ब्लॉगर थीम चा फॉन्ट स्टायलिश कसा बनवतात? How to change blogspot font

ब्लॉगर थीम चा फॉन्ट स्टायलिश कसा बनवतात

ब्लॉगर थीम चा फॉन्ट स्टायलिश कसा बनवतात: अगदी कुठल्याही ब्लॉगर थीम चा फॉन्ट हा बदलल्या जाऊ शकतो तुम्हाला तश्या शिकवण्या (ट्युटोरिअल्स) सुद्धा इंटरनेट वर मिळतील, पण ते सर्व इंग्रजी फॉन्ट बद्दलण्याबत सांगतात, देवनागरी फॉन्टविषयी इंटरनेटवर खूप कमी सांगितलं गेलंय कारण जेव्हा मला माझा हा ब्लॉग तयार करायचा होता तेव्हा माझा ब्लॉग मराठी असल्याने मला मराठीतील रेखीव अक्षर असणाऱ्या फॉन्टस ची गरज भासली, आणि तेच पूर्ण संशोधन आता मी सोप्या शब्दात तुमच्यासमोर मांडतोय,

हेही वाचा – ब्लॉगर पोस्ट चा मराठी फॉन्ट स्टायलिश बनवा आता | कोडिंगशिवाय (नवीन फिचर )

पहिल्यांदा तुमच्या आवडीची थीम डाऊनलोड करा

इथे वाचा : जलद लोड होणाऱ्या ब्लॉगर थिम्स

थीम सेट केल्यावर तुम्हाला पहिल्यांदा थीम सेक्शन मध्ये जावे लागेल,  तिथल्या ऍरो वर क्लिक करून एडिट html ला जा खालील स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे



html ओपन केल्यावर तुम्हाला <head> टॅग शोधून त्याखाली एक कोड पेस्ट करायचा आहे तो कोड म्हणजेच असेल नवीन फॉन्ट जो आपल्याला गुगल फॉन्ट वेबसाईट वरून कॉपी करायचा आहे आता तुम्ही गुगल वर गुगल फॉन्ट सर्च करा


आता गुगल फॉन्ट वेबसाईट उघडा Language ऑपशन मध्ये देवनागरी सिलेक्ट करा 


आता सर्व मराठी/ हिंदी म्हणजेच सर्व देवनागरी फॉन्टस उघडतील आता यामधून तुमच्या आवडीचा फॉन्ट निवडा मी उदाहरण म्हणून खलील Rozha One नावाचा फॉन्ट निवडतो


या फॉन्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला खालील स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल तिथे select this style यावर क्लिक करायचे आहे


select this style यावर क्लिक केल्यावर तुम्हाला खलील स्क्रीन दिसेल हा कोड कॉपी करून तुम्हाला ब्लॉगर थीम कोड मधील <head> च्या खाली पेस्ट करायचा आहे, पण पेस्ट करताना कोड मध्ये थोडा बदल करावा लागेल त्याशिवाय कोड सेव्ह होणार नाही , तुमचा फॉन्ट कोड हा खली दिलेल्या कोड प्रमाणे दिसेल, प्रत्येक फॉन्टनुसार कोड थोडाफार बदलेल, आता फक्त या कोड मध्ये & या चिन्हापुढे amp; एवढं लिहायचं आहे, खलील स्क्रीनशॉट मध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केल्याप्रमाणे


<link href=”https://fonts.googleapis.com/css2?family=Rozha+One&display=swap” rel=”stylesheet”>

जिथे टॅग संपते तिथे / टाकून टॅग क्लोज करून घ्यायची आहे, त्यांतर हा कोड खालीलप्रमाणे दिसेल

<link href=”https://fonts.googleapis.com/css2?family=Rozha+One&amp;display=swap” rel=”stylesheet”/>

आता हा फॉन्ट कोड <head> च्या खाली पेस्ट करून सेव्ह करा आता आपल्या थीम मध्ये फॉन्ट इन्स्टॉल झाला आहे, आता आपल्याला तो थीम मध्ये कुठे कुठे दिसायला पाहिजे ते आपल्याला सेट करायचे आहे

त्यासाठी आपल्याला आता थीम मध्ये कोड मध्ये एक छोटासा कोड शोधायचा आहे तो म्हणजे ]]></b:skin>

खाली स्क्रीनशॉट मध्ये बघा


आता आपल्याला या कोड च्या वरती काही अगदी सोपे कोड्स लिहायचे आहेत हे कोड्स म्हणजे आपण इंस्टॉल केलेला फॉन्ट थीम मध्ये कुठे कुठे वापरात यावा यासाठी असतात हा कोड खालीलप्रमाणे असेल,

सुलभतेसाठी कॉपी करण्यासाठी कोड खाली उपलब्ध करून देतोय

body {font-family: ‘Rozha One’, serif;}

h1.post-title {font-family: ‘Rozha One’, serif;}

h2.post-title {font-family: ‘Rozha One’, serif;;}

h3.post-title {font-family: ‘Rozha One’, serif;}

h4.post-title {font-family: ‘Rozha One’, serif;}

.Blog .post h1 {font-family: ‘Rozha One’, serif;}

.Blog .post h2, .post h3, .post h4, .Blog .post h5, 

.Blog .post h6 {font-family: ‘Rozha One’, serif;}

.post-body {font-family: ‘Rozha One’, serif;}

हा कोड पेस्ट केल्यानंतर तुमच्या संपूर्ण ब्लॉग चा फॉन्ट  बदललेला असेल त्यजूनही काही अडचण येत असेल तर कंमेंट मध्ये नाकी सांगा 

Sharing Is Caring:

Leave a Comment