भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, मॅसेज आणि कोट्स | Bhavpurna Shradhanjali in Marathi

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

आपली भारतीय संस्कृती ही खूप जुनी आणि त्यामुळेच समृद्ध आहे, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या सुखा दुःखात आपण भारतीय लोक नेहमी सहभागी असतो, एकमेकांच्या सुखात आपण एकमेकांना शुभेच्छा देतो आणि एकमेकांच्या दुःखात आपण एकमेकांना धीर देत असतो, एकूणच आपण एकमेकांना सांभाळून घेत असतो. 

आता मोबाईल द्वारे मेसेज पाठवणे काही नवीन राहिले नाही त्यासाठीच आज आपण या पोस्ट मध्ये एका नव्या विषयावरील मॅसेज बघुयात, जे तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीला पाठवून त्याचे सांत्वन करता येईल, हो दुःखद घटना टाळणे हे आपल्या हातात नसतं पण ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचे सांत्वन आपण करू शकतो, त्यासाठी खाली आम्ही तयार केलेले भावनिक श्रद्धांजली मॅसेज तुम्ही वापरू शकता त्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा.

कोणाशी वाईट वागला नाहीस तू होता माणूस भला

आमच्या जीवाला मात्र असा तू चटका लावून गेला

जीवनात मोठी पोकळी झाली तुझ्या अचानक जाण्याने

ये पुन्हा घेऊन पुनर्जन्म आम्हाला भेटण्याच्या बहाण्याने

ना केला कधी मोठेपणा,

निरागस तुझा भोळेपणा

यावा पुनर्जन्म घेऊन भेटण्या

अशी करतो प्रार्थना

उडुनी गेला प्राण अचानक ना सावध आम्हा होऊ दिले

तुझ्या जाण्याने गेले सर्व, हे देवाने काय केले

केले कष्ट जन्मभर, थाटला सुखाचा संसार

करुनी गेले पोरके आम्हास तुमच्याविना सुने घरदार

जाण्याची वेळ नव्हती

थांबण्यासाठी खुप होते,

तरीही ध्यानीमनी नसताना

आम्हाला सोडुन गेलास

यापेक्षा दुर्देव ते काय हो..???

रडविले तु आम्हाला…देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!

भावपूर्ण श्रद्धांजली

चेहरा होता सदैव हसरा,

सपाशात सुस्वभाव

सर्वांना होते अति प्रिय,

दिले नाही दुःख कुणाला

सुख मात्र दिले सर्वांना,

आठवण येते क्षणाक्षणाला

सोडून गेला आम्हाला लाभेल का

अशी दिव्य मूर्ती आम्हाला 

॥ त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।

भावा समान मित्रा, सोडून गेलास ना रे ..😭😭

अरे यार जिद्द करायची होती तर ती जगण्यासाठी करायची होती, तू तर मृत्यू लाच मिठी मारलीस…

रडवलस यार मित्रा.आनंद  तू आमच्यातून असा अचानक निघून गेलास.अजूनही विश्वास बसत नाही …!

तुझ्या आठवणी नेहमी आमच्या सोबत होत्या…

आहेत आणि या पुढेही राहतील

मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुळका प्रमाणे

येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात

जागा घेतात हीच गोड माणसे जिवनाचा अर्थ सांगतात

ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रू हि पुसतात अगदी तुमच्यासारखे पण तुम्ही आज आमच्यातून गेलात

तुमच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना

 ..भावपूर्ण श्रद्धांजली..

विश्वास न बसणारी अत्यंत वाईट व दुःखद अशी घटना घडेल तुझ्या बाबतीत असं कधीच वाटलं नव्हतं….”जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला” हेच खरं आहे…..!!!!

हे लिहीताना पण डोळे पाणावले आहेत ….. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना……..कायमच सगळ्यांच्या स्मरणात रहाशील……..Miss u भावा…..

आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली..! 🌹

https://1.bp.blogspot.com/-Cl0PMIIPmt0/YCeNjtIRMtI/AAAAAAAAU6Q/otgftXKxxXUZJkYWCNU7On21tzOR5SQAwCLcBGAsYHQ/s2048/shraddhanjali%2Bsms%2Bquotes%2Bmarathi.jpg

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही.. पण  हे कोणालाच कसे समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.. 😢miss u bhava… आमच्यातून तु हरवलास आता कधी मिळणार नाहीस ना..आता फक्त तुझ्या आठवणी राहील्या रे भावा…😭

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे,

देवाकडे इतकीच प्रार्थना आहे की देव तुम्हाला त्यातून सावरण्याची शक्ती देवो.

मनापासून शोक व्यक्त!

Sharing Is Caring:

Leave a Comment