व्हाट्सऍपमध्ये गायब होणारे संदेश हि काय भानगड आहे | Disappearing messages meaning in marathi

व्हाट्सऍपमध्ये गायब होणारे संदेश

whatsapp ने  मागील वर्षी disappearing messages नावाचे फिचर लॉन्च केले होते तेव्हापासून आत्तापर्यं लोकांमध्ये त्या फिचर विषयी संभ्रम आहे तर काही लोकांना त्याचा नेमका अर्थ काय आणि हे फिचर का दिले गेले असे बरेच प्रश्न आहेत त्यांचे उत्तर  आपण आजच्या पोस्टमध्ये बघूया चला तर मग आज एका नवीन विषयाची माहिती मिळवूया मराठी कन्टेन्ट सोबत. 

Disappearing messages म्हणजे नाहीसे होणारे संदेश किंवा मेसेजेस, 

हे  फिचर whatsapp ग्रुप किंवा एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवतेवेळी त्याच्या नावावर किंवा ग्रुप च्या नावावर क्लिक केल्यावर खाली Disappearing messages  या नावाने दिसते Disappearing messages यावर क्लिक केल्यास तुम्हाला On किंवा Off असे दोनच पर्याय दिसतात तुम्ही पहिल्यांदा या सेटिंग मध्ये आला असाल तर तुमचे हे फिचर साहजिकच Off  या अवस्थेत असेल सेटिंग समजून घेण्यासाठी पुढील दोन स्क्रिनशॉट पहा त्यानंतर आपण या फिचर च्या फायद्याविषयी बोलू 

स्क्रीनशॉट 1स्क्रीनशॉट 2हे फिचर चालू केल्यानंतर तुमच्या चॅट मधील मेसेजेस सात दिवसात आपोआप डीलीट होतील आणि नेहमी नेहमी चॅट क्लिअर करण्याचा आपला बहुमूल्य वेळ वाचेल आणि आपल्या फोन मधील जागासुद्धा वाचेल ज्यासाठी आपल्याला नेहमी whatsapp वर आलेले फोटोज आणि व्हिडीओज स्वतःहून डिलीट करावे लागतात पण हे फिचर चालू केल्याने हे काम आपोआप होईल आपला वेळ वाचेल आणि आपला ताण कमी होईल, कारण whatsapp मेसेजेस सुद्धा काही कमी त्रास देत नाही.

Whatsapp Disappearing Messege FAQs

मेसेजेस सोबत जोडल्या गेलेले फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा डिलीट होतात का?

हो जर तुमच्या whatsapp  सेटिंग मधील ऑटो मीडिया डाउनलोड चालू असेल तर ते फोटोज आणि व्हिडीओज तुमच्या चाट मधून डिलीट होतील पण तुमच्या मोबाइल गॅलरीमध्ये ते दिसतील. आणि जर ऑटो मीडिया डाउनलोड बंद असेल तर चाट सोबतच ते फोटोज आणि व्हिडीओजसुद्धा डिलीट होतील. 

Disappearing messages हे फिचर कोणाला सुरु करता येते ?

ग्रुप चॅट असल्यास ग्रुप मधील कुठलाही सदस्य ‘Disappearing messages’ हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. मात्र, फक्त ॲडमीनला ‘एक्स्पायर होणारे मेसेजेस’ सुरू किंवा बंद करायची अनुमती द्यायची असेल तर ग्रुप ॲडमीन तशा पद्धतीने ग्रुप सेटिंग्ज बदलू शकतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment