कॉम्प्युटर चा शोध कोणी लावला? जाणून घ्या कॉम्पुटर नक्की काय असते | computer cha shodh koni lavla

computer cha shodh koni lavla

computer cha shodh koni lavla

आधुनिक कॉम्प्युटर चे जनक कोण आहे?

computer cha shodh koni lavla: तसे तर अनेक लोकांनी या Computing Field मध्ये आपापलं योगदान दिले आहे. पण यामध्ये सगळ्यात जास्त योगदान हे Charles Babage यांचं आहे. कारण त्यांनीच सगळ्यात आधी Analytical Engine सन 1837 मध्ये काढले होते.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला नक्की  आवडेल – इंटरनेट काय आहे? what is internet in marathi

computer cha shodh koni lavla

त्यांच्या या engine मध्ये ALU, Basic Flow control आणि Integrated Memory ची concept लागू केली गेली. याच model चा आधार घेऊन आजचे कॉम्प्युटर डिजाईन केले गेले. याच कारणाने या क्षेत्रात त्यांचे योगदान सर्वात जास्त आहे, म्हणूनच त्यांना संगणकाचे जनक म्हणून सुद्धा संबोधले जाते.

Anand Dighe

संगणकाची व्याख्या

कोणत्याही modern digital संगणकाचे बरेच components असतात पण त्यांमध्ये काही खूप महत्वाचे आहेत जसे की Input device, Output Device, CPU(Central Processing Unit), Mass Storage Device आणि Memory.

accepts data        Input
processes data    Processing
produces output   Output
stores resultsStorage

संगणक कसे काम करतो?

Input (Data): Input अशी step आहे ज्यामध्ये Raw Information (कच्ची माहिती) ला Input Device वापरून कंप्यूटर मध्ये टाकले जाते. ही कच्ची माहिती letter, पिक्चर किंवा एखादा व्हिडीओ सुद्धा असू शकते

Process: Processया प्रक्रियेदरम्यान input झालेला data instruction नुसार processing केली जाते. ही पूर्णपणे Internal प्रोसेस आहे.

Output: Output वेळी जो data आधी process झालेला आहे तो data Result म्हणून दाखवला जातो. जर आपल्याला वाटले तर तो रिझल्ट आपण मेमरीमध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि नंतर त्याचा उपयोग भविष्यात कधीही करू शकतो.

>संगणकाच्या मूळ सुट्या भागांचे चित्र खाली दिलेले आहे

कंप्यूटर चे मुख्य भाग

जर तुम्ही कधी कॉम्पुटर case च्या आत बघितले असेल तर तुम्ही नक्की पाहिले असेल की आत लहानमोठे बरेचसे भाग (components) असतात, ते आपल्याला खूप गुंतागुंतीचे दिसतात, पण ते खरोखर तितकेसे complicated नसतात. आता मी तुम्हाला याच भागांविषयी (components) थोडी माहिती देणार आहे.

Motherboard (मदरबोर्ड)

वाचा : मदरबोर्ड चे प्रकार | तुमच्या संगणकासाठी योग्य मदरबोर्ड कसे निवडायचे?

कुठल्याही कंप्यूटरच्या मुख्य circuit board लाच Motherboard असे म्हणतात. हे एका पातळ प्लेट सारखे दिसते पण मदरबोर्डवरसुद्धा बऱ्याच लहानमोठ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात  जसे की CPU, Memory, Connectors hard drive, Optical Drive, expansion card, Video कार्ड, यासोबतच संगणकाच्या सगळ्या Ports ला connection. आपण बघितले तर Motherboard हे कंप्यूटर च्या सर्व पार्ट्ससोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडले गेलेले आहे हे आपल्या लक्षात येते.

CPU/Processor

वाचा: प्रोसेसर किंवा सीपीयू म्हणजे काय | (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) | What is CPU in marathi

तुम्हाला माहीत आहे का Central Processing Unit म्हणजेच CPU काय आहे?. हे कंप्यूटर case च्या आत Motherboard वर पहावयास मिळते जी एक लहान चिप असते ज्यावर फॅन बसवलेला असतो, याला कंप्यूटर चा मेंदू सुद्धा म्हटले जाते. हे युनिट प्रत्येक Computer च्या आत होणाऱ्या सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतो. जितकी जास्त एखाद्या Processor ची speed असेल तितक्या वेगाने तो एखादी process करू शकतो.

RAM (random access memory)

वाचा: रॅम म्हणजे काय | रॅमची व्याख्या

RAM ला आपण Random Acess Memory या नावाने सुद्धा ओळखतो ही System ची Short Term Memeory असते. जेव्हा कंप्यूटर काही हिशेब करतो तेव्हा ही मेमरी त्या result ला RAM मध्ये save करते. जर कंप्यूटर बंद झाले तर या डेटा चे सुद्धा अस्तित्व संपते. जर आपण एखादे document लिहीत असलो तर त्याला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी आपण मधून मधून आपला डेटा save करायला पाहिजे. Save करण्यामुळे Data Hard Drive मध्ये save होतो आणि हार्ड ड्राईव्ह वर जतन केलेला डेटा हा कायमस्वरूपी राहतो.

RAM किंवा कुठल्याही मेमरी ला megabytes (MB) or gigabytes (GB) मध्ये मोजले जाते. जितकी जास्त RAM असते तिने संगणक वेगाने काम करते 

Hard Drive

वाचा: संगणकामध्ये हल्ली SSD का वापरली जाते | benefits of ssd in marathi

Hard Drive हा असा component आज जिथे software, documents आणि अन्य कुठल्याही files save केल्या जातात, इथे स्टोर केलेला डेटा कायमस्वरूपी जतन केल्या जातो.

Power Supply Unit

Power supply unit चे काम असते की Main Power स्रोताकडून पॉवर घेऊन ती पावर जशी गरज भासेल त्यानुसार इतर components पर्यंत पोहचवणे.

Expansion Card

सगळ्या Computers कडे Expansion Slots असतात जेणेकरून भविष्यात आपण कुठल्याही Expansion Card इथे add करू शकू, या कार्ड्स ना PCI (Peripheral Components Interconnect) card सुद्धा म्हटले जाते. पण आजकाल Motherboard मध्ये built in (आधीपासूनच) बरेचं Slots असतात. काही Expansion Card चे नाव जे आपण जुन्या computers ला update करण्यासाठी वापरू शकतो

वाचा: ग्राफिक्स कार्ड म्हणजे काय? | तुमच्या संगणकासाठी योग्य ग्राफिक्स कार्ड कसे निवडाल?

  • Sound card
  • Network Card
  • Bluetooth Card (Adapter)

सूचना :  तुम्ही कधीही computer च्या आतील वस्तुंना उघडत असाल तर  सगळ्यात आधी मुख्य Socket मधून Plug काढले आहे याची खात्री नक्की केली पाहिजे

कंप्यूटर हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर

Computer hardware ला आपण अशी भौतिक साधने (Physical Device) म्हणू शकतो जी आपण संगणकात वापरतो किंवा संगणकाच्या अशी साधने ज्यांना आपण भौतिक स्पर्श करू शकतो, त्याचप्रमाणे Computer Software चा अर्थ होतो की codes चे collection ज्यांना आपण संगणकाचे हार्डवेअर सुसूत्रतेने चालवण्यासाठी आपल्या कॉम्प्युटर Machine च्या Hard Drive मध्ये install करतो, कॉम्पुटर सॉफ्टवेअर हे अनेक प्रोग्रामिंग कोड्स चा संग्रह असतो, कॉम्पुटर सॉफ्टवेअर ला आपण भौतिक स्पर्श करू शकत नाही.

उदाहरणार्थ कंप्यूटर मॉनिटर ज्यामध्ये बघून आपण कॉम्पुटर हाताळतो आणि Mouse ज्याने आपण हवी ती गोष्ट मॉनिटरमध्ये क्लिक करू शकतो हे सर्व Computer Hardware च आहे. तसेच Internet Browsers ज्यांच्या साहाय्याने आपण websites उघडतो आणि Operating System ज्यामध्ये ते Internet Browser चालू शकत आहे. अश्या आभासी गोष्टींना आपण Software म्हणतो.

आपण असे म्हणू शकतो की एक कंप्यूटर म्हणजे Software आणि Hardware चे संमिश्रण आहे, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकमेकांशी सुसूत्रता साधून कुठलेही संगणकीय काम करू शकतात. Internet

Sharing Is Caring:

Leave a Comment