Best 500+ Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Vadhdivas Shubhecha

नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे, म्हणून मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आमच्या नवीनतम पोस्टमध्ये हे देऊ. सांगण्यासाठी जात आहे. आपण Google वर शोधत असल्यास ते Happy , Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi , Happy Birthday Image Marathi , Happy Birthday Sms Status In Marathi , Happy Birthday Message In Marathi आणि आपल्याला कोणतीही चांगली वेबसाइट सापडत नाही ज्यामध्ये आपण आहात. जर तुम्हाला ते मिळत नसेल तर आपण आमच्या वेबसाइटवर योग्य ठिकाणी आला आहात. स्वतःला आपल्या वेबसाइटवर बनवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( Happy ) या सर्व गोष्टींबद्दल सांगेल आणि मला आशा आहे की आपण आमच्याकडे असाल. Happy Birthday Marathi Wishes Status Quotes छान दिसेल. आपल्याला आवडल्यास आणि सामायिक केल्यास आम्हाला मनापासून आनंद मिळतो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच

पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!

म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


खूप खूप आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,

खूप खूप आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


व्हावास तू शतायूषी

व्हावास तू दीर्घायुषी

ही एक माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


नातं आपल्या प्रेमाच

दिवसेंदिवस असच फ़ुलावं

वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छांच्या

पावसात भिजावं.


सोनेरी सूर्याची

सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा

सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्छा

केवळ

सोन्यासारख्या लोकांना.


“नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..


नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात

उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


आयुष्याच्या या पायरीवर 

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे….

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे …..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे….

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी…. 

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…. 

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे…. 

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे…. 

तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा…. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,

कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…

या सुखी आणि समृद्ध परिवाराचा

तुम्हीच तर खरा मान आहात…

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


काही माणसं स्वभावाने

कशी का असेनात

मनाने मात्र ती

फार सच्ची आणि प्रामाणिक असतात…

अशा माणसांपैकीच

एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच,

तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि

जिव्हाळ्याचा आहे…

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !


तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य !!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !


व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


आज तुझा वाढदिवस

वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक

तुझं यश, तुझं ज्ञान आणि

तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो

आणि सुखसमृद्धीची बहार

तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 


तुझ्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या

अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात

सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा!


वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.

एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.


तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या

फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व

जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त

ईश्वरचरणी प्रार्थना !


आपल्याही नकळत आपण खूप खूपांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!


विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. वाढदिवसाच्या शुभकामना !


तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!


माणसांच्या या गर्दीत खूप खूप चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी खूप खूप माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


 आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं ! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय… .


मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून

मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा

हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो

तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,

अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून

अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


Happy Birthday Image Marathi 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…..


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच !

वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


तुमच्या प्रेमला अजुन पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या

तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…


🚩🚩 ઉदंडआયુષ્યાच्या अનંત_ શુभेच्छा..   🎂🎂 🌹💐 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 💐🌹🎂🎂 

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा. 

श्री. साईबाबा आपणास उत्तम आरोग्य देवो हीच सदिच्छा.


आज आपला वाढदिवस

वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक

आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

!! जय महाराष्ट्र !!


दिवस आज आहे खास, 

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. 

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा ! 

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा 

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे….


मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का! 

मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत, 

प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू 

त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा, 

सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची! 

खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!


आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो

प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो

तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो

माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच

माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


बहिणीला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा वाचा: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes in marathi for sister


वाढदिवसाच्या गमतीशीर हार्दिक शुभेच्छा

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..😂हॅपी बर्थडे


केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे


तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.


नाव :- XYZ 

वय:- बहुतेक २८ लागलं आता… 

काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे, 

अल्प परीचय: 

भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही 

लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले… 

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी 

साक्षात हिराच, 

नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर) 

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली Image तयार केलेले 

स्वताःला फिट ठेवणारे 

शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे….. 

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..। 

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे, 

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने) 

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤ 

एवढे सगळे कुटाने करूनही 

हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे, 

आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…


Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; जळणारे जळणार,

आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…

दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,

पाटलां बद्दल काय बोलायचं••••••. खतरनाक //_ तारीखला पाटलांचा जन्म झाला..

लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..

साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,

आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤भुरळ पाडणारे….

आमचं काळीज…

डॉशिंग चॉकलेट बॉय,

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….

तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..

आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…।।


अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण, 

आमच्या सर्वांची जान, 

५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा.. 

पोरींमधे (Dairy Milk Boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला, 

आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा ßranded.

Bhau >>> ♡ PERSON’S NAME ♡ यानां वाढदिवसाच्या, 

कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती, 

100 टायर ट्रक, ट्रैक्टर, आणि टेम्पो भरुन, 

(Cake फाडू) शुभेच्छा.. 

Happy Birthday Bhau…


जन्मापासूनच जिम‍♀‍♀‍♀ चा शोकीन असलेले,

जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,

काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.

कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.

कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे

सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला

दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

श्री श्री श्री 08 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,


वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King❤ 

आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे 

लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤ 

तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे, 

प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे 

XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, 

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, 

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले, 

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले… 

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे… 

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व 

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे… 

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, 

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality! 

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे… 

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, 

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪… 

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

100 टायर ट्रक, ट्रैक्टर, आणि टेम्पो भरुन,

भका भका हार्दीक शुभेच्छा…..

शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे


दिवस ते उन्हाळ्याचे होते, 

उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता, 

एप्रिलची ती सात तारीख होती, 

त्या दिवशी आपल्या भाऊ चा जन्म झाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;

आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.


तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो

आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही , आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !


फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे, तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !


वर्षाचे 65 दिवस .. महिन्याचे 0 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस..

आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂…


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे ,कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे , डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे ,मुलींमधे #Dashing_boy , या नावाने प्रसिद्द असलेले , आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


पल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा


आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आयुष्याच्या वळणावर तुम्हाला खूप खूप लोक भेटतील, काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील , तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …


आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..


तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !! शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..


आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..


आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो, आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा, तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

खालील शुभेच्छा सुद्धा वाचा:

Sharing Is Caring:

1 thought on “Best 500+ Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Vadhdivas Shubhecha”

Leave a Comment