म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज काय असतात जे जाहिरातीत सांगतात ? | Read schame releted documents carefully

Mutual Fund Scheme Related Document: म्युच्युअल फंडाच्या जाहिराती आपण
टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामध्ये योजनेमध्ये
गुंतवणुकी विषयी माहिती दिलेली असते. सर्वात खाली एक वाक्य लिहिलेले असते. म्युच्युअल
फंडाच्या गुंतवणुकी बाजार पेठेतील जोखमीच्या अधिन असतात. गुंतवणूक
करण्यापूर्वी योजनेशी संबंधित दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.

प्रत्येक कंपनी जाहिरातीवर अशा प्रकारचा इशारा देत असतात. यावरून असे
स्पष्ट होते की हे गुंतवणूक करण्यापूर्वी दस्तावेज (Mutual Fund Scheme
Related Documents) वाचणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे.

Mutual Fund Scheme Related Document

म्युच्युअल फंड योजनेची दस्तावेज काय असतात? Mutual Fund Scheme Related Document):

 • योजनेचे माहिती पत्रक/ पुस्तक : Scheme information documents -SID
 • योजनेचे अधिक/ वाढीव माहिती पत्रक/ पुस्तक: Scheme additional information – SAI
 • महत्वाच्या माहितीचे निवेदन: Key information memorandum – KIM

योजनेचे माहिती पत्रक/ पुस्तकामधे (Mutual Fund Scheme Related Documents) काय माहिती असते:

 1. फंड योजनेचे नाव (Name of Scheme): संबंधित योजनेचे नाव
 2. योजनेचा प्रकार (Type of Scheme) : इक्विटी फंड, डेट फंड, बॅलन्स फंड इत्यादी.
 3. फंडाचा गुंतवणुकीचा उद्देश (Investment Objective) : या फंडाचे उद्दिष्टं काय आहे ते बद्दल माहिती असते.
 4. मालमत्तेची गुंतवणुकी साठी वाटणी नमुना  (Asset Allocation):
  गुंतवणूकदारांचा पैसा अशाप्रकारे गुंतवला जाणार आहे हे यामध्ये नमूद
  केलेले असते. कुठल्या असेट क्लास (इक्विटी, डेट, कमोडिटी, इतर) मध्ये किती
  प्रमाणात गुंतवणूक असणार आहे याचा नमुना दिलेला असतो.  उदा. HDFC balanced
  fund या योजनेकडून 60%इक्विटी आणि 40% डेट प्रकार किंवा मागणी पैसा
  बाजारातील पर्यायांमध्ये गुंतवले जातील. यातील टक्केवारी थोड्याफार फरकाने
  बदलली जाऊ शकते.
 5. योजनेतील जोखीम (Risk Profile):
  गुंतवणूक म्हटलं कि जोखीम आली. जोखीम हि त्या त्या गुंतवणूक प्रकारावर
  अवलंबून असते. योजनेत जमा झालेला पैसा वेगवेगळ्या पर्यायामध्ये गुंतवला
  जातो. योजनेच्या दस्तावेजामध्ये योजनेतील या जोखीम संबंधी उल्लेख केलेला
  असतो. फंड कंपनीस या सर्व गोष्टी उघड करणे कायदेशीर बंधन आहे. या सर्व
  जोखीम वाचून आणि समजून घेऊन मगच आपला गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा असे
  अपेक्षित असते.
 6. योजनेत गुंतवणुकीचे विविध पर्याय (Investment Plan / Option) :
  म्युच्युअल फंड योजनेअंतर्गत काही पर्याय असतात. गुंतवणूक करते वेळी हे
  पर्याय निवडणे बंधनकारक असतात. उदा. HDFC balanced fund हि योजना दोन
  पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पहिला नियमित गुंतवणूक पर्याय (Regular Plan),
  दुसरा थेट गुंतवणूक (Direct Plan) पर्याय. यामध्ये अजून 2 उपपर्याय असतात.
  पहिला वृद्धी (Growth Option) आणि दुसरा लाभांश (Dividend Option) (लाभांश
  पर्यायांमध्ये किती महिन्यांनी लाभांश मिळणार (लाभांशाची वारंवारता) हेही
  नमूद केलेले असते)
 7. योजनेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी रक्कम (Minimum Application Amount):
  म्युच्युअल फंडामध्ये सहभागी होणेसाठी कमीतकमी रक्कम निर्धारित केलेली
  असते. योजनेमध्ये पहिल्या गुंतवणुकीनंतर आपणांस पुन्हा काही वाढीव गुंतवणूक
  करणार असाल तर त्यासाठी कमीतकमी रक्कम किती असावी हेसुद्धा निर्धारित
  केलेले असते.
 8. विमोचन (Redemption): योजनेचे युनिट्स ची विक्री केल्यानंतर किती दिवसांमध्ये हि रक्कम गुंतवणूकदारांना प्राप्त होणार हा कालावधी नमूद केलेला असतो.
 9. मागील काळातील कामगिरी (Past Performance):
  योजना सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत योजनेची कामगिरी संबंधी आढावा दिलेला
  असतो. या विभागातील अजून काही योजनेशी यांची तुलना केलेली असते. बाजारातील
  बेंचमार्क इंडेक्सशी यांची तुलना केलेली असते. मागील काळामधील नमूद केलेली
  कामगिरी ही भविष्यात कायम राहील याची शाश्वती नसते. यातून आपण योजनेविषयी
  अंदाज बांधू शकतो.
 10. योजनेचा बेंचमार्क इंडेक्स – तलचिन्ह निर्देशांक  (Benchmark Index):
  सदर योजनेची कामगिरी तपासण्यासाठी कुठल्या बेंचमार्क इंडेक्सशी तुलना
  होणार आहे त्या इंडेक्स चे नाव या ठिकाणी दिलेले असते. उदा. HDFC Balanced
  Fund साठी CRISIL Balanced Fund Index
 11. फंड मॅनेजर ची ओळख (Fund Manager): योजना चालवणारा फंड व्यवस्थापक, त्याचा कालावधी व त्याची संबंधित माहिती यामध्ये उपलब्ध असते.
 12. ट्रस्ट कंपनीचे नाव (Name of the Trust): योजनेच्या ट्रस्ट कंपनीचे नाव या ठिकाणी दिलेले असते.
 13. योजनेचा खर्च (Scheme Expenses):
  गुंतवणुकी वरील खर्च जसे की चार्जेस, एन्ट्री लोड, एक्सिट लोड, योजना
  बदलवण्यासंबंधी चार्जेस, मध्यस्थाचे कमिशन, कर या संबंधी अचूक माहिती या
  ठिकाणी उपलब्ध असते.
 14. रोखासंग्रह गोषवारा (Portfolio Details):
  अलीकडील काळातील महत्वाच्या गुंतवणूक (Top ten Investments) आणि
  गुंतवणुकीचे प्रकार (सेक्टर नुसार) आणि प्रमाण यांचा उल्लेख  केलेला असतो.
 15. NAV प्रकाशन (NAV Publication) : रोज जाहीर होणाऱ्या नाव बद्दल माहिती दिलेली असते.
 16. व्यवस्थापनाखाली असणारी मालमत्ता आणि  खाते पृष्ठ संख्या )Asset Under Management and Total Folios): व्यवस्थापनाखाली असणारी एकूण मालमत्ता आणि  खाते पृष्ठ संख्या यांची माहिती दिलेली असते.
 17. योजनेचे अर्ज (Forms ) : योजनेत सहभागी होणेसाठीचा
  • अर्ज (Application Form) आणि त्यासंबंधीचे सूचना पत्रक(Instruction),
  • त्रयस्थ पक्ष भरणा प्रतिज्ञा अर्ज: Third Party payment Declaration Form:
  • खात्यावर नावे घालण्यासाठी एकावेळी देण्याचे अधिपत्र: OTM Debit Mandate Form NACH/ECS/DIRECT DEBIT/SI (OTM (One time Mandate)
  • SIP form (पद्धतशीर गुंतवणूक योजना) ,
  • SWP (पद्धतशीर निष्कासन योजना)  Form
 18. AMC बद्दल माहिती: मालमत्ता व्यवस्थापन कंपनी विषयी माहिती, संपर्क कार्यालय आणि संपर्कासाठी पत्ता, टेलिफोन, ई-मेल इत्यादी.

नमुना दाखल HDFC Fund चा HDFC Balanced Fund चे scheme related documents डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शब्दार्थ

 • Mutual Fund scheme: परस्पर निधी योजना
 • Memorandum: ज्ञापन, निवेदन, टाचण संक्षेपलेख
 • Offer Document: प्रस्ताव दस्तावेज
 • Factsheet : वस्तुस्थितीचा गोषवारा, सत्यस्थिती पत्रक
 • Mutual Fund Manager: परस्पर निधी योजनेचा व्यवस्थापक
 • Fee: शुल्क
 • Entry Load: प्रवेश भार, म्युच्युअल फंड योजनेत सहभागी होणेसाठी आकारलेले शुल्क
 • Exit Load: निर्गम भार, योजनेतून बाहेर पडण्यासाठी आकारलेले शुल्क
 • Benchmark Index: तलचिन्ह (संदर्भचिन्ह) निर्देशांक
 • Redemption:  विमोचन (गहाण सोडवणे), गुंतवणूक काढून घेणे (म्युच्युअल फंड)
 • Asset Allocation: मालमत्तेची विल्लेवारी/वाटणी
 • Portfolio: रोखासंग्रह
 • Commodity:  विक्रेय वस्तू
 • debt: कर्ज
 • Recurring Expenditure: आवर्ती खर्च
 • Asset Under Management: व्यवस्थापनाखाली असणारी मालमत्ता
 • Folios : खाते पृष्ठ संख्या
 • Ledger Folio: खातेवही पृष्ठ
 • Third Party payment Declaration Form: त्रयस्थ पक्ष भरणा प्रतिज्ञा अर्ज
 • OTM (One time Mandate) Debit Form – ECS, Direct Debit, SI – खात्यावर नावे घालण्यासाठी एकावेळी देण्याचे अधिपत्र.
 • ECS (Electronics Clearance System): इलेक्रोनिक्स पद्धतीने पैसे काढणे / विनंती वटवणे
 • Electronics: वीजकशास्र
 • SI (Standing Instruction): स्थायी सूचना /आदेश

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment