SIP meaning in marathi | पद्धतशीर गुंतवणूक योजना

SIP meaning in marathi = पद्धतशीर गुंतवणूक योजना: “थेंबे थेंबे तळे साचे”: एक प्रसिद्ध मराठी म्हण. चांगले जीवन जगण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडे गरजेइतकी संपत्ती जमा व्हावी असे आपल्यापैकी प्रत्येकास वाटत असते. दर महिन्याला येणाऱ्या पगारातून काही पैसे कुठल्यातरी गुंतवणूक योजनेत टाकावी असे वाटत असते आणि ती गुंतवणूक सुरक्षितही असावी आणि त्यातून परतावासुद्धा चांगला मिळावा अशी आपली सर्वसाधारण अपेक्षा असते. दैनंदिन जीवनात चांगले आरोग्य राहावे म्हणून आपण नियमित व्यायाम करतो तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नियमित गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी म्युच्युअल फंडाची systematic investment plan (SIP) चालू करता येते.  रुपये 500 किंवा 1,000 इतक्या कमी रकमेची SIP चालू करून आपण गुंतवणूक करू शकतो. आपण आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit) मध्ये पैसे ज्या प्रकारे गुंतवतो त्याप्रकारे आवर्ती ठेव योजनेस (Recurring Deposit) साधर्म्य असणारी systematic investment plan SIP म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना किफायतशीर आहे.

SIP meaning in marathi

दर महिन्याला समान रक्कम SIP मध्ये गुंतवता येते. यामधून नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते. आणि कमी रकमेमध्ये आपला पोर्टफोलिओ तयार व्हायला सुरुवात होते. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे, आपण दर महिन्याला किती रक्कम गुंतवणार आहोत हे आधी ठरवा. मगच गुंतवणुकीला सुरुवात करा.

SYSTEMATIC INVESTMENT PLAN पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) चे फायदे:

चक्रवाढ गतीची शक्ती (Power of Compounding): नियमित गुंतवणूक होत असल्यामुळे मिळणाऱ्या फायदा हा पुनर्गुंतवणूक होत असतो. गुंतवणूक अधिक फायदा या दोन्हीवर पुन्हा उत्पन्न चालू होते. म्हणून शक्यतो लवकर गुंतवणुकीस सुरुवात करा म्हणजे चक्रवाढ गतीचा फायदा अधिक मिळेल.

अधिक वाचा:

चक्रवाढ गतीची शक्ती (Power of Compounding)

आर्थिक उद्दिष्ट

गुंतवणुकीस शिस्त – Discipline: दर महिन्याला आपण विशिष्ट रक्कम SIP च्या मध्यमातून गुंतवणूक करत असतो. याचा अर्थ आपल्या गुंतवणुकीस एक विशिष्ठ शिस्त लागते. कारण दर महिन्याला हि रक्कम भरणे बंधनकारक असते त्यामुळे गुंतवणूकीस प्राधान्य मिळते.

सरासरी चा फायदा – Rupee Cost Averaging: म्युचुअल फंडमधील गुंतवणूक हि बाजाराचे अधीन असते म्हणजे त्यात चढ उतार होत असतो. प्रत्येक गुंतवणुकीत आपणास त्या फंडाचे युनिट्स मिळतात. प्रत्येकवेळी समान गुंतवणुकीस युनिट्सची NAV हि वेगळी असल्यामुळे युनिट्स कमी अधिक मिळतात.

कर बचत – Tax saving: दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक योजनेमध्ये कर लाभ मिळतो.

सुलभता – Convenience : यामध्ये मार्केट च्या वेळेतच गुंतवणूक करावी असे काही बंधन नसते. आपण हि रक्कम आपल्या बचत खात्याला जोडून घेऊ शकतो Electronic clearance – ECS (Auto debit facility) . म्हणजे प्रत्येकवेळी भरणा करण्याची किंवा भरणा चुकण्याची चिंता राहत नाही. आपण पोस्ट डेटेड चेकनेही व्यवहार करू शकतो.

छोट्या गुंतवणुकदारासहि फायदा – Small Investor : यामध्ये अगदी ५००, १००० रुपये दर महिन्याला भरून सहभागी होता येते. यामुळे कमी रक्कम असूनही पोर्टफोलिओ चांगला बनतो.

IN SHORT (SIP)

  1. आपले आर्थिक उद्दिष्ट ठरावा
  2. त्यासाठी दर महिन्याला किती रक्कम भरणार आहोत हे ठरावा.
  3. विविध योजनाचा अभ्यास करून योग्य योजना निवडा. (मागील परताव्याचा विचार करा)
  4. Application form and SIP mandate form, रक्कम आणि तारीख नक्की करा.
  5. पेमेंट ऑप्शन निवडा (चेक किंवा ECS)
  6. शक्यतो दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. यामध्ये चक्रवाढ गतीचा आणि सरासरीचा फायदा होतो.
  7. १ पेक्षा अधिक योजना निवडल्यास पोर्टफोलिओ diversify होण्यास मदत होते.

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment