देय तारखेनंतर BSNL बिल पेमेंट करताय | तर ही चूक करू नका

देय तारखेनंतर BSNL बिल पेमेंट करताय तर ही चूक करू नका: आत्ताच नुकत्याच आलेल्या अनुभवावरून ही पोस्ट मी लिहितोय जेणे करून BSNL ब्रॉडबँड वापरणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, आणि ही माहिती प्रत्येक bsnl brodband user ला असणे आवश्यकही आहे,

देय तारखेनंतर BSNL बिल पेमेंट

देय तारखेनंतर BSNL बिल पेमेंट करताय | तर ही चूक करू नका

त्याचे झाले असे की मागील महिन्याचे bsnl brodband बिल भरण्यास उशीर झाला bsnl broadband ची due date ही साधारण महिन्याच्या 21 तारखेपर्यंत असते पण बिल भरायचे राहिले हे माझ्या तेव्हा लक्षात आले जेव्हा इंटरनेट बंद झाले, मग मी त्वरित ते बिल upi पद्धतीने भरले पण त्याचा काही उपयोग झाला नाही, मग त्यानंतर मी Service Provider ला फोन केला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याही upi ने बिल भरल्यास BSNL कडे पोहचण्यासाठी किमान दोन दिवस लागतात, आणि दर वेळी आपण वेळेत बिल भरता त्यामुळे दोन दिवस उशिरा जरी bsnl कडे पोहचत असेल तरिही काही अडचण येत नाही पण जेव्हा तुम्ही सेवा बंद झाल्यावर बिल भरता तेव्हा दोन दिवसापर्यंत म्हणजे बिल BSNL कडे पोहोचेपर्यंत काहीही करता येत नाही.

अश्या समस्येचा सामना तुम्हाला करावा लागू नये यासाठी तुम्ही काय कराल?

 तुमची शेवटची देय तारीख निघून गेलेली असेल आणि तुमची इंटरनेट सेवा जर बंद झालेली असेल तर तुम्ही चुकूनही UPI द्वारे म्हणजेच फोन पे गुगल पे अश्या ऍप वरून पेमेंट करू नका.

असे भरा बिल आणि त्वरित सेवा सुरू करा

1. तुमची शेवटची देय तारीख निघून गेलेली असेल आणि तुमची इंटरनेट सेवा जर बंद झालेली असेल तर तुम्ही पुढील लिंक वरून पेमेंट केल्यास तुमची सेवा त्वरित चालू होते, आणि bsnl कडून सुद्धा याच लिंक वरून पेमेंट करण्याचा सल्ला देण्यात येतो.

2. तुमची शेवटची देय तारीख निघून गेलेली असेल आणि तुमची इंटरनेट सेवा जर बंद झालेली असेल तर तुम्ही स्वतः bsnl office मध्ये जाऊन बिल भरणे हासुद्धा पर्याय तुमच्याकडे असतो

खलील दोन पर्याय वापरून तुम्ही तुमची सेवा लगेचच सुरू करू शकता, याव्यतिरिक्त जर तुम्ही दुसरा पर्याय वापरला तर तुमची सेवा किमान दोन दिवस तरी ठप्प राहू शकते, तर शेवटच्या देय तरखेनंतर बिल भरतांना वरील दोन पर्याय वापरा आणि तुमच्या अखंडित सेवेचा लाभ घ्या, तुमच्या bsnl broadband वापरणाऱ्या मित्रांनासुद्धा ही पोस्ट शेअर करून माहिती द्या, आणि ही पोस्ट वाचून काही नवीन माहिती मिळाली असेल तर टिप्पण्यांद्वारे नक्की कळवा.

bsnl bill payment link : BSNLपे

Sharing Is Caring:

Leave a Comment