independence day greetings in marathi
सगळ्यात आधी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे थोर पुरुष लढले झगडले त्यांचे बलिदान हे आपण कधीच विसरू शकत नाही, भारताच्या या सुवर्ण दिवसाचे स्मरण नेहमी ताजे राहावे त्यासाठी आपण स्वातंत्र्यदिन हा आपला राष्ट्रीय सण दरवर्षी साजरा करतो व आपल्या देशाचे सैनिक जे आपल्यासाठी सीमेवर तैनात असतात त्यांचे आपण आभार या दिवशी मानतो,आणि जे लोक आपल्या देशहिताचे व देशाचा मान उंचावणारे कार्य करतात त्यांना आपण यादिवशी सन्मानित करतो,
या दिवशीचा आनंद साजरा करण्यासाठी आपण विविध Social Media वर शुभेच्छा संदेश share करत असतो, पण हा दिवस जितका आपण भरतीयांसाठी खास आहे तितकेच खास आपले independence day greetings असायला हवे असे मला वाटते आणि त्यामुळेच आज मी High quality Independence day greetings आणि Independence day quotes इथे शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही independence day message in marathi कॉपी किंवा Download karun सर्व भारतीयांना Social Media च्या माध्यमातून शेअर करू शकाल.
Independence Day Quotes In Marathi
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजेस्वतःच्या इच्छेनुसार मुक्तपणे जगता येणं..स्वतःचे निर्णय स्वतः घेता येणं...आयुष्याचा मनमुराद आस्वाद घेता येणंथोडक्यात माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावरकुणाचं ही कसल्याही प्रकारचंबंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य.....
स्वातंत्र्याची गोड गाणी आनंदाने गावीस्वातंत्र्याची कहाणी काळजात रुजवावीस्वातंत्र्याची पर्वणी नयनांत साठवावीस्वातंत्र्याची देववाणी शब्दांत आळवावीस्वातंत्र्याच्या अंगणी दीनांना सेवा द्यावीस्वातंत्र्याच्या गगनी मंगल प्रार्थना करावीस्वातंत्र्याच्या शुभ दिनी बलिदाने स्मरावीस्वातंत्र्याच्या पूजनी समता बंधुता जपावी.
कित्येक दिवस भोगत होती भारतमाता पारतंत्र्यशूरवीरांच्या बलिदानाने मिळाले हे स्वातंत्र्यक्रांतिकाऱ्यांच्या अहोरात्र कष्टाचे फळ हे स्वातंत्र्यरक्तरंजित इतिहास हिचा लढून मिळाले हे स्वातंत्र्यक्रांतीच्या धगधगत्या ज्वालेत जळून मिळाले हे स्वातंत्र्यकिंमत करा याची असेच नाही मिळाले आपुल्याला स्वातंत्र्यफक्त आजच नाही तर रोज अभिमानाने गा हे स्वातंत्र्य
तुटतील जेव्हा स्त्रीच्या साऱ्या बेड्यासुटतील बुरसटलेल्या विचारांच्या खोड्यादेशद्रोही, भ्रष्टाचारी यांच्या येतील हाती नाडयातेंव्हा स्वातंत्र्याच्या गोष्टी करा बडयाप्रत्येक भारतीयाला मिळेल रोजगार संध्यादेशात होईल संपुर्ण साक्षरतेचा गाजावाजातरुणांच्या हाती असतील जेंव्हा नोकऱ्यातेंव्हा स्वातंत्र्याच्या गोष्टी करा बडयाबलात्कार, हुंडाबळी यांना होईल कठोर शिक्षाइमानदार सरकारच्या हाती असेल महासत्ताथांबतील जेंव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यातेंव्हा स्वातंत्र्याच्या गोष्टी करा बडया
माझा देशसप्तसागराचा, गगनचुंबी हिमालयाचाझरझर निर्मळ सिंधुचा, जीवनदायी गंगेचामाझा देशअजिंक्य वीर योध्याच्या पराक्रमाचाजगाला ज्ञान देणाऱ्या थोर ऋषीमुनींचामाझा देशप्रभू रामचंद्राचा, भगवान श्रीकृष्णाचासमाधिस्त कैलासी भोळ्या शंकराचामाझा देशसनातन वैदिक संस्कृतीचा, अध्यात्माचाचार वेद, अठरा पुराण, उपनिषदांचामाझा देशविविधतेने नटलेला, अनेक भाषांनी सजलेलाविश्व संस्कृतिचा उगम जिथे, महाभारत अन रामायणाचा..!
समस्त विश्वात भारीकिती करा, कुरघोडी'नाकावरच' पडाल पुन्हाजपा ती, 'जी' उरलीत थोडी ...
देश माझा महान, त्याचा मला अभिमान.प्रतिक तिरंगा शौर्य, शांतीचे, समृध्दी अन् सत्याचे.विविधतेने नटलेला, एका धाग्यात गुंफलेला.अनेक भाषा, अनेक वेश, परी आमुचा एकच देश.छाती निधडी हिमालयाची, मनी निर्मळ धारा गंगेची.भूमी ही राम, कृष्णाची, महावीर अन् बुद्धांची.वेद, उपनिषदांची, आर्यभट्ट अन् सुश्रुतांची.करण्या हीचे रक्षण, शूरविरांनी अर्पिले प्राण.गावी किती त्यांची महती, दिली प्राणांची आहुती.भारत आमुचा न्यारा, आम्हा प्राणाहुन प्यारा.
माझा देश ... माझा भारतनुसतं नाव ओठी आलं तरीनसानसांत स्फुरण चढतं !भूतकाळाची उलटता पानेमन अभिमानाने दाटून येतं !ऐकता कहाण्या हुतात्म्यांच्याअश्रूंची फुले नकळत वाहतात !विविधतेतून दिसता एकताआश्चर्याच्या चर्चा होतात !गाता स्फूर्तीगीत भारतगौरवाचेगर्वाने माना उंचावतात !गुंजताच जयघोष भारतमातेचाआदराने शीश झुकले जातात !
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेकर्तव्यदक्ष भूमी, सीता-रघुत्तमाचीरामायणे घडावी, येथे पराक्रमांचीशिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वतांचेयेथे नसो निराशा, थोड्या पराभवानेपार्थास बोध केला, येथेच माधवानेहा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचेयेथेच मेळ झाला, सामर्थ्य-संयमाचायेथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचाहे क्षेत्र पुण्यदायी, भगवन् तथागताचेहे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचेसत्यार्थ झुंज द्यावी, या जागत्या प्रथेचेयेथे शिवप्रतापी, नरसिंह योग्यतेचेयेथे परंपरांचा, सन्मान नित्य आहेजनशासनातळीचा, पायाच सत्य आहेयेथे सदा निनादो, जयगीत जागृताचे
0 टिप्पण्या