अध्याय पहिला
श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्री गुरुभ्यो नमः । नमन शुभ कार्यारंभा उमापुत्र शिवसुता। कार्तिकाग्रजा वंदन तुजला विघ्नहर्ता । लंबोदरा विश्वरूपधारका भालचंद्रा । गणनायका ठेवले मस्तक तवचरणा । विघ्नेश्वरा कल्याणकारका श्री गजानना। आशीर्वाद लाभू कवि श्री दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ काव्यात्मक रचना ।। १।। माझे नमन विद्येश्वरी सरस्वती चरणा। ब्रह्मकुमारी कविमन ध्यान साधना। लाभू दे तव वरद हस्त गीतरचना। दीन बंधू पंढरी निवासा पांडुरंगा । काव्यात्मक गीत गजानन विजय ग्रंथ । सच्चिदानंदा भक्ततारका राहू दे कृपाछाया ।। २ ।। अगाध महिमा तुझा पुरुषोत्तमा । वानर बनले राम काळात बलवान । गोकुळी गोप खेळांना आले उधान । रामकृष्णा कृपाशीर्वादाने चरणी अर्पण । गीत गजानन विजय ग्रंथ काव्यसुमन ।।३।। नमन माझे मम कुळदेवता । निवासन तुझे तुळजापुर नगरी भवानीमाता। राहू दे जगदंबे शुभ हस्त माझ्या मस्तका। रचना करण्यास श्री गजानन विजय काव्यात्मका । वंदितो चरण श्रेष्ठ ऋषी वरा । वशिष्ठ, गौतम पराशर मुनीश्वरा । ग्रहपित्या खग नायका सूर्य नारायणा । साष्टांग नमन तुम्हा चरणा ।। ४ । नमन माझे विठ्ठल भक्त चरणा । निवृत्ती, ज्ञानदेव नामदेव मुक्त सोपाना। सावता माळी श्री संत तुकाराम रामदासा। आशीर्वाद राहू द्या तुमचा गीत रचना । श्रोते सावधान करा एकाग्र मना । श्री दासगणु रचित गजानन विजय ग्रंथ रचना। सिद्ध व्हावे श्री गजानन स्वामी कथा श्रवणा ।। ५ ।। भारत भूमी संत व ज्ञानीयांची जन्मभूमी । नारद ध्रुव सुदामा अंजनी पुत्र महाबली । ईश्वर साह्यास आले ह्या भूवरी । श्री शंकराचार्य जगद्गुरू पद नांचे कल्पतरू । आचार्य अध्यात्म विद्येचे महामेरू । आपणा आशीर्वादाने न्यावे काव्य पुरे करू ।।६।। नरसी मेहता तुळसीदास सूरदास । नामदेव नरहरी चोखा कुर्मदास गायिली आपण मुखी भक्तिगीत रास। तैसेच घडले संत दर्शन वऱ्हाडी शेगावास। हेच ते श्री दासगणु विरचित सार। वर्णिले गजानन विजय ग्रंथ रसास ।।७।। एक ईश्वर भक्त नांव देवीदास वंशज हा देवीदास सज्जन । पातुरकरास पातुरकर दंग पुत्र ऋतू शांती करण्यास। लोटले लोक देवीदास शांत भोजनास टाकल्या उष्ट्या पत्रावळी त्या रस्त्यास। उष्ट्या पत्रावळी मधील अन्नास मग्न दिगंबर मूर्ती ते अन्न वेचण्यास ।। ८ ।। दिगंबर मूर्ती करी नमन अन्न कणास । घालत होती मुखी आनंदे घास । बंकटलाल आगरवाला आश्चर्यले पाहूनी प्रकारास । दाखविला तो प्रकार दामोदर कुळकर्णी स्नेह्यास सांगितले पातुरकरास घेऊनी यावे ताटास। देवीदास सुवर्ण ताटी घेऊन आला अन्नास ।।९।। सुवर्ण ताटातील दोनच घास घेऊन । दिगंबर मूर्तीने ठेवले बाकी नमन करून। बंकटलाल वदला हा कोणी भिकारी नसून कोणी तरी संत आला शेगांवी धावून। जर असता भिकारी सर्वान्न टाकले असते भक्षून ।।१०।।
सर्व माउलींना कळविण्यात येते कि-
या पेज वरील श्री गजानन महाराज विजय पारायण ग्रंथ "श्री गजानन भक्तीसागर ऍप" मध्ये हलविण्यात आला आहे कृपया खालील लिंक वरून ऍप डाउनलोड करावे, धन्यवाद.
5 टिप्पण्या
नववा अध्याय अपुरा आहे.अकरावा अध्याय सुरुवात ओव्या नाहीत.कृपया ओव्या अॅड कराव्यात.जय गजानन🙏
उत्तर द्याहटवाक्षमा असावी, नक्कीच सुधारणा करण्यात येईल.
उत्तर द्याहटवाआपण माझ्या सुचनेचा विचार करुन योग्य ती सुधारणा केली.धन्यवाद🙏 जय गजानन
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏 माझ्या विनंतीला मान देऊन आपण योग्य ती सुधारणा केलीत..आता पूर्ण पोथी वाचल्याचे समाधान मिळेल..जय गजानन
उत्तर द्याहटवाजय गजानन, वाचकांच्या प्रतिक्रिया नेहमीच सर्वोच्च स्थानावर राहतील.
हटवा