४ स्वादिष्ट पराठे रेसिपी: नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी!

४ स्वादिष्ट पराठे रेसिपी नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी!

४ स्वादिष्ट पराठे रेसिपी: नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी!

चना-मेथी पराठे

साहित्य : दोन वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, मेथी, ओवा, जिरे, लाल मिरच्या आणि मीठ चवीनुसार.

कृती : दोन वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा याप्रमाणे पीठ घेऊन त्यात ताज्या मेथीची पानं बारिक चिरून घालावी. ओवा, जिरे, लाल मिरच्या वाटून ही पेस्ट पिठात घालावी. चवीप्रमाणे मीठ घालून पीठ घट्ट भिजवावं. फुलक्यांप्रमाणे छोट्या आकारात पराठे लाटावे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावेत. हे पराठे बरेच दिवस टिकतात.

हि रेसिपी सुद्धा वाचा: ठेचा: मराठी माणसाचा अभिमान! | एकदा करून बघाच.

मूग-मटार पराठे

• साहित्य : मोड आलेले हिरवे मूग, हिरवे मटार, हिरवी मिरची, पुदिना, लसूण, आलं, कढीपत्ता, जिरे पूड, लिंबाचा रस, कोथिंबीर, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, नारळाचं पातळसर दूध आणि मीठ.

कृती : मोड आलेले हिरवे मूग आणि हिरवे मटार एकत्र करून पाण्यात उकडत ठेवावे. उकडताना त्यात थोडं मीठ घालावं. शिजल्यावर रोळीत काढावे. मिक्सरमधून मूग-मटारची भरड करावी. हिरवी मिरची, पुदिना, लसूण, थोडं आलं आणि कढीपत्ता वाटून घेऊन त्यात मूग मटारची भरड घालावी. त्यात धणे, जिरे पूड, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर बारिक चिरून घालावी. या मिश्रणात गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ आणि थोडं डाळीचं पीठ मिसळावं. नारळाचं पातळसर दूध काढून त्या दुधात हे मिश्रण भिजवून पराठे करावेत. पराठे दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप सोडून चांगले भाजून घ्यावेत.

शाही पराठे

साहित्य : अक्रोड, बदाम, मनुका आणि काजूची बारिक पूड, गव्हाचे पीठ, नागलीचं पीठ, जिरे पूड, दूध, आणि

मीठ. कृती : अक्रोड, बदाम, मनुका आणि काजूची बारिक पूड करावी. गव्हाच्या पिठात थोडं नागलीचं पीठ वाटलेले ड्रायफ्रूड्स, चिमूटभर मीठ आणि जिरे पूड घालून दुधात पीठ भिजवावं. पीठाचा गोळा घेऊन आपल्याला हवे • त्या आकाराचे पराठे लाटावेत. साजूक तूप सोडून ते दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावेत.

मध-खोबऱ्याचे गोड पराठे

साहित्य : नारळाचं दाटसर दूध, गरजेप्रमाणे मध, दोन वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तुपाचं मोहन.

कृती : ओल्या नारळाचं दाटसर दूध घ्यावं. त्यामध्ये घालावे. दोन वाटी गव्हाच्या पिठात अर्धी वाटी तांदळाचं पीठ, तुपाचं मोहन घालावं. पीठ मळताना गरज वाटल्यास दुधाचा हात लावावा. फुलक्यांप्रमाणे पराठे लाटून ते दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment