महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ | Talathi bharti 2023 | Talathi bharti 2023 online form date

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३

Talathi bharti 2023 online form date maharashtra

ठळक मुद्दे:

 • पदाचे नाव: तलाठी.
 • एकूण रिक्त पदे : 4644 पदे.
 • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
 • वयो॒मर्यादाः खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
 • मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
 • वेतन / मानधन: ₹ 25,500/- ते ₹ 81,100/-.
 • अर्जाची पद्धत : ऑनलाइन.
 • अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in
 • अर्ज शुल्कः खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/
 • ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार : २६ जून २०२३.
 • अर्जाची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३.

talathi bharti 2023 online form last date is 17 july 2023

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ सविस्तर माहिती

Talathi bharti 2023 last date to apply is 17 july 2023 अर्जाची डायरेक्ट लिंक 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्हाच्या केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

परीक्षेचा दिनांक :- याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या तलाठी संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट- १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.

प्रस्तुत जाहिरातीमध्येसांगितलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या पोर्टलद्वारे talathi bharti 2023 online form मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता –

जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

 • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्या दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कुठल्याही शासनाची मान्यता असणाऱ्या विद्यापीठाचा पदवीधर असावा.
 • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र. मातंस – २०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. 19/3/2003 नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
 • माध्यमिक शालांतपरीक्षेमध्ये मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसेल तर , निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने वरील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या व वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथ प्रमाणपत्र असेल तर  ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

परीक्षेचे स्वरुप

 1. पदाचे नाव – तलाठी 
 2. मराठी – प्रश्न २५ गुण ५०
 3. इंग्रजी  – प्रश्न २५ गुण ५०
 4.  सामान्य ज्ञान – प्रश्न २५ गुण ५०
 5. अंकगणित/बुद्धिमत्ता चाचणी  – प्रश्न २५ गुण ५०
 6. एकूण प्रश्न – १०० गुण २००

परीक्षा कालावधी :- २ तास 

सविस्तर जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा – जाहिरात 

Sharing Is Caring:

Leave a Comment