Mutual fund information in marathi | म्युच्युअल फंडाची ओळख

mutual fund information in marathi: भारतामध्ये अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा एक किफायतशीर पर्याय आहे. आजवर मागील काळामध्ये म्युच्युअल फंडाने (Mutual Fund) चांगले परतावेही दिले आहे. या प्रकरणामध्ये आपण म्युच्युअल फंडाची (Mutual Fund) ओळख करून घेऊ. म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे काय, तो कसा चालतो, कोण चालवतो याविषयी आपण मुलभूत गोष्टी बघू.

हेसुद्धा वाचा: चक्रवाढ गतीची शक्ती | Power of Compounding in marathi

mutual fund information in marathi

mutual fund information in marathi

म्युच्युअल फंड: (MUTUAL FUND)

आपला कष्टाने कमावलेला पैसे हा सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या पर्यामध्ये गुंतवावा असे बऱ्याच जणांना वाटत असते. आणि ते काही गैर नाही. पण प्रत्येकालाच आर्थिक व्यवहारांची चांगली माहिती / ज्ञान असेलच असे नाही. मग अशावेळी म्युच्युअल फंड योग्य ती भूमीका पार पडतो.

म्युच्युअल फंड ह्या गुंतवणूक पर्यायामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात आणि एका विशिष्ठ उद्देशासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायामध्ये ते गुंतवले जातात. उदा. शेअर बाजार, बॉंड, नाणेबाजार . असे म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना / कंपन्याना Asset management company(AMC) असे म्हणतात. म्युच्युअल फंडाची संस्थात्मक रचनेसाठी येथे क्लिक करा

भारतातील म्युच्युअल फंडाचा इतिहास (HISTORY OF MUTUAL FUND IN INDIA)

भारतामध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI ) च्या माध्यमातून १९६४ साली म्युच्युअल फंडाला सुरुवात झाली. ही भारतातील सर्वात पहिली संस्था होय. १९८७ पर्यंत UTI ची मक्तेदारी होती. १९८७ सालानंतर काही बँका (SBI, PNB, Canara) , LIC आणि इतर मिळून आठ नवीन म्युच्युअल फंड स्थापन केले. १९९३ नंतर खाजगी क्षेत्राला म्युच्युअल फंड स्थापन करण्याची मुभा मिळाली. १९९६ साली SEBI (Security & Exchange Board of India) ने म्युच्युअल फंड मार्गदर्शक तत्वे अमलात आणली. आजमितीला (मार्च ’१६ ) भारतामध्ये ४३ म्युच्युअल फंड संस्था अनेक योजनांमार्फत आपला व्यवसाय करत आहेत. (म्युच्युअल फंड संस्था कोणत्या हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा).

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शेअर बाजार किंवा बॉंड मध्ये गुंतवणूक करावीशी वाटते पण पैसे बुडण्याची भीती वाटत असते आणि तसे आपण आजूबाजूला घडलेल्या घटनाही ऐकत आलेलो असतो. अशावेळी म्युच्युअल फंड हा मध्यस्थाची भूमिका पार पडतो. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते विशिष्ठ योजनेमार्फत विविध पर्यायामध्ये गुंतवले जातात. याबदल्यात गुंतवणूकदारास युनिट्स दिले जातात. युनिट्स बद्दल आपण स्वतंत्र प्रकरणात माहिती बघू.

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का ? (WHY MUTUAL FUND FOR INVESTMENT)

वर सांगितल्या प्रमाणे म्युचुअल फंड हा मध्यस्थाची भूमिका बजावतो. गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का याची काही कारणे खालीलप्रमाणे देता येतील.

व्यावसायिक तज्ञांचे मार्गदर्शनाखाली गुंतवणूक 

गुंतवणूक हि काही वाटते तेवढी सोपी बाब नाही. त्यासाठी सखोल ज्ञान असावे लागते. प्रत्येक फंड हाउस पैश्याच व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजरची नेमणूक करतो. त्याला लागणारे तज्ञ सहाय्यक आणि इतर गोष्टीची तरतूद करतो. तुमची गुंतवणूक हि अशा तज्ञामार्फात व्यवस्थापित केली जाते. बाजारातील माहिती गोळा करणे त्यावर रिसर्च करणे, भविष्यातील जोखीम ओळखणे आणि तिचे निवारण करण्यासाठी लागणारी उपाययोजना करणे हे फंड मॅनेजर आणि त्याची टीम काम करत असते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीस चांगला परतावा मिळेल यासाठी कटिबद्ध असतात.

कमी पैशामध्ये सुरुवात करता येते:

आपण जर शेअर बाजार किंवा बॉंड यामध्ये थेट गुंतवणूक करायचे ठरवले तर त्यासाठी बऱ्यापैकी निधी असावा लागतो. पुरेसे पैसे नसेल तर आपण Diversified Portfolio (वेगवेगळ्या योजनेत पैसे गुंतवणे) बनवू शकत नाही. म्युचुअल फंडामध्ये अगदी रुपये ५००० मध्ये Diversified Portfolio गुंतवू शकतो. कारण आपल्यासारखे अनेक लहान गुंतवणूकदार या योजनेत पैसे भरतात आणि मिळून मोठी रक्कम जमा होते. हीच रक्कम पुढे शेअर बाजार किंवा बॉंड यामध्ये गुंतवली जाते. त्या प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीत आपला सहभाग असतो. उदा. एखाद्या बॉंड मध्ये कमीतकमी गुंतवणूक हि जर रुपये २०,००० असेल तर आपणास हे सर्व पैसे भरणे शक्य नसते. मग अशावेळी अनेक गुंतवणूकदारांच्या एकत्रित जमा झालेल्या पैशामार्फत गुंतवले जातात.

कमी जोखीम: पैसे हे गुंतवणूक तज्ञाच्या मार्फत गुंतवले जात असल्यामुळे जोखीम कमी असते. कारण त्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्राचा अभ्यासू तज्ञ उपलब्ध असतो. आणि ते गुंतवणुकीतील जोखीम हाताळण्याचे काम करतात.

तरलता (वाटेल तेव्हा पैसे गुंतवता / काढता येतात) : म्युचुअल फंडामध्ये काही विशिष्ट योजनेत पैसे गुंतवले असता आपणास गरजेनुसार भरता किंवा काढता येतात. हे त्या योजनेच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असते. व्यवहारांमध्ये सहजता येते. आपण स्वतंत्र प्रकरणामध्ये विविध योजनांची माहिती बघू.

पारदर्शकता : 

सेबी (SEBI – Security & Exchange board of India) मार्फत म्युचुअल फंडाचे नियमन केले जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारास आळा बसतो. म्युचुअल फंडास त्याची गुंतवणूक हि वेळोवेळी प्रकाशित करणे बंधनकारक असते. त्यामुळे व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री देता येते.

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment