पोळ्याच्या शुभेच्छा | Bail Pola shubhechha banner | Bail pola shayari status

बैल पोळा शुभेच्छा

बैल पोळा सणाविषयी माहिती | बैल पोळा निबंध मराठी

श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा किंवा बैल पोळा. कर्नाटक, महाराष्ट्रात याला बैल पोळा म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असे म्हणतात. कर्नाटकाच्या काही भागात ‘कार्हुनावी’ म्हणतात.

या दिवशी बैलांना शेतकरी पहाटे आंघोळ घालतात. त्यांना खूप सजवतात. घरात पुरणपोळी, कापणी, करंजी, शंकरपाळी असे पदार्थ बनवले जातात. बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेत करी करून घेत नाहीत. बैलांबरोबरच इतर जनावरां नाही सजवले जाते. सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते.

हेही वाचा: गणेश चतुर्थीच्या मराठीत शुभेच्छा

काही जण धान्यांची खिचडीही पुरणपोळीबरोबर जनावरांना देतात. या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात दिसतात. ज्यांच्याकडे बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करतात. फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करत आहेत. बैलाविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट, लेख ही प्रसिद्ध आहेत.

या बैलपोळा अर्थात बेंदूर सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाढते. ती आपण चिरंतन ठेवूया. शेतीला पूरक व्यवसाय पशूपालन आहे. आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया. त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देवूया.

बैल पोळा फोटो शुभेच्छा

बैल पोळा शायरी

तुझ्याविना त्याची गाडी थांबते

राब राब राबला तरी एकटा पडते

तो जरी असेल पोशिंदा जगाचा

पण त्याचे बळ तू आहेस सच्चा मित्र शेतकरी बापाचा…

कधी शिव्या घालत तो तुला राबवते

तर कधी मायेने तो तुला कुरवाळते

तो जरी कठोरपणे वागला तरी तू जीव आहेस त्याचा

त्याचा खंबीर आधार आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा…

राबतोस तू उन्हात तर कधी पावसात

मात्र याची त्याला पुरेपूर जाणीव असते

अन् तुला काही झाले की काळीज त्याचे धडकी भरते

कारण त्याचा देवता आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा…

सण येताच तुझा बैलपोळ्याचा

तुझ्या शृंगारासाठी धडपड तो करते

तुझ्या आरामाच्या दिवशी तुला नवरदेववानी नटवते

विनामूल्य राबणारा सखा आहेस तू सच्चा मित्र शेतकरी बापाचा…

या सणाच्या दिनी तुला सकाळी अंघोळ तो घालते

अंगावर गेरूने ठिपके, शिंगांना बेगड आणि डोक्याला बाशिंग बांधते

गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा अन् पायात चांदीचे तोडे घालून देते

नवी वेसण, नवा कासरा अन् अंगावर रेशमी झुल तो तुजला पांघरूण देते…

पुरण पोळीचा घास भरवून तुझं तोंड गोड करते

आयुष्यभर अशीच साथ दे हा आशीर्वाद तुला मागते

अशा या बैलपोळ्याचा शुभेच्छा देऊन तुझे आभार तो मानते

कितीही रागवला तुला तरी आहेस तू सच्चा मित्र माझ्या शेतकरी बापाचा…

आला आला पोळा 

सण हा मराठमोळा

पुरणपोळीचा नैवेद्य 

सर्ज्याराजाला दावा

एक दिवस मायेचा

वर्षे कष्टात जायचा 

आज आहे द्यायचा 

गोड नैवेद्य खायचा

त्यांना नटवा मिरवा 

शिंगे नाजूक सजवा

बाकदार पाठीवरती 

झुल मखमली बसवा 

गळ्यात घंटणी माळा

पायात घुंगराच्या वाळा 

आज आहे सण पोळा

सर्ज्या राजाला ओवाळा 

___________________________

नको लावु फास।। बळीराजा गळा।। 

आज दिनी पोळा।। दे वचन।। 

आयुष्यभर मी।। राबेल शेतात।। 

तुझीया सोबत।। नेहमीच।। 

नको गोड धोड।। राहो तु जिवंत।। 

गोड ते गवत।। खाईन मी।। 

जगाचा पोशिंदा।। रहावा अमर।। 

असो सरकार।। कुणाचेही।।

_____________________________

“तू रे वाहन शिवाच, कोणी म्हणे तूला नंदी,

तूझ्या असन्याने आहे दारी चैतन्याची नांदी.

तूझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद,

तूझ्या हंबराला आहे बळीराजा चा आवाज.

तूझी झूल नक्षीदार जस भरल शिवार,

तूझ्या शिंगांचा रूबाब जनु कनिस डौलदार.

पिंजलेला जिव सारा कुणब्याची घुसमट,

तुझ्या असन्यान धिर तूझ्या असन्यान थाट.

तूझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन,

तूस्या सवे रान सार राहो सदा आबादान.”

______________________________________

हातात घेऊनि बैलांची दावे… 

तू ही बैलगाडी हाकायला सुरवात केली…

राजा – सर्ज्या अशी त्यांची नावे…

अन त्यांनीही तुला आता साथ दिली…

____________________

  ~बैल पोळा~

बळीराजाचा मित्र तू

त्यांच्या डोक्यावरचं छत्र

हरपू न देणारा तू…

शेतकऱ्यांचा राजा तू

सुखातल्या क्षणांचा

गाजावाजा करून देणारा तू…

शेतकरी राजांच्या मातीची

पायाभरणी करून पिक 

उत्पादन मिळवून देणारा तू…

कॄषिप्रधान लोकांना

रुबाबदार ऐट मिळवून

देणारा सर्जा राजा तू…

तूझ्या शॄंगारासाठी नेहमी

शेतकरी राजा सज्ज असतो

असा हा सण बैल पोळा…

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

_____________________

“माझा धनी सुखी राहू दे

राबेन वेळोवेळा

कष्टाच्या गळ्यातील

सांगतात माळा

चल माणसा जाणून घे

अंतरीच्या बोला

कृतज्ञतेने साजरा करू

बैलपोळा.. बैलपोळा “

_____________________

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…

प्रपंच आमुचे उजाड अंगण,

तुझ्याच घामाने होते नंदनवन…

घे मनमुराद आज सजून,

भाजी भाकर गोड मानून,

होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,

बैल पोळ्याच्या तुलाही खूप खूप शुभेच्छा. 

________________________

वावर वाडा सारी 

बापाची पुण्याई 

किती करू कौतुक तुझं

मीच त्यात  गुंतून जाई

तुझ्या या कष्टाने फुलून

येते ही काळी आई

____________________

आज आला सण 

बैल पोळ्याचा

बैल राजाच्या 

कौतुक सोहळ्याचा

_________________

राजा आहेस रे तू माझा आयुष्यभर साथ देतोस

माझ्यासोबत राहुन माझं आयूष्य घडवतोस

घालूनी तुला चारा पाणी पोट माझं भरवतोस

वर्षातून एकच दिवस असतो रे आराम तुला

तरीही माझ्यासाठी राब राब राबतोस

________________________________

सोन्या मोत्याची ती जोड 

लावते गावभर दौड 

कशी दिसती रुबाबदार 

शेतकऱ्याची त्यावर मदार

करती काबाड कष्ट 

त्यांची निराळीच गोष्ट 

अशी बैल जोडी ची शान

शेतकऱ्यांचा जणू ते प्राण.

शेतकऱ्यांचा जणू ते प्राण…!!


वाचा: गौरी गणपती सणाची माहिती । गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

पोळा

ओढलं एकर अन् एकर नांगर,

ओढली वरीसभर गाडी,

कामाशी राहिलो इमान मी,

म्हणून उभी राहिली माझ्या शेतकऱ्याची माडी.

कधी पडलो आजरी मी

तरी उठलो नव्याने,

मी केलेल्या कष्टाचे माप

आहे तुझ्या मायेपुढे उने ..

आज लेवली मला शाल

लावला शेंदूर शिंगाला,

सजलो दिमाखात मी

येते माय नजर काढाया..

पुन्हा राबण्या शेतात तुझ्या

घ्यायचा आहे जन्म सातवेळा,

माझ्या कष्टाचे ऋण फेडाया

कशाला हवा हा पोळा …….


सखा हा बळीराजाचा

रोज राबे शिवारात 

शोभे जगाचा पोशिंदा

आज सजूनी दारात 

सण येता हा बैलांचा 

सुखावतो कास्तकार 

गोड नैवेद्य देऊनी 

त्यांचे मानतो उपकार  

शीतल विशाल यादव 

____________________________

ओढतो सालभर फाळ,

तवाच फुलतं शेत शिवार..

झूल अंगी दिस पोळ्याला,

लावूनी कंठी घुंगरमाळ..

____________________

Sharing Is Caring:

Leave a Comment