गुगल फॉर्म कसा बनवतात | How to make google form in marathi

गुगल फॉर्म कसा बनवतात


गुगल फॉर्म कसा बनवतात

गुगल फॉर्म कसा बनवतात: गुगल फॉर्म हे गुगल चे फ्री टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही विविध प्रकारचे forms बनवू शकता हे जसे की तुम्ही जर शिक्षक असाल तर गुगल forms वापरून प्रश्नोत्तरी बनवू शकता, एखादा व्यवसाय चालवत असाल तर google forms वापरून ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेऊ शकता, एखाद्या निवडणुकी आधी जनतेचा अभिप्राय मिळवू शकता, एखाद्या शिबिराची नोंदणी करवून घेऊ शकता, अशाप्रकारे अनेक कामे तुम्ही गुगल फॉर्म्स वापरून अगदी मोफत करू शकता.

google form kasa tayar karaycha 

वरील सर्व उदाहरण आहेत त्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गुगल फॉर्म चा वापर करू शकता, आपण या लेखात गुगल फॉर्म्स चे काही नमुने कसे बनवायचे ते बघणार आहोत यातून तुम्हाला google forms कसे बनवायचे याची पूर्ण कल्पना येईल आणि तुमच्या मनात गुगल फॉर्म्स विषयी काही शंका राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो.

Google form free madhe kasa banavtat?

नमुना पहिला – google forms मध्ये प्रश्नोत्तरी कशी तयार करतात?  गुगल फॉर्म ऑनलाइन टेस्ट 


https://google/forms/ या वेबसाईट वर गेल्यानंतर जर तुमचे गुगल अकाउंट लॉग इन नसेल तर लॉग इन करायला सांगितले जाईल, login केल्यानंतर तुम्हाला फॉर्म बनवण्याचे सर्व टूल्स option उघडतील, आपण सगळ्यात आधी प्रत्येक टूल चा उपयोग हा खाली दिलेल्या screenshot च्या माध्यमातून समजून घेऊ.


आपण आता आपला पहिला प्रश्न google form मध्ये टाकूया त्यासाठी multiple choice हे जे आपोआप सीलेक्ट झालेले ऑपशन आहे आपण ते तसंच ठेवू कारण प्रश्नोत्तरी मध्ये आपल्याला विविध पर्याय द्यायचे असतात, तर मग आता खलील स्क्रीनशॉट बघा


तुमचा रिकामा गुगल फॉर्म अश्यायाप्रकारे दिसत असतो आता तुम्हाला तुमचा प्रश्न या फॉर्म मध्ये टाकायचा आहे त्यासाठी तुम्ही Untitled Question वर क्लीक कराल व तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये लिहाल, ok तर आता तुम्ही प्रश्न लिहिलेला आहे आता तुम्हाला या प्रश्नासाठी पर्याय द्यावे लागतील तर पर्याय देण्यासाठी option1 वर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे पर्याय लिहिता येईल, आता दुसरा पर्याय लिहिण्यासाठी तुम्हाला add option वर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यास option 2 हा पर्याय येईल मग त्यावर क्लिक करून तुम्हाला पुढील पर्याय लिहिता येईल अशाचप्रकारे तुम्ही add option चा वापर करून तुम्हाला हवे तितके पर्याय देऊ शकता, या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा प्रश्नोत्तरी cha google form बनवू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना पाठवू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment