म्युच्युअल फंड नेट असेट व्हॅल्यू म्हणजे काय ?| Mutual fund net asset value in marathi

म्युच्युअल फंड नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value )

Mutual fund net asset value in marathi: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक किंवा विक्री  करताना NAV (Mutual Fund Net Asset Value) चा नेहमी विचार होतो. पैसे गुंतवल्यानंतर आपणास त्या किमतीचे युनिटस मिळतात. या युनिट्सची किंमत म्हणजे त्या फंडाची नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value) असे म्हणतात. म्युच्युअल फंडाची नक्त  मालमत्ता मूल्य (Mutual Fund Net Asset Value) सेबीच्या नियमानुसार दररोज प्रकशित केली जाते. फंड चालवण्यासंबंधीचे सर्व प्रकारचे खर्च वजा करून राहिलेली रक्कम नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value)ठरवण्यासाठी ग्राह्य धरली जाते. मालमत्ता नक्त मूल्य (Net Asset Value ) हि कधी कधी बुक व्हॅल्यू या नावानेही संबोधले जाते.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फायदा झाला कि नुकसान हे NAV च्या साहाय्याने समजणे शक्य होते. उदा. एक फंडाचे आपणास १०० रुपयाचे ५ युनिट्स मिळाले तर फंडाची NAV २० रुपये प्रति युनिट आहे. ३ महिन्यानंतर समजा NAV २५ रुपये प्रति युनिट झाली तर तर गुंतवणुकीचे मूल्य ५ x २५ = १२५ रुपये म्हणजे या व्यवहारामध्ये आपणास रुपये २५ फायदा झाला.

आता आपण NAV(MUTUAL FUND NET ASSET VALUE) कशी काढतात हे बघू.

म्युच्युअल फंडाची मालमत्ता ही प्रतिभूती (securities) आणि नगद (cash) या दोन प्रकारांत असते. प्रतिभूती (securities) म्हणजे रोखे, शेअर्स  (bonds and shares). म्युच्युअल फंडाने गुंतवणूक केलेले रोखे, शेअर्स आणि नगद  यांची बाजाराचे कामकाजाचे दिवशी बाजार बंद होतो (market closing value) त्या वेळेचे मूल्य होय.  लाभांश आणि उपार्जित व्याजही (accrued interest) यात जमा धरले जाते.

नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value ) = (मालमत्ता – देणी )/(युनिट्स ची संख्या

Net Asset Value = (asset- debt)/number of outstanding units.

वरील सूत्रानुसार:

मालमत्ता (asset) म्हणजे म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे बाजारातील मूल्य + येणी (reveivables ) + उपार्जित उत्पन्न (accrued Income).

देणी (debt)  म्हणजे दायित्व (liabilities) आणि उपार्जित खर्च (accrued Expenses) यांची बेरीज.

खर्च : फंड चालवण्यासंबंधीचे खर्च  ( प्रशासन खर्च + व्यवस्थापन खर्च + विपणन (marketing / distrubution) + ऑडिट फी + अभिरक्षक फी (custodian fee))

म्युच्युअल फंड हा पूर्णतः शेअर बाजारावर अवलंबून असल्याने बाजाराचे कामकाज संपलेनंतर त्या दिवशी असणारे गुंतवणुकीचे बंद मूल्य (investment closing value)विचारात घेतले जाते. त्यामुळे नक्त मालमत्ता मूल्य (Net Asset Value ) हे त्या दिवशीच्या बाजाराच्या बंद वेळेनंतर जाहीर होते.

नक्त मालमत्ता मूल्य (NAV) आणि लाभांश (DIVIDEND)

म्युच्युअल फंडास होणाऱ्या नफ्यातून काही भाग हा लाभांश रूपाने प्रति युनिट्स प्रमाणे गुंतवणूकदारांना वाटला जातो. याचा युनिट्स NAV  वर काय परिणाम होतो हे खालील उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

प्रति युनिट्स चे मूल्य (NAV): रुपये १०  

युनिट्स ची संख्या : १००

गुंतवणुकीचे मूल्य: १० x १०० = १०००

समजा वरील गुंतवणुकीस रुपये २ प्रति युनिट असा लाभांश जाहीर झाला तर

युनिट्स ची संख्या : १००

लाभांश: १०० x २ =२०० रुपये

लाभांश वाटप झाल्यानंतर युनिट्स मूल्य

युनिट्सची संख्या : १००

लाभांश वाटप झालेनंतर युनिट्स चे मूल्य : रुपये ८

गुंतवणुकीचे मूल्य: १०० x ८ = ८००

गुंतवणुकीचे नवीन मूल्य + लाभांश (८००+२००) =१००० रुपये असे होईल.

म्हणजेच लाभांश वाटप केल्यानंतर युनिट्स चे नक्त मूल्य (NAV) कमी होते. थोडक्यात म्युच्युअल फंडास मिळालेल्या नफ्यातून जी रक्कम युनिट धारकास वाटप केली जाते त्या प्रमाणात युनिट्स मूल्यामध्ये घट होते. अखेरीस गुंतवणूक मूल्य तेवढेच राहते.

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment