आरती गजानन महाराजांची विश्वरूप माऊली | Shree gajanan maharaj aarti vishvaroop mauli

आरती गजानन महाराजांची विश्वरूप माऊली

आरती गजानन महाराजांची विश्वरूप माऊली

या आरतीचे रचयेतें श्री मधुकर अंबादास गणेशपुरे हे आहेत, त्यांच्या रचना खूप सुंदर असतात, या पोस्ट च्या निमित्ताने त्यांनी रचलेली गजानन महाराजांची विश्वरूप माऊली ही आरती आज आम्ही या ब्लॉग वर सर्व भक्तांसोबत सामायिक करत आहोत

vishvaroop mauli gajanan maharaj aarti

ईश्वराचा साक्षात्कार, तुम्ही विश्वरूप माऊली । 
करा आरती स्विकार, तुम्ही विश्वरूप माऊली ||
 
माघ वद्य सप्तमी, या पुण्यपावन दिनाला । 
शेगावाच्या मातीला, तुमचा पदस्पर्श झाला । 
इथे घेतला अवतार, तुम्ही विश्वरुप माऊली ॥ 
करा आरती स्विकार ॥१॥
 
लिला अगाध तुमच्या, भव्य-दिव्य चमत्कार । 
नास्तीक होती लिन आणि करिती नमस्कार । 
भाविक भक्तांचा आधार, तुम्ही विश्वरूप माऊली ॥ 
करा आरती स्विकार ||२||
 
व्याधी, भय, संकटे, तुमच्या कृपेने टळती । 
तुम्ही हाकेला धावता, मनोकामना फळती । 
बुडत्यांचे तारणहार, तुम्ही विश्वरूप माऊली || 
करा आरती स्विकार ||३||
 
जय गजानन, श्री गजानन, एकचि जयजयकार | 
तव नामाचा महिमा, करितो स्वप्नांना साकार । 
असू द्या उपकार, तुम्ही विश्वरुप माऊली || 
करा आरती स्विकार ॥४॥
 
स्वामी तुम्ही, समर्थ तुम्ही, सर्व सुरवाचे दाता । 
पिता तुम्ही, पालक तुम्ही, दीनदुबळ्यांची माता । 
करा सर्वांचा उद्धार, तुम्ही विश्वरूप माऊली ॥ 
करा आरती स्विकार ||५||

रचनाकार – श्री मधुकर पाटील गणेशपुरे


वाचा: gajanan maharaj quotes | श्री गजानन महाराज कोट्स


FAQ

आरती म्हणजे काय?

आरती हा देवतेची स्तुती करण्याचा एक प्रकार आहे. आरतीमध्ये देवतेच्या नावाचा जप केला जातो आणि देवतेला दीप दाखवून त्याची पूजा केली जाते.

गजानन महाराजांची आरती

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये गजानन महाराजांची आरती खूप प्रसिद्ध आहे.

गजानन महाराजांची आरती कधी आणि कशी होते?

गजानन महाराजांची आरती दिवसातून दोन वेळा होते. सकाळी आणि संध्याकाळी. आरतीमध्ये दीप, फुले, नैवेद्य आणि सुगंधी वस्तू यांचा वापर केला जातो.

आरतीमध्ये काय काय म्हटलं आहे?

आरतीमध्ये गजानन महाराजांच्या नावाचा जप केला जातो आणि त्यांच्या गुणांचं वर्णन केलं जातं. आरतीमध्ये गजानन महाराजांना प्रार्थनाही केली जाते.

आरतीचं महत्त्व काय?

आरतीमुळे मन शांत आणि प्रसन्न होतं. आरतीमुळे देवतेचं आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं.

आणखी काय जाणून घ्यायचं आहे का?

या लेखात तुम्हाला “आरती गजानन महाराजांची” या विषयाची थोडक्यात माहिती मिळाली.

तुम्हाला या विषयावर आणखी काय जाणून घ्यायचं आहे ते मला कमेंटमध्ये जरूर विचारा.

धन्यवाद!

Sharing Is Caring:

Leave a Comment