थेट गुंतवणूक योजना आणि रीतसर गुंतवणूक योजना यामधील फरक | WHAT IS DIFFERENCE BETWEEN DIRECT PLAN AND REGULAR PLAN

थेट गुंतवणूक योजना

थेट गुंतवणूक योजना आणि रीतसर गुंतवणूक योजना यामधील फरक: म्युच्युअल फंड नियामक सेबीने वेळोवेळी नियमांमध्ये सुधारणा करून म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सेबीकडून योग्य पाऊल उचलले जाते. याच धोरणांचा एक भाग म्हणून सप्टेंबर 2012 (SEBI Circular) मध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये अमुलाग्र बदल केला. यावेळी सेबीने  म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी रेग्युलर गुंतवणूक प्लान च्या सोबतीने डायरेक्ट प्लान सुरु केली. 1 जानेवारी 2013 पासून ह्या योजना अस्तित्वात आल्या. थेट गुंतवणूक योजना (Direct Plan) म्हणजे काय? आणि नियमित / रीतसर गुंतवणूक योजना (Regular Plan) पेक्षा त्यांचे वेगळेपण काय आहेत हे आपण जाणून घेऊ.

थेट गुंतवणूक योजना (Direct Plan): 

म्युच्युअल फंडामध्ये कुठल्याही मध्यस्थाशिवाय केलेली गुंतवणूक म्हणजे Direct Plan मधील गुंतवणूक होय. यामध्ये कुठल्याही एजंट, वितरक किंवा आर्थिक सल्लागार यांचा सहभाग नसतो. थेट Asset Management Company (AMC) कडे गुंतवणूक केली जाते. AMC  च्या वेबसाइट किंवा ऑफिस मध्ये जाऊन हि गुंतवणूक करावी लागते.  

नियमित / रीतसर गुंतवणूक योजना (Regular Plan): 

म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक योजना (Regular Plan)  हि पारंपरीक/प्रचलित पद्धत आहे. या प्रकारच्या गुंतवणूक योजनेमध्ये एजन्ट, वितरक या सारख्या मध्यस्थाकरवी गुंतवणूक केली जाते. मध्यस्थ तुमच्या वतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करतो. मध्यस्थ इतरही सेवा देऊ करतो. उदा. गुंतवणुकीसाठी मदत करणे, सल्ला देणे इ.  

थेट गुंतवणूक योजना आणि नियमित / रीतसर गुंतवणूक योजना या दोन प्लान मध्ये नेमका काय फरक आहे. (WHAT IS DIFFERENCE BETWEEN DIRECT PLAN AND REGULAR PLAN)

  1. मध्यस्थ (Inter mediator) : डायरेक्ट प्लान मध्ये कुठल्याही माध्यस्थाशिवाय गुंतवणूक केली जाते. थेट AMC कडे गुंतवणूक होते. तर रेग्युलर प्लॅन मध्ये गुंतवणूक सल्लागार, एजन्ट आणि वितरक यांच्या मार्फत गुंतवणूक केली जाते.
  2. योजनेचा खर्च (Scheme Expenses Ratio):  म्युच्युअल फंड मध्ये थेट गुंतवणुक (Direct Plan) होत असल्याने डायरेक्ट प्लान च्या योजना चालवण्याचा खर्च कमी असतो. कारण योजनेस मध्यस्थ नसल्याने त्याला द्यावे लागणारे कमिशन, त्याच्या प्रशिक्षणासाठी येणार खर्च आणि इतर खर्च अंतर्भूत नसतात. या उलट रेग्युलर गुंतवणूक प्लान (Regular Plan) मध्ये एजन्ट कमिशन, त्याच्या प्रशिक्षणासाठी येणार खर्च आणि त्याच्याशी निगडित खर्च अंतर्भाव असल्याने योजना चालवण्याचा खर्च वाढतो. साधारण हा खर्च डायरेक्ट प्लान पेक्षा (इक्विटी फंड- ०.४०% ते १% आणि डेट फंड अंदाजे ०.२०%) अधिक असतो
  3. नक्त मालमत्ता मूल्य आणि परतावा (NAV and Return) : वर सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट प्लान मध्ये योजना चालवण्याचा खर्च कमी असल्याने त्या फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) अधिक असते परिणामी परतावा अधिक असतो. तर रेग्युलर प्लान मध्ये मध्यस्थाचे कमिशन असल्याने योजना चालवण्याचा खर्च अधिक असतो म्हणून योजनेची निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) कमी असते. परिणामी योजनेतून डायरेक्ट प्लान पेक्षा परतावा कमी मिळतो.
थेट गुंतवणूक योजना

वरील उदाहरणच्या अनुसरून

ICICI PRIDENTIAL VALUE DISCOVERY FUND ह्या म्युच्युअल  फंडाच्या च्या डायरेक्ट आणि रेगुलर गुंतवणुकीतील फरक दाखवलेला आहे. यामध्ये रेगुलर प्लान पेक्षा डायरेक्ट प्लान ची NAV अधिक आहे आणि योजना चालवण्याचा खर्च कमी आहे असेही दिसून येईल.

यापैकी कुठला प्लान योग्य आहे (WHICH PLAN IS BETTER).

दोन्ही प्लान मध्ये फायदे आणि तोटे आहेत. तुम्ही स्वतः जागरूक गुंतवणूकदार असाल आणि गुंतवणुकीबद्दल सखोल अभ्यास असेल तर थेट गुंतवणूक योजना (Direct Plan) मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. जर तुम्हाला गुंतवणूक सल्ल्याची गरज आहे आणि गुंतवणूक विना कटकट हवी असेल तर नियमित / रीतसर गुंतवणूक योजना (Regular Plan) मध्ये गुंतवणूक करा.

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment