Mutual fund structure in marathi | म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचना

Mutual fund structure in marathi

Mutual fund structure in marathi: म्युच्युअल फंड हा सेबी ने ठरवलेल्या ‘म्युच्युअल फंड नियमन १९९६’ च्या अनुसार काम करतो. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करून गुंतवणूक तज्ञामार्फत (Professional Investment Expert) तिची गुंतवणूक करण्याचे काम म्युच्युअल फंड करते. सेबीच्या नियामावलीचा अंकुश असल्याने फंडाचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होते. कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे दस्तावेज (Scheme Related Document) वाचणे आणि समजून घेणे आवश्यक असते. म्युच्युअल फंडाचे दस्तावेज (Scheme Related Document) वाचताना पहिल्याच पानावर प्रायोजक (sponsors), मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management Company)  आणि विश्वस्त (Trust) या तीन कंपनीचा उल्लेख होतो.

Mutual fund structure in marathi

हे वाचल्यानंतर आपल्याला खालील प्रश्न पडू शकतात.

  • ह्या ३ कंपनी कोण आहेत?
  • एकाच म्युच्युअल फंड साठी ह्या तीन कंपनी कशासाठी?
  • आपण ह्या ३ पैकी नेमकं कुठल्या कंपनीकडे पैसे गुंतवतो?

ह्या तीन कंपनीचा एकमेकांशी काय संबंध आहे?

उदाहरण म्हणून HDFC Fund या म्युच्युअल फंडाचे  दस्तावेज (Scheme Related Document) च्या पान एक वर ही माहिती आहेत.

Mutual fund structure in marathi

फंड प्रायोजक आणि ट्रस्ट (SPONSOR AND TRUST):  

ज्याप्रमाणे कंपनीची स्थापना करण्यासाठी प्रवर्तक (promoter)असणे जरुरी आहे त्याप्रमाणे म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यासाठी प्रायोजक (Sponsor) जरुरी आहेत.  प्रायोजक (Sponsor) एक ट्रस्ट (म्युच्युअल फंड कंपनी) स्थापन करतात. या ट्रस्ट वर विश्वस्त मंडळ नेमण्याची जबाबदारी प्रायोजक पार पाडतात. तो ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या सल्ल्याने आणि मंजुरीने म्युच्युअल फंड म्हणून सेबीकडे नोंदणी करतात. ट्रस्ट स्थापन करण्यासाठी भारतीय ट्रस्ट कायदा (Indian trust act) आणि कंपनी कायदा १९५६ यांच्या आधारे ही नोंदणी होते. या अर्थाने म्युच्युअल फंड हा ट्रस्ट किंवा ट्रस्ट कंपनी असते.  वरील उदाहरणास अनुसरून HDFC लिमिटेड आणि Standard Life Investment Limited या संयुक्तपणे प्रयोजकांची भूमिका पार पाडतात आणि त्यांच्याकडून HDFC Trustee Company Limited नावाची म्युच्युअल फंड कंपनी स्थापना करण्यात आली आहे.

प्रायोजकाची पात्रता (ELIGIBILITY OF SPONSOR):

प्रयोजकाची व्यावसायिक प्रतिमा स्वच्छ असावी.

कमीतकमी 5 वर्ष आर्थिक सेवा (Financial Services) व्यवसाय केलेला असावा .

मागील 5 वर्षांमध्ये कमीत कमी 3 वर्ष नफ्यामध्ये व्यवसाय केलेला असावा.

तीचे किमान नक्त मूल्य (Net Worth) रुपये 10 कोटी असणे आवश्यक आहे. त्यापैकी 40% हिस्सा हा प्रवर्तक यांचा असणे अनिवार्य आहे.

ट्रस्ट ची कार्य :

गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे हे ट्रस्ट चे मुख्य काम आहे. सेबीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असते. ट्रस्ट कडून एका मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची (Asset Management Company (AMC) नेमणूक केली जाते. AMC च्या मदतीने म्युच्युअल फंडाची सर्व कार्य पार पडणे आणि AMC च्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचे काम ट्रस्ट करत असते. सर्व म्युच्युअल फंडाच्या योजना जाहीर करताना AMC ला ट्रस्ट ची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. AMC च्या सर्व व्यवहारांवर ट्रस्ट ची नजर असते.

मालमत्ता व्यवस्थापन कंपनी : ASSET MANAGEMENT COMPANY (AMC)

म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून आलेल्या रकमेच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रस्ट कडून एका मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची (Asset Management Company (AMC) नेमणूक केली जाते. मालमत्ता व्यवस्थापनाचा दैनंदिन कारभार AMC द्वारे पार पडला जातो . मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (Asset Management Company) हि कंपनी कायद्याखाली (Company Act) नोंदवलेली कंपनी असते. त्याचप्रमाणे या कंपनीस AMC म्हणून सेबीकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही कंपनी सेबीच्या नियावली नुसार आणि ट्रस्ट च्या धेयधोरणा नुसार काम करते.  ट्रस्ट आणि सेबीच्या च्या परवानगीने म्युच्युअल फंडाच्या योजना जाहीर करणे व म्युच्युअल फंड योजनांच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचे व्यवस्थापन या कंपनी मार्फत केले जाते. या योजना चालवण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची फंड मॅनेजर म्हणून नेमणूक केली जाते. या फंड मॅनेजर च्या अधिकाराखाली/व्यवस्थापनाखाली  या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले जाते. फंड मॅनेजर हा गुंतवणुकीस जबाबदार असतो. वरील उदाहरणामध्ये HDFC  Trustee company Limited या म्युच्युअल फंड कंपनीद्वारे HDFC Asset Management Company Limited या कंपनीची AMC म्हणून नेमणूक केली आहे.

या शिवाय म्युच्युअल फंड चालवण्यासाठी खालील सेवा पुरवठादारांची गरज लागते.

अभिरक्षक (custodian): AMC द्वारे खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या प्रतिभूतीचे (securities) आणि त्या संबधी दस्तावेजचे रक्षण करण्याचे काम अभिरक्षक करतात. प्रतिभूतीचे  फक्त रक्षण केले जाते त्यामध्ये खरेदी किंवा विक्रीचे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार अभिरक्षकास नसतो.

निबंधक आणि हस्तांतर सहाय्यक (registrar and transfer agent (RTA): गुंतवणूकदारांच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्याचे काम RTA करतात. म्युच्युअल फंडाचे अर्ज पुरवणे आणि भरून घेणे, युनिट्स ची खरेदी,  विक्री, गुंतवणूक दरांची वैयक्तिक  माहितीच्या नोंदी ठेवण्याचे काम RTA करतात. RTA कडे या प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी कुशल मनुष्यबळ असते. त्यामुळे हि सर्व कामं अचूक आणि कमी वेळात होतात. उदा. अशी सेवा Computer Age Management Services (CAMS) या RTA  द्वारा दिल्या जातात.

लेखापरीक्षक (auditors): सर्व योजनांचे वेळोवेळी लेखापरीक्षण लेखापरीक्षकाद्वारे केले जाते.

लेखापाल (accountant) : योजनेच्या व्यवहारांचा हिशेब ठेवण्याचे काम लेखापाल करतात. शिवाय दिवसभरातील सर्व प्रकारचे व्यवहार संपल्यानंतर योजनेचे Net Asset Value (NAV) जाहीर करण्यासाठी लागणारी माहिती पुरवण्याचे काम लेखापाल करतात.

याशिवाय योजनेस कायदेशीर सल्लागार आणि इतर क्षेत्रातील सल्लागार यांची गरज पडल्यास त्यांची नेमणूक केली जाते किंवा त्याच्याकडून व्यावसायिक साल घेतला जातो.

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment