मोबाईल किंवा संगणकावर मराठीत कसे टाईप करावे? | how to type in marathi on mobile or pc

लॅपटॉप असो किंवा डेस्कटॉप how type in marathi हे एक challange असल्यासारखे वाटते पण तसे नाही इंटरनेट च्या जगात वावरताना अशक्य असे काहीच नाही हाच बघा ना तुम्ही मराठी कसे लिहावे हा प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला सांगण्यासाठी हजार झालो, आणि तुम्ही इथे आलाच आहात तर माझ्या उत्तराने तुमचे समाधान करणे हे माझे कर्तव्य आहे. 

how to type in marathi

how to type in marathi on pc | type in marathi online

लॅपटॉप वर मराठीत लिहिण्यासाठी तुम्ही गूगल चे मराठी इनपुट टूल वापरू शकता, हे टूल तुमच्या browser मध्ये काम करते म्हणजे तुम्हाला तुमचे browser उघडून google वर marathi input online असे टाकायचे आहे मग त्यानंतर जी पहीली लिंक गुगल वर येईल त्यावर क्लिक करायचे आहे की झालं आता इथे तुम्ही मराठीत लिहू शकता आणि तुमचं संपूर्ण लिखाण झाल्यावर ते कॉपी करून तुम्हाला जिथे पेस्ट करायचे आहे तिथे पेस्ट करू शकत, गुगल च्या या टूल वर तुम्ही पुढच्या लिंक वर क्लिक करून थेट पोहचू शकता.

गुगल इनपुट टूल ला जा

How to type marathi on Mobile | how to type marathi in whatsapp android

मोबाईल वर मराठीत लिहिणे अगदी सोपे आहे त्यासाठी तुम्हाला google indic हे कीबोर्ड app प्ले स्टोर मधून डाउनलोड करावे लागेल, हे ऍप डाउनलोड केल्यानंतर उघडा आणि ऍप तुम्हाला जे instruction देईल ते follow करा, आता तुमचा कीबोर्ड सेट झाला आहे आता यामध्ये मराठी type करण्यासाठी शेवटची setting करायची आहे ती आपण पुढील screenshot च्या माध्यमातून पाहू.

type in english get in marathi app

इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व भारतीय भाषा दिसतील त्यातून तुम्हाला मराठी वर क्लिक करून ok दाबायचे आहे.

how to type marathi in whatsapp android

ok केल्यानंतर तुमची भाषा मराठी सेट होईल पण अजून एक सेटिंग आहे ज्यामध्ये पुढील गोष्टी विचारल्या जातील तेव्हा विचलित न होता पुढील पर्याय select करा

type in marathi google

पाहिलं लिहा select केल्यावर तुम्ही इंग्रजीत स्पेलिंग लिहिल्यावर मराठीत type होईल जसे की तुम्ही vijay स्पेलिंग लिहिल्यावर विजय असे मराठीत type होईल हा पर्याय ज्यांना कुठल्याही गोष्टीच स्पेलिंग सहज तयार करता येते त्यांसाठी सोयीस्कर आहे, ज्यांना स्पेलिंग लिहिण्यात अडचण आहे ते दुसऱ्या पर्यायाने मराठी लिहू शकता त्यामध्ये तुम्हाला सरळ बाराखडी दिलेली असते आणि काना देऊन शब्द तयार करावे लागतात.

या लेखात तुम्ही काय शिकलात?

Computer किंवा mobile smartphone या या दोन्ही उपकरणांवर गुगल च्या input tool चा वापर करून आपण How to type marathi हे समजून घेतले आहे मला आशा आहे की तुम्हाला या विषयात काही अडचण नसणार आहे पण तरीही एखाद्या मुद्द्यावर या लेखात लिहिण्याचे राहून गेले असेल तर कृपया तुमच्या टिप्पण्यांद्वारे मला लक्षात आणून द्या, त्या प्रश्नांची उत्तरे मी पुढील लेखात देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, मराठी कंटेंट वर मराठीत नवनवीन लेख वाचत राहा, जय महाराष्ट्र.

Sharing Is Caring:

Leave a Comment