युट्युब अकाउंट कसे बनवतात | युट्युब वर पैसे कमवा

लोक लॉकडाउन चा फायदा घेत आहेत आणि तुम्ही घरात निराश बसला आहात?

तुम्हालाही ऑनलाइन आवक स्रोत पाहिजे पण काय करावं काही कळत नाही?

आणि युट्युब वर बघावं तर मराठी व्हिडीओज सापडत नाही आणि हिंदीमध्ये सांगणारे एखादी नेमकी गोष्ट खोलवर सांगत नाही.

हेही वाचा: युट्युब वर पैसे कसे कमावतात जाणून घ्या मराठीमध्ये |

युट्युब अकाउंट कसे बनवतात

युट्युब अकाउंट कसे बनवतात: अहो मग मी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत अशीच बारीक सारीक माहिती आपल्या मातृभाषेतून सांगण्यासाठीच बनवलाय ना? मग तुम्ही लोक अडचण आली तर कॉमेंट्स मध्ये प्रश्न विचारण्याचे कष्ट सुद्धा घेऊ शकत नाही का हो?

मला सांगा किती जणांनी आपल्या या ब्लॉग वरील बेल च बटन दाबून आपल्या ब्लॉग ला सबस्क्राईब केलंय, किती कमी लोकांनी केलंय मला दिसतंयच मग मी तुमच्यासाठी मर मर करून पोस्ट लिहिण्याचा काय फायदा हो🙄,

जाऊद्या बास झालं माझं रडणं, आता आपण वळूया थेट मुद्द्याकडे आपला आजचा मुद्धा म्हणजे,

1.युट्युब हे एक पैशाचे झाड

हो आहे युट्युब हे पैशाचे झाड आहेच पण या झाडाला मेहनतीचे पाणी टाकावे लागते, अरे वा मी तर सॉलिड कवी झालो बुवा😎

1. अहो मेहनत म्हणजे आता घाम वगैरे गळायचा नाहीये इथे बस मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे, कारण तुमच्याकडे लॉकडाउनमुळे सध्या वेळच वेळ आहे या वेळेचा उपयोग नाही केला तर भविष्यात तुम्हाला नक्कीच पश्चात्ताप होईल.

आणि जर तुम्ही या संधी च सोन केलं तर तुम्हाला भविष्यात तुमच्या नोकरीची गरज पडणार नाही याची खात्री मी देतो, माझे हे दोन शब्द तुम्ही खूप काळजीपूर्वक वाचा.

असुदे जगात मंदी

हीच माझी सुवर्णसंधी…

लॉकडाउन चा काळ आहे, कधी संपेल सांगता येत नाही, पैसा जो आजवर कमावलेला आहे कधी संपेल सांगता येत नाही, 

आता सध्या तुमच्याकडे वेळच वेळ आहे तुम्ही आता खूप काही करू शकता त्यातील आपला आजचा विषय म्हणजे युट्युब वरून खोऱ्याने पैसे कसे ओढायचे.

युट्युब अकाउंट कसे बनवतात

स्टेप 1 : युट्युब अकाउंट बनवा, यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, युट्युब ऍप मध्ये जाऊन तुमच्या प्रोफाइल ला क्लिक करा त्यांनतर My Channel ला क्लिक करा, जर तुमचं चॅनेल आधीपासून बनलेलं असेल तर तुम्हाला त्याच नाव दिसेल आणि बनवलेलं नसेल तर तुमच्याचॅनेल ला काय नाव द्यायचं ते तुम्हाला विचारण्यात येईल, या टप्प्यावर तुम्ही विचार करून एक आपल्या व्हिडीओज ना साजेस अस Unique, अद्वितीय, विलक्षण, अस नाव द्या अगदी तस जस आपण बाळ जन्मल्यावर एका युनिक नावाच्या शोधात संपूर्ण इंटरनेट पालथं घालतो आणि फेसबुक वर पोस्ट टाकून लोकांना नावं सुचवण्यास सांगतो🤣, हो अगदी तसच आपल्याला आपल्या चॅनल च बारसं करायचं आहे, एकदा आपण आपल्या चॅनेल ला नाव दिल की झालं की चॅनेल तय्यार. (खाली स्टेप्स चे फोटोज दिलेले आहेत)

युट्युब अकाउंट कसे बनवतात

युट्युब अकाउंट कसे बनवतात

युट्युब अकाउंट कसे बनवतात

युट्युब अकाउंट कसे बनवतात

स्टेप 2 : आता तुमचं चॅनेल तयार आहे आता तुम्हाला तुमच्या चॅनेल ला एक छानसा लोगो द्यायचा आहे अगदी तसाच जसा तुम्ही व्हाट्सऍप वर तुमचा छानसा डीपी ठेवता, हा लोगो तुम्ही आकर्षक बनवा जे णे करून तीच पुढे चालून तुमच्या चॅनेल ची ओळख बनेल (स्टेप बाय स्टेप फोटोज)👇

वाचा : पाच मिनिटात आकर्षक लोगो कसा बनवावा?(या पोस्ट लवकर यावी यासाठी कमेंट करा)

चॅनेल चा विषय काय निवडावा?

आता तुमचं चॅनेल व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तयार आहे.

आता तुमचा खरा प्रवास चालू झालाय, त्याची सुरुवात होईल योग्य व्हिडीओ अपलोड करण्यापासून. तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपण युट्युब वर कशाचा व्हिडीओ अपलोड करावा, तर मी सांगू इच्छितो की इथे स्पेशल अस काही अपलोड करावं लागत नाही.

1. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल इथे लोकांना सांगू शकता तुमचे अनुभव तुम्ही केलेल्या चुका ज्या तरुणांनी परत करू नये आशा टिप्स तुम्ही तुमच्या चॅनल वर देऊ शकता.

तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुमचं काम तुम्हाला जर वाटत असेल की खूप कमी लोक करू शकतात तर तुम्ही त्यांना युट्युब वर त्या कामाचे धडे देऊ शकता आणि अशाच लोकांची मदत करणाऱ्या व्हिडीओज मधून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता

2. तुमचे इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्तीचे दुकान आहे? आता तुम्हाला तुमच्या कामाचे बारकावे चांगलेच माहिती असतील पण याआधी तुम्ही ते कोणाला सांगितलेले नाही कारण कोणाला सांगणे म्हणजे स्वतःसाठी एक स्पर्धक तयार करण्यासारखेच आणि लोक शिकल्यावर पैसे थोडीच देणार? पण आता तुमच्यासाठी युट्युब हा एक खुला मंच आहे इथे तुम्हाला माहीत असलेल्या विशेष गोष्टींचा एक छान असा व्हिडीओ बनवून युट्युब वर अपलोड करू शकता इथे ती गोष्ट शोधण्यासाठी लाखो लोक येत असतात आणि इथे जर तुमचा व्हिडीओ गाजला ना…तर तुम्ही तुमचे दुकान सोडून युट्युब ला तुमचा फुल टाइम जॉब बनवाल हे मी खात्रीने सांगू शकतो.

वरील इलेक्ट्रिक दुकानाचे तर एक उदाहरण आहे तुम्ही तुमच्या तुमच्या व्यवसायप्रमाणे ही गोष्ट आचरणात आणून पैसे कमवू शकता कारण युट्युब वर खूप लोकांची गर्दी असते आणि गर्दी म्हणजे पैसा.

3. तुम्ही गृहिणी आहात? छान स्वयंपाक करता किंवा तुम्हाला असे पदार्थ माहीत आहेत की जे लोकांना खूप कमी माहीत आहेत किंवा ते बनवण्यास इतरांना खूप अवघड जातात आशा वेळी तुम्ही त्या लोकांसाठी देवदूत बनून युट्युब वर या, आणि तो पदार्थ बनवण्याची सोपी पद्धत किंवा त्यातील बारकावे लोकांच्या लक्षात आणून द्या आणि व्हा कौतुकाचे भागीदार आणि बक्कळ पैश्याचेही.

4. तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही शिवणकाम करता? आणि शिवणक्लास घेता? तर मग वेळ कशाला दवडताय तुम्ही घेत असलेल्या क्लासमध्ये किती जण सध्या शिकायला येतात? पूर्वीपेक्षा खूपच कमी? हो ना? मग तुम्हीही बनवा युट्युब चॅनेल आणि शिकवा लोकांना युट्युब वर आणि इथे तुमच्याकडे बरेचसे लोक शिकायला येतील आणि तुमची शिवणकलेची शैली एकदम वेगळी आणि लोकांना सहज समजेल अशी असेल तर तुम्ही इथे व्हिडीओ बनवून इतर लोकांप्रमाणे लाखो रुपये महिन्याला कमवू शकता….

5. किंवा तुमचा जो छंद असेल चित्र काढणे, रांगोळी काढणे, गार्डनिंग किंवा माळीकाम करणे किंवा इतर कुठलाही याबद्दल तुम्ही लोकांना विशेष गोष्टी युट्युब वर सांगा 

उदाहरणार्थ: घरच्याघरी भाजीपाला कसा उगवावा, कंपोस्ट (सेंद्रिय) खत तयार करण्याची पद्धत इत्यादी.

ok या पोस्टपुरता मी तुमचा निरोप घेतो कमेंट करून सांगा कुठल्या गोष्टीची सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे आहे, धन्यवाद।

Sharing Is Caring:

Leave a Comment