ऑनलाइन खरेदी: स्मार्ट व्हा, सुरक्षित रहा! | Online shopping tips in marathi

Online shopping tips in marathi: ऑनलाईन खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवावे की लगेच कमी किंमत पाहून एखाद्या वस्तूच्या प्रेमात पडून खरेदी करू नये, त्याआधी त्या वस्तूची ऑनलाईन पडताळणी करून बघावी, आणि ती पडताळणी कशी करायची त्याबद्दल आज मी या लेखात सविस्तर सांगणार आहे तर संपूर्ण लेख हा काळजीपूर्वक वाचा, या लेखाच्या शेवटी तुम्ही अगदी स्मार्ट ऑनलाईन ग्राहक बनणार आहात तर सुरू करूया सोप्या शब्दात Online shopping tips in marathi:जेणे करून वस्तू स्वस्त मिळतील आणि फसवणुकीची टक्केवारी कशी कमी करता येईल.

Online shopping tips in marathi

ऑनलाईन खरेदी करताना जी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे तीची किंमत सर्व विश्वासार्ह ऑनलाईन platforms जसे की Amazon, flipkart, myntra, इतर वेबसाईट्स वर बघून घ्यावी जेणेकरून तुम्हाला किमतीचा अंदाज येईल किंवा एखाद्या वेबसाईट वर ती वस्तू स्वस्तातही मिळू शकते, खरेदीपूर्वी सर्व साईट्स जरूर तपासून घ्याव्यात.

Online shopping tips in marathi खरेदी करताना उतावीळ होऊन खरेदी करू नये एका स्मार्ट खरेदीसाठी खालील गोष्टींचा जरूर अवलंब करा

आपण समजून घेण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ऍमेझॉन ला गृहीत धरू.

सर्वसाधारणपणे ऑनलाईन खरेदी करताना आपण आपल्याला जी वस्तू विकत घ्यायची आहे ती शोधतो आणि फक्त किंमत बघून ती खरेदी करतो, त्या वस्तूची गुणवत्ता न तपासता,

Online shopping tips in marathi : मग आपण ऑनलाईन खरेदी करत असताना वस्तूची गुणवत्ता कशी तपासू शकतो?

सोप्प आहे फक्त त्यासाठी अपल्याला एक फिल्टर लावावे लागेल, खलील चित्रात दिसत असल्याप्रमाणे दोन स्टेप वापरून तुम्ही चार तारांकित असलेले फिल्टर लावून घ्या

Online shopping tips in marathiया फिल्टरमुळे असे होईल की तुम्हाला अश्या वस्तूच दिसतील ज्यांना लोकांनी नुसती पसंतीच दिलेली नसेल तर लोकांना ती वस्तू का आवडते तेही लोकांनी केलेल्या शब्द, फोटो आणि व्हिडीओ  पुनरावलोकनांद्वारे (Reviews) द्वारे  वाचायला आणि पाहायला मिळतील, 

हि माहितीसुद्धा वाचा: क्रेडिट कार्ड नाहीये ? | या ऍप्स देत आहेत 5 ते दहा हजारांचे क्रेडिट

एखाद्या वस्तूचे लोकांनी दिलेले पुनरावलोकन कसे बघतात?

अमेझॉन वरील पुनरावलोकन बघण्यासाठी खलील चित्रात दाखविलेला मार्ग अवलंबावा.

Online shopping tips in marathiतुम्ही वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे ताऱ्यांवर क्लिक केल्यावर तुम्हाला लोकांनी केलेले पुनरावलोकने दिसतील,फोटो आणि व्हिडीओ परीक्षणे उपलब्ध असतील तर दिसतील आणि यामुळे तुम्हाला ते प्रोडक्ट निवडण्यास खूप मोठी मदत होईल (परीक्षणे खलील चित्रांत दाखविल्याप्रमाणे दिसतील) या लोकांनी दिलेल्या फोटो, व्हिडीओ आणि शाब्दिक रिव्हुज मुळे तुमचे अर्धे काम तर इथेच होऊन जाईल.

तुम्हला या लोकांनी केलेल्या परिक्षणांमुळे कोणकोणत्या गोष्टींचा अंदाज येईल?

1. वस्तूची गुणवत्ता कशी आहे हे तुम्हाला लोकांच्या शाब्दिक रिव्ह्यू मधील वर्णनातून कळेल

2. ती वस्तू का घ्यावी याचे वर्णनसुद्धा तुम्हाला कळू शकेल.

३. याउलट त्या वस्तूमध्ये कुठे काही दोष आहे का हे सुद्धा कळेल

4. आणि एखाद्यावेळेस ती वस्तू सर्व गोष्टीमध्ये सरस असेल पण एखादी कमतरता त्यामध्ये असू शकते तर तुम्ही लोकांचा अभिप्राय वाचून त्या वास्तूचे चांगले वाईट मुद्दे तुम्ही तपासू शकता, यामुळे तुम्हाला त्या वस्तुबद्दल खरेदी आधीच बरीचशी माहिती मिळून जाते, आणि खरेदी करण्याचा निर्णय सोपा होतो.

५. एखाद्या वस्तुबद्दल लोकांनी लिहिलेली नकारात्मक माहिती तुम्हाला आधीच कळाल्यामुळे वस्तू तुम्हाला मिळाल्यानंतर जो मनस्ताप होणार होता तो यामुळे टाळता येतो

Online shopping tips in marathiआकर्षक डील साठी फॉलो करा आमचे टेलिग्राम चॅनेल: डील्स मराठी

तर आपण आता पंचतारांकित फिल्टर लावलेले आहेच पण याच्या जोडीला कोणते फिल्टर लावावे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रतीच्या व किमतीने परवडणाऱ्या वस्तू अमेझॉन किंवा कुठलीही ऑनलाईन शॉपिंग ऍप दाखवेल?

पंचतारांकित फिल्टर च्या सोबतीला आपण कमी ते उच्च (low price to high price) हे फिल्टर लावावे यामुळे तुम्हाला आकर्षक किमतीचे आणि चांगल्या गुणवत्तेचे प्रॉडक्ट्स अमेझॉन किंवा कुठलीही online shopping website दाखवेल.

अश्या मार्गाने आपण ऑनलाईन शॉपिंग करताना कमी किंमती मध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करू शकतो.

हा लेख आवडल्यास कृपया टिप्पण्यांद्वारे नक्की कळवा किंवा या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास टिप्पण्यांमध्ये मांडा,

त्यासोबतच आपले टेलिग्राम चॅनेल नक्की फॉलो करा तिथे नेहमी अपडेट्स टाकल्या जातात आणि तुम्हाला अभिप्राय सुद्धा तेथे देता येतो.

टेलिग्राम चॅनल जॉईन करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment