Shattila Ekadashi 2024: 6 फेब्रुवारी ला षटतिला एकादशी, जाणून घ्या महत्व आणि पौराणिक कथा

षटतिला एकादशी

सारांश

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते. पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 05.24 पासून सुरू होईल आणि 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 04.07 पर्यंत चालेल.

Shattila Ekadashi 2024:

सनातन धर्मात माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते. पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 05.24 पासून सुरू होईल आणि 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 04.07 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 6 फेब्रुवारीचे व्रत मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी भगवान विष्णूसाठी व्रत, पूजा आणि तिळाचे दान केल्याने मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते.

षटतिला एकादशीचे महत्त्व

शास्त्रानुसार, श्रीकृष्ण युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हणतात, हे महामानव, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ‘षटतिला’ किंवा ‘पापहारिणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. जी सर्व पापे नाश करणारी आहे. या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ किंवा तिळाने भरलेले भांडे दान केल्याने अनंत आशीर्वाद मिळतात. तीळ पेरल्याने जितक्या फांद्या निघतात, तितकी हजार वर्षे दान करणाऱ्या व्यक्तीचा स्वर्गात सन्मान होतो, असा उल्लेख पद्मपुराणात आहे. षटतिला एकादशीचे व्रत केल्याने माणसाची आध्यात्मिक प्रगती होते आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. कन्यादान, हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि सोने दान केल्याने जे पुण्य मिळते, त्याहून अधिक फळ षटीला एकादशीच्या व्रताने माणसाला मिळते. या व्रतामुळे कुटुंबाचा विकास होतो आणि मृत्यूनंतर भक्ताला विष्णुलोकाची प्राप्ती होते.

पौराणिक कथा

धार्मिक कथांनुसार, प्राचीन काळी पृथ्वीवर एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत असे. तिची भगवान विष्णूवर अतूट श्रद्धा होती आणि ती त्यांचे सर्व उपवासासोबच भक्तिभावाने पूजा करत असे, परंतु त्या ब्राह्मण स्त्री ने कधीही कोणालाही अन्नदान केलेले नसते. एके दिवशी भगवान विष्णू स्वतः त्या ब्राह्मण स्त्री कडे तिच्या कल्याणासाठी भिक्षा मागण्यास गेले, तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने मातीचा एक गोळा उचलून भगवान विष्णूच्या हातात दिला. ते द्रव्य घेऊन भगवान विष्णू आपल्या निवासस्थानी, वैकुंठाला परतले.

कालांतराने त्या ब्राह्मण स्त्रीचा मृत्यू झाला आणि ती वैकुंठात पोहोचली. तेथे त्या ब्राह्मण स्त्रीला एक झोपडी आणि आंब्याचे झाड मिळाले. रिकामी झोपडी पाहून ब्राह्मण स्त्री अत्यंत निराश झाली आणि भगवान विष्णूंकडे जाऊन तिने विचारले, देवा, मी आयुष्यभर आपली भक्तिभावाने पूजा केली आहे. पृथ्वीतलावर मी धार्मिक स्त्री होते है आपण जाणताच, मग मला ही रिकामी झोपडी का मिळाली? भगवान विष्णूंनी त्या ब्राह्मण स्त्रीला उत्तर दिले की तू आयुष्यात कधीही अन्नदान केले नाहीस, म्हणूनच तुला ही रिकामी झोपडी मिळाली. तेव्हा ब्राह्मण स्त्रीला तिची चूक लक्षात आली आणि तिने भगवान विष्णूंना यावर उपाय विचारला. भगवान विष्णूंनी सांगितले की जेव्हा देव कन्या तुम्हाला भेटायला येतील, तुम्ही दार तेव्हाच उघडावे जेव्हा ते तुम्हाला षटतिला एकादशीच्या व्रताचे नियम सांगतील. त्या ब्राह्मण स्त्रीने तेच केले आणि षटतिला एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावामुळे त्या ब्राह्मण स्त्रीची झोपडी अन्न आणि धन यांनी भरून गेली. त्यामुळे षटतिला एकादशीच्या दिवशी अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Sharing Is Caring:

Leave a Comment