युट्युब वर पैसे कसे कमावतात जाणून घ्या मराठीमध्ये | How to earn money on youtube | marathi | मराठी

“ऑनलाईन काम करून पैसे कमवा” अस वाक्य कानावर आलं किंवा अस कुठे वाचलं जरी तरी आपण म्हणतो की काय काहीपण भलतंच ऑनलाईन कुठे पैसे कमावता येतात का? पण इथेच आपण चुकतो आणि त्या विषयाच्या खोलवर जाण्याऐवजी त्याच्यापासून लांब पळतो, अस करण्यापेक्षा त्या विषयाची जरा दखल जर आपण घेतली तर नक्कीच कळेल की अस पण होऊ शकतं आणि सध्या च्या जगात ऑनलाईन कमविणे फेसबुक व्हाट्सऍप वापरण्यापेक्षा ही सोप्प असू शकत। 

अश्याच सोप्प्या मार्गांबद्दल आपण आपल्या या ब्लॉग वर सतत बोलत असतो आणि पुढे पण बोलत राहू।
तुम्ही जर एखादी गोष्ट कोणाला खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगू शकत असाल तर तुम्ही ऑनलाईन कमवू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करावं लागेल की त्या विषयी एक विडिओ बनवून युट्युब वर अपलोड करावा लागेल यासाठी तुम्हाला तुमच स्वतःच चॅनेल बनवावं लागेल. चिंता करू नका तुमची जीमेल आयडी असते तेच तुमचं चॅनेल असतं,चॅनेल अस काही वेगळं उघडावे लागत नाही ते तुमच्या नावाने तयार झालेले असते तेच नाव बदलून तुम्ही तुमच्या मानाजोगे नाव तुमच्या चॅनेल ला देऊ शकता। 
Sharing Is Caring:

Leave a Comment