ACTIVELY MANAGED FUND VS INDEX FUND IN MARATHI | सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड यामधील फरक

गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवला जातो. हा पैसा फंड मॅनेजर नावाच्या तज्ज्ञ व्यक्तीच्या नजरेखाली गुंतवला जातो. फंड मॅनेजरच्या व्यतिरिक्त त्याच्या टीम मध्ये वेगवेगळ्या गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ (Expert), विश्लेषक, आणि इतर कर्मचारी असतात. या सर्व टीमच्या साहाय्याने फंड व्यवस्थापित केला जातो त्यास सक्रिय व्यवस्थपित फंड (Actively managed fund) असे म्हणतात. फंड मॅनेजर हा म्युच्युअल फंड योजनेचे उद्धिष्ट साध्य करण्यासाठी चांगला परतावा क्षमता (potential) असलेले शेअर्स, बॉण्ड आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करत असतो. फंड मॅनेजर गुंतवणुकीस जबाबदार असतो. याउलट इंडेक्स फंड  (Index fund) असतो.

ACTIVELY MANAGED FUND VS INDEX FUND IN MARATHI

गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडाकडे आलेला पैसा एखाद्या निर्देशांकातील कंपनीज मधील समभागामध्ये  गुंतवला जातो. त्यास निर्देशांक फंड (Index fund) असे म्हणतात.  उदा. सेन्सेक्स या मुंबई बाजारातील निर्देशांकामध्ये असणाऱ्या 30 कंपनी मध्ये हा पैसा प्रमाणशीर गुंतवला जातो. त्यामुळे सेन्सेक्सची जेवढी वाढ होईल त्या प्रमाणात म्युच्युअल फंड NAV मध्ये वाढ होईल. या गुंतवणुकीसाठी फंड मॅनेजर कडून कुठल्याही प्रकारचे कौशल्य वापरले जात नाही. त्याची भूमिका असक्रिय (Passive) असते. तरीही मागील दीर्घ काळातील कामगिरी पाहता निर्देशांक फंडाने चांगला परतावा दिलेला आहे.

सक्रिय व्यवस्थापित फंड आणि असक्रिय व्यवस्थापित फंड/निर्देशांक फंड यामधील फरक (ACTIVELY MANAGED FUND VS INDEX FUND)

 1. साधेपण (Simplicity): सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणूक खूप क्लिष्ट असते. त्यामध्ये ट्रेंड (बाजाराचा कल) नुसार वेळोवेळी बदल केला जातो. त्याउलट असक्रिय व्यवस्थापित/निर्देशांक  फंडाची गुंतवणूक निर्देशांकावर आधारित कंपनीमध्ये असल्याने गुंतवणूक समजण्यास क्लिष्ट नसते उदा. सेन्सेक्स मधील ३० कंपनी मध्ये केलेली गुंतवणूक.
 2. व्यवस्थापन (Management): सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणूकसाठी फंड मॅनेजरला त्याला सहाय्यक म्हणून विविध गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ, विश्लेषक आणि इतर लोक त्याच्या  मदतीला असतात. ठरवून दिलेला बेंचमार्क इंडेक्स पार करण्यासाठी गुंतवणूक तंत्र (Investment Strategy) वापरावे लागते. वेळोवेळी गुंतवणूक मुल्याकंन करावे लागते. जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. याउलट असक्रिय व्यवस्थापित फंड / निर्देशांक फंड (Index fund) गुंतवणूकसाठी फंड मॅनेजरला खास कौशल्य वापरावे लागत नाही. गुंतवणूक परतावा निर्देशांकावर आधारित असतो.
 3. उलाढाल (portfolio turnover):  सक्रिय व्यवस्थापित फंड (Actively managed fund) गुंतवणुकीचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. बाजाराचा कल (Market Trend)  पाहून गुंतवणुकीत वेळोवेळी बदल करावे लागतात. त्यासाठी रॊखासंग्रह (Portfolio) मधील काही गुंतवणूक विकून नवीन गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करावी लागते. यातूनच उलाढाल वाढते. याउलट निर्देशांक फंडमध्ये (Index fund) उलाढाल अगदी नगण्य असते.
 4. योजना चालवण्याचा खर्च (operational expenses): सक्रिय व्यवस्थापित फंड गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर सहित खूप मोठी टीम काम करते. शिवाय या योजनेची वर सांगितलेप्रमाणे उलाढाल खूप जास्त असते. त्यामुळे योजना चालवण्याचा खर्च (Fund management expenses) खूप असतो (साधारणपणे २-३%). याउलट निर्देशांक आधारित फंड व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ कमी (नगण्य) लागते आणि उलाढाल कमी असते. परिणामी खर्चही खूप कमी असतो.
 5. कामगिरी (Performance): सक्रिय व्यवस्थापित फंड गुंतवणुकीची कामगिरी हि फंड मॅनेजर आणि टीम च्या कौशल्यावर आधारित असते फंड मॅनेजरने केलीली घोडचूक योजनेस महागात पडू शकते.  तर निर्देशांक आधारित फंडाची कामगिरी हि निर्देशांकाच्या कामगिरीवर अवलंबून असते. त्यामध्ये शंका घेण्यास वाव नसतो.

वरील मुद्दे उदाहरणाच्या साहाय्याने बघू:

ACTIVELY MANAGED FUND VS INDEX FUND IN MARATHI
ACTIVELY MANAGED FUND VS INDEX FUND IN MARATHI

आलेख सौजन्य: moneycontrol.com

वरील आलेखानुसार

 • योजनेचे नाव: HDFC Index Fund – Sensex Plus Plan – Direct Plan
 • योजनेचा प्रकार: इंडेक्स फंड / निर्देशांक फंड
 • योजनेचा खर्च: ०.७५%
 • परतावा (मागील १ वर्षातील): २१.९६% (बारकाईने आलेख पहिला तर सेन्सेक्स प्रमाणेच योजनेचा आलेखही वर खाली होतो असे दिसून येईल)
 • पोर्टफोलिओ (गुंतवणूक): सेन्सेक्स मधील ३० कंपनी.

सारांश:

सक्रिय व्यवस्थापित फंड आणि निर्देशांक फंड  या दोन्ही प्रकारच्या फंड मधील गुंतवणूक फायदे आणि तोटे दर्शवणारी आहे. मागील दीर्घ काळातील कामगिरी पाहता निर्देशांक फंडाने चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य फंड निवडावा.

शब्दार्थ:

 • Actively managed fund: सक्रिय व्यवस्थापित फंड
 • Index Fund: निर्देशांक फंड
 • Passive  managed fund: असक्रिय व्यवस्थापित फंड
 • Brokerage: आडत, दलाली
 • Fund Manager: म्युच्युअल फंड चालवणारा व्यवस्थापक, हा फंड गुंतवणुकीस जबाबदार असतो.
 • Market Trend: बाजाराचा कल
 • Portfolio: रोखासंग्रह
 • Scheme operational expenses: योजना चालवण्याचा खर्च

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment