How to make thumbnail for youtube in marathi | युट्युब साठी थम्बनेल कसा बनवतात ?

How to make thumbnail: आज आपण बघणार आहोत How to make thumbnail for youtube in marathi म्हणजेच युट्युब साठी आकर्षक थम्बनेल कसं बनवतात हे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, ही सुद्धा क्लुप्ती मी माझ्या अनुभावातून तुम्हाला सांगत असल्याने तुम्हाला ही सोप्या भाषेत सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे.

थंबनेल कशाला म्हणतात ?

आपण युट्युब आणि वेबसाईट्स वर एखादा व्हिडीओ किंवा लेख बघण्या वाचण्याआधी जो फोटो बघतो ज्यामध्ये आपल्याला त्या व्हिडीओ किंवा लेखामध्ये काय बघण्या वाचण्यास मिळणार आहे याची एक कल्पना येते अश्या त्या वैशिट्यपूर्ण फोटोलाच थंबनेल असे म्हणतात आणि जर तुम्ही युट्युब किंवा ब्लॉग लिहीत असाल तर तुम्हाला एक आकर्षक थंबनेल बनवणे खूप आवश्यक असते कारण थंबनेल हे एखाद्या व्हिडीओ किंवा लेखाचे पहिले आकर्षण असते मग त्यानंतर आतील जो व्हिडीओ  किंवा लेख आहे तो त्या थंबनेल वर क्लिक करून बघितला जातो, असा महिमा एका आकर्षक थंबनेल चा असतो. 

हेही वाचा: कुठल्याही पासपोर्ट फोटो चा बॅकग्राऊंड पांढरा करा मोबाइल मध्ये

हा लेख वाचल्यावर तुम्ही खाली फोटो दाखवल्याप्रमाणे युट्युब साठी थम्बनेल किंवा तुमच्या ब्लॉग साठी फोटो बनवू शकता.👇

How to make thumbnail for youtube in marathi – स्टेप्स

अश्याप्रकारचे thumbnail किंवा फोटो बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी picsart हे ऍप इथून डाउनलोड करून घ्या DOWNLOAD PicsArt👈

त्यानंतर ऍप उघडून तुम्ही कुठलाही एक बॅकग्राऊंड चा रंग निवडा

picsart thumbnail tutorial in marathi

बॅकग्राऊंड रंग निवडल्यानंतर तुम्हाला आता तो बॅकग्राऊंड रंग थम्बनेल च्या आकारात कापावा लागेल त्यासाठी खलील स्टेप्स फॉलो करा.

youtube thumbnail size cutting in picsart

या दोन स्टेप्स फॉलो केल्यानंतर खलील तिसरी स्टेप फॉलो करा.

 

16:9 ही साईझ निवडल्यानंतर तुमचा बॅकग्राऊंड थम्बनेल साईज मध्ये तंतोतंत कापल्या जाईल आता यामध्ये आकर्षक मजकूर लिहुयात म्हणजे आपला आकर्षक थम्बनेल तयार होईल, यासाठी तुम्ही खलील फॉन्टस जे थम्बनेल मध्ये आकर्षक दिसतात ते मी खाली zip format मध्ये देत आहे ते पिक्स आर्ट मध्ये इन्स्टॉल करा Download Fonts👈

जर फॉन्ट कसे ऍड करायचे हे माहीत नसेल तर खलील गाईड वाचा.

पिक्स आर्ट मध्ये फॉन्ट ऍड करण्यासाठी तुम्ही खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे स्टेप 1 आणि स्टेप 2 साठीचे options क्लिक करा.

google indic font styles for picsart marathi  

आता तुम्हाला खाली स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे पर्याय दिसतील त्यातून my fonts निवडा

installing google indic font styles in picsart


तुम्ही डाउनलोड केलेल्या फॉन्टस मधील सर्व फॉन्टस निवडून यामध्ये टाका.

google indic devnagari font installation marathi tutorial

आता फॉन्टस इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंड वर जो मजकूर लिहायचा असेल तो लिहा मजकूर लिहितांना तो सलग लिहू नका, त्याचे करण असे की मजकूर तुम्ही सलग लिहाल तर त्याचा रंग सुद्धा सलग एकच द्यावा लागेल त्यामुळे आपले थम्बनेल कमी आकर्षक दिसेल, तुमचा मजकूर मोठा असेल तर तो दोन किंवा तीन तुकड्यांमध्ये विभागा जेणेकरून प्रत्येक ओळीला वेगळा रंग देता येईल, खलील फोटो बघा माझा थम्बनेल दोन ओळींमध्ये मी विभागला आहे आणि त्यामुळे दोन्ही ओळींना लाल आणि पिवळा असे दोन रंग मला देता आले.

youtube thumbnail sample made in picsart

सध्या फॉन्ट ला स्टायलिश बनवणे

आता तुम्ही तुमच्या मजकुराची पहिली ओळ लिहा आता त्या ओळीला फॉन्ट स्टाईल देण्यासाठी मी पुरवलेल्या फॉन्टमधील फॉन्ट तुम्ही इन्स्टॉल केले असतील तर खलील screenshot मध्ये दाखविल्याप्रमाणे picsart मध्ये दिसतील,

my fonts मध्ये जाण्यासाठी तुमच्या मजकुरावर क्लिक करा व पुढील स्टेप्स फॉलो करा

change google indic stylish font in picsart


आता my fonts वर क्लिक करा (खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे)

how to install custom devnagari fonts in picsart

फॉन्ट चा रंग बदलणे

आता तुमच्या आवडीचा फॉन्ट निवडा मी Khand नावाचा फॉन्ट निवडला आहे, आता फॉन्ट चा आणि फॉन्ट च्या मागील बाजूचा रंग बद्दलण्याबद्दल बघूया पुढील स्क्रीनशॉट द्वारे.

steps for change font colour in picsart

आता तुमच्या मनाप्रमाणे तुमचा मजकूर ऍडजस्ट करून त्याचा रंग आणि फॉन्ट बदलून एक दर्जेदार थम्बनेल बनवू शकता, संपूर्ण लेख वाचल्याबद्दल आपले धन्यवाद आणि फॉन्ट च्या zip फाईल चा पासवर्ड हा marathicontent हा आहे, आणि जर या लेखाबद्दल काही अडचणी असतील किंवा एखादी गोष्ट लक्षात आली नसेल किंवा सांगायची राहिली असेल तर खाली टिप्पण्यांध्ये जरूर कळवा, भेटूया नवीन लेखामध्ये, धन्यवाद.

Sharing Is Caring:

Leave a Comment