमच्याकडे असलेल्या ज्ञान सुद्धा इतरांशी वाटून घेऊ शकता. क्षेत्रात असलेली नवीनतम माहितीसह नियमितपणे ब्लॉग अद्ययावत करणे विशिष्ट क्षेत्रात किंवा विषयातील कार्यक्रमांच्या बरोबरीने राहण्याचा आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा परिपूर्ण मार्ग आहे. काही गोष्टी आहेत ज्या ब्लॉग लिहिताना लक्षात ठेवल्या जातात. ब्लॉगवर नवीनतम माहितीसह नियमितपणे अद्यतनित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळोवेळी त्याला अद्यतनित (English: Update) केलं नाही तर याचा अर्थ ब्लॉगरसाठी कमी विश्वासार्हता (English: Credibility) आणि ब्लॉगवर रहदारी (English: Traffic) देखील कमी होऊन जाईल.

इतरांना मदत करण्यासाठी:

हे एक कारण आहे कि मी हा कलमवाला.इन ब्लॉग सुरु केला. लोकांना विशिष्ट टप्प्यात किंवा परिस्थितीत असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी ब्लॉग सुरु करणे, ब्लॉग सुरु करण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. इतर अनेक गोष्टींप्रमाणेच ब्रेक-अप, रोग, पालकत्व, नैराश्यासारख्या विषयावर वैयक्तिकपणे बोलणे जरा कठीण आहे. या विषयांवर लिहिलेले ब्लॉग अशा लोकांसाठी उपचारात्मक रूपाने काम करतात. कुणी मराठी ब्लॉग लिहिणाऱ्यांना मदत करण्यासाठी तर कुणी वर्डप्रेस कसे वापरायचे  याबद्दल मदत करण्यासाठी ब्लॉग सुरु करते. हे सगळं वाचून त्यांना असेही वाटते की अशाच अवस्थेमधून तेच एकटे नाहीत, परंतु त्याच परिस्थितीतून जात असलेल्यांची संख्या बरीच आहे.

नवीन नोकरी शोधण्यासाठी:

ब्लॉग एका व्यक्तीचा ऑनलाइन पोर्टफोलिओ देखील असू शकतो. लोकं ब्लॉग तयार का करतात याचे हे एक नवीन आणि महत्त्वाचे कारण आहे. समजा तुम्ही प्रोग्रामर आहात जो व्यक्ती वेबसाइट तयार करण्यात पटाईत आहे किंवा Android अप्प्लीकेशन बनविण्यात अनुभवी आहे, तर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता आणि प्रोग्रामिंग-Android संबंधित विषयांवर पोस्टिंग सुरू करू शकता. यामुळे जर भविष्यातील संभाव्य नियोक्ता तुमच्या वेबसाइटवर आला तर होऊ शकते तो तुम्हाला त्याच्या एखाद्या प्रोजेक्टचं काम देईल. हा नोकरी शोधण्याचा आणि जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर तुमच्यासाठी नवीन आणि जास्तीत जास्त काम शोधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

जागरुकता निर्माण करण्यासाठी किंवा आपला आवाज ऐकण्यासाठी:

ब्लॉगिंग करण्यामागे हे देखील एक कारण आहे. कधी-कधी काहीतरी मोठे सुरु करण्यासाठी एक सोपं आणि लहानसं पाउल उचलावं लागतं. बरेच ब्लॉग वेगवेगळ्या समस्यांवर आधारित आहेत, याचा अर्थ असाच आहे कि ब्लॉगर विशिष्ट दिशेने लोकांच्या विचारसरणीवर मात करण्यासाठी माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहे. बऱ्याच राजकीय ब्लॉग आणि सामाजिक समस्यांविषयी ब्लॉग लिहितात जे स्वत: च्या मार्गाने समाजात आणि समाजाच्या विचारधारेत फरक पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे ब्लॉग लोकांना एकत्र आणतात आणि एकमेकांशी कनेक्ट करतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणताही अन्याय आढळला आणि आपण त्याबद्दल आपल्या ब्लॉगवर आवाज उठवावा जेणेकरून बरेच लोक त्यास प्रतिसाद देतील आणि कदाचित तेथूनच एका लढ्याला सुरुवात होईल.

जाहिरात आणि ब्रँडिंग:

अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येचा मोठा भाग इंटरनेटचा भरपूर प्रमाणत वापर करत असल्याने, बऱ्याच कंपन्या ब्लॉगला आपल्या कंपनीच्या जाहिरात करण्यासाठी आणि त्यांच्या कंपनीची जाहिरात करण्यासाठी उपयोगात आणत आहे. ब्लॉगद्वारे त्यांच्या उत्पादनांवर पुनरावलोकने (English: Reviews) देखील मिळू शकतात. ब्लॉगिंग हा तुमच्या उत्पादनांच्या ब्रँडिंगसाठी हा एक उत्कृष्ट मंच आहे. तुम्ही आपल्या उत्पादनांबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल लिहित चला. ते कसे काम करतात, त्याबद्दल सांगा. ते बाकी उत्पादनांपेक्षा कसे वेगळे आहेत आणि तुम्ही ते का घ्यायला पाहिजे याबद्दल लिहा. भविष्यात लॉन्च होणार्या नवीन उत्पादनांबद्दल वाचकांना सूचित करा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. याने तुमच्या व्यवसायात नक्कीच वृद्धी होईल.

संपर्कात राहण्यासाठी:

ब्लॉगिंग सारखी विचारधार असणाऱ्या आणि समान क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा करण्याची आवड असणाऱ्या लोकांना एकत्रित आणण्याचे काम करते. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयावर ब्लॉग तयार करता आणि लिहायला सुरुवात करता तेव्हा त्या विषयाशी निगडीत लोकांचं एकत्रीकरण तुमच्या ब्लॉगवर केल्या जाते. कधीकधी ते तुम्हाला तुमचे विचार पुढे घेण्यास मदत करतात. ब्लॉगद्वारे बऱ्याच कल्पनांचे सामायिकरण होते जे ब्लॉगशिवाय शक्य झालेच नसते. तुमचा वैयक्तिक ब्लॉग हा देखील तुमच्या परिवार आणि मित्रांच्या संपर्कात राहण्याचा एक चांगला माध्यम आहे ज्यांना आपण दररोज पाहू शकत नाही.

पण या पलीकडे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि तुमचा उत्साह आणि आवड हा ब्लॉगिंगचा आत्मा आहे.

तुमच्या ब्लॉगचे वाचक कोण आहेत हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ब्लॉग तुम्ही लिहावा. तुमच्या ब्लॉगने तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित केले पाहिजे; अश्या गोष्टीवर नाही जे त्यात तुमचा भाग नाही.

Sharing Is Caring:

1 thought on “लोक ब्लॉग का सुरु करतात? | Why People Start a Blog”

Leave a Comment