शेअर बाजारातील तेजी अणि मंदी | bull and bear market meaning in marathi

शेअर बाजारातील तेजी अणि मंदी

शेअर बाजारातील तेजी आणि मंदी:

शेअर बाजारातील तेजी अणि मंदी: शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे आर्थिक संपत्ती वाढवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. मात्र, यात यशस्वी होण्यासाठी बाजारातील चढ-उतार समजून घेणं गरजेचं आहे. यातच तेजी (बुल मार्केट) आणि मंदी (बेअर मार्केट) या दोन महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश आहे.

बुल मार्केट:

Bull म्हणजे बैल आणि bear म्हणजे अस्वल. या दोन प्राण्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. विशेषतः हे जेव्हा आपल्या विरोधकांवर हल्ला करतात त्यावेळी त्यांचा स्वभाव खूप वेगळा असतो. बैल हा खूप आक्रमक असतो. आपल्या शिंगांचा वापर करून समोरील विरोधकास मारण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो. भारतामध्ये बैलाच्या शर्यती खूप प्रसिद्द आहेत. उदा. तामिळनाडू मध्ये खेळली जाणारी जलीकट्टू.  या उलट अस्वल चालताना काहीसा रेंगाळत चालतो. त्याचा आक्रमक स्वभाव नाही. या प्राण्यांच्या स्वभावानुसार शेअर बाजारातील तेजी किंवा मंदी दर्शवण्यासाठी bull market आणि bear market या संज्ञा वापरल्या जातात.

बुल मार्केट म्हणजे शेअर बाजारातील तेजी अणि मंदी बेअर मार्केट दर्शवते.

गुंतवणूकदारांकडून किंवा शेअर बाजारातील विश्लेषकांकडून बुल मार्केट आणि बेअर मार्केट (Bull Market Bear Market) या दोन्ही संज्ञा वापरल्या जातात. Bull market म्हणजे शेअर बाजारातील (काही वेळा नाणेबाजार, वस्तू बाजार – कमोडिटी मार्केट ) तेजी दर्शवणारी स्थिती होय. मग ही तेजी बाजारातील असेल किंवा एखाद्या शेअरची. बुल मार्केट मध्ये गुंतवणूकदार आशावादी असतात त्यामुळे गुंतवणुक करण्यात आक्रमक असतात. कधी हि स्थिती तात्पुरती किंवा कधी दीर्घकाळ असू शकते. काही वेळा बुल मार्केट स्थिती काही लोकांकडून सट्टेबाजीमुळे निर्माण होते आणि अशा परिस्थिती मध्ये गुंतवणूकदरांची फसवणूक झाल्याचे अनुभवास येते. (कालांतराने बाजार कोसळतो).

उदाहरण:

 • भारतातील शेअर बाजार २०२० च्या सुरुवातीपासून २०२१ च्या ऑक्टोबरपर्यंत तेजीत होता. या काळात Nifty 50 निर्देशांक 7,500 पातळीवरून 18,600 पातळीवर पोहोचला.
 • अमेरिकेतील शेअर बाजार २००९ ते २०२० पर्यंत दीर्घकाळ तेजीत होता.

बेअर मार्केट:

त्याउलट bear market म्हणजे बाजारातील मंदी दर्शवणारी (downward trend) स्थिती. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदार निराशावादी असतात. बाजारातील गुंतवणूक कमी करणे किंवा नव्याने गुंतवणूक न करणे पसंत करतात. कधी हि स्थिती तात्पुरती किंवा कधी दीर्घकाळ असू शकते. परंतु काही ट्रेडर बेअर मार्केट ही स्थिती संधी म्हणून बघतात. कमी दरामध्ये गुंतवणूक करून त्यामध्ये नफा कमावतात. यामध्ये केलेली गुंतवणूक अल्प किंवा दिर्घकाळ असू शकते. काही कंपनी या काळामध्ये शेअर buy back (पुनर्खरेदी) करतात.

उदाहरण:

 • २००८ च्या जागतिक आर्थिक संकटात, भारतातील शेअर बाजार 50% पेक्षा जास्त घसरला.
 • २००० च्या डॉट-कॉम बबलमध्ये, अमेरिकेतील शेअर बाजार 50% पेक्षा जास्त घसरला.

बुल आणि बेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टिपा:

 • तुमची जोखीम सहनशीलता समजून घ्या.
 • तुमचे संशोधन करा.
 • वैविध्यपूर्ण करा.
 • दीर्घकालीन विचार करा.
 • तुमच्या भावनांना नियंत्रित करा.
 • आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

अतिरिक्त टिपा:

 • मंदीच्या बाजारपेठेत खरेदी करण्याची संधी म्हणून पहा.
 • तुमचे पोर्टफोलिओ नियमितपणे पुनर्संतुलित करा.
 • शेअर बाजारातील चढ-उतारांसाठी तयार रहा.

निष्कर्ष:

शेअर बाजारात गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रस्ताव आहे. तेजी आणि मंदीच्या चक्राची जाणीव असून आणि धोरणात्मक दृष्टीकोन स्वीकारून, तुम्ही तुमचे जोखीम कमी करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळवू शकता.

तुम्हाला हि माहितीसुद्धा आवडेल

Sharing Is Caring:

Leave a Comment