How to change mobile font in marathi |मोबाइल फॉन्ट फ्री मध्ये कसा बदलावा?

How to change mobile font in marathi

How to change mobile font in marathi

How to change mobile font in marathi: आज आपण खूप interesting विषयाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे मोबाईल च्या फॉन्ट ची स्टाईल फ्री मध्ये कशी बदलायची, आपण आपल्या ब्लॉग वर याआधी पाहिलं की पिकस आर्ट मध्ये कॅलिग्राफी फॉन्टस कसे इन्स्टॉल करायचे, आणि ब्लॉगर डॉट कॉम वरील ब्लॉग चा फॉन्ट कसा बदलायचा पण आज आपण आणखी एकदा फॉन्टविषयीच 

बोलणार आहोत पण यावेळेस आपण मोबाईल फॉन्ट फ्री मध्ये बदलण्याविषयी बोलणार आहोत आणि मला माहित आहे याबद्दल कुतूहल बऱ्याच जणांना आहे.

हा विषय तसा बघितला तर अवघड पण आपण सोपी पद्धत वापरून मोबाईल चा फॉन्ट बदलण्याचा प्रयत्न करू,

वाचा: 100 पिक्स आर्ट साठी स्टायलिश मराठी फॉन्टस

सुरवातीला android Mobiles फक्त मूळ android operating system सोबत यायचे पण आता प्रत्येक कंपनी आपल्या phone मध्ये स्वतःची  एक os ज्याला विविध नाव दिलेले असते, आणि चिनी कंपन्या मूळ अड्रॉइड मध्ये खूप बदल करतात, स्वतःची सिस्टीम टाकून त्याद्वारे वापरकर्त्यांना  थिम्स फॉन्टस आणि वॉलपेपर्स आणि इतर उत्पादने विकणे हे त्यामागचे उद्दिष्ट असते. 

पण पैसे देऊन मोबाइल फोन घेऊनसुद्धा प्रत्येक गोष्टीला पैसे देणे हे मलातरी खूप अन्यायाचे वाटते. त्यासाठी आपण आजचे हे tutorial  बघणार आहोत जेणेकरून mobile phones चे  सर्व फीचर्स आपल्याला फ्री मध्ये वापरता येतील आणि तो आपला हक्क सुद्धा आहेच मला असं वाटतं.

चला सुरुवात करूया.

सगळ्यात आधी तुम्ही Google Play Store  ला जाऊन  zFont 3 नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या, आता यानंतरच खरी गंमत आहे.


हे ऍप डाउनलोड करून उघडल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रीनशॉट मध्ये दिसत असलेल्या Dashboard या पर्यायावर क्लिक करायचे आहे 


Dashboard या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे फॉन्ट डाउनलोड करण्याचे पर्याय दिसतील पण गफलत होऊ नये म्हणून तुम्ही English या पर्यायावर क्लिक करा इथे तुम्हाला सर्व स्टँडर्ड इंग्रजी फॉन्टस मिळतील.


english या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर इंग्रजी फॉन्टस मिळतील, उदाहरणार्थ  सॅमसंग मध्ये बघायला मिळणारा rosemarry font 


आता font install करण्यासाठी तुम्हाला आवडलेला कुठल्याही फॉन्ट वर क्लिक करा, फॉन्ट वर क्लिक केल्यानंतर त्या फॉन्ट च्या details दिसतील आणि खाली downlod चा पर्याय दिसेल Downlod बटणावर क्लिक करून फॉन्ट डाउनलोड करा.


आता फॉन्ट डाउनलोड झाल्यावर apply बटण  दिसेल, फॉन्ट apply करण्यासाठी apply बटणावर क्लिक करा 


apply बटणावर क्लिक केल्यावर स्क्रीन वर काही instructions येतील आता change font वर क्लिक करा.


इथून पुढची प्रोसेस प्रत्येक मोबाइल ब्रँड नुसार थोडीफार वेगळी असू शकते, खलील प्रोसेस ही vivo phones साठी आहे, इतर ब्रँड मध्ये तुम्हाला फॉन्ट इन्स्टॉल करम्यात काही अडचण आल्यास कॉमेंट मध्ये कळवा

– Font change करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या थीम नावाच्या ऍप मध्ये आपोआप पाठवले जाईल आता या ऍप मधून Local fonts या पर्यायावर जा.👇


custom font जिथे दिसेल त्यावर क्लिक करा 👇


custom zFont वर क्लिक केल्यानंतर तो फॉन्ट उघडेल आता apply या पर्यायावर क्लिक करा👇


झालं…तुम्ही तुमच्या आवडीचा font तुमच्या फोन मध्ये यशस्वीरीत्या install केलेला आहे..

मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा?…लवकरच येत आहे..

वाचा: Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट

Sharing Is Caring:

Leave a Comment