कुठल्याही पासपोर्ट फोटो चा बॅकग्राऊंड पांढरा करा मोबाइल मध्ये | change passport photo background in marathi

change passport photo background colour

बहुतेक मंडळी sarkari naukri साठी किंवा इतर शैक्षणिक ऑनलाइन अर्ज करत असतात त्यातील बहुतेक जण मोबाइल वर forms भरतात, forms भरत असताना बऱ्याच जणांना फोटो अपलोड करण्याच्या टप्प्यावर अडचण येते करण तिथे फोटो चा background हा पांढराच हवा असे सांगितलेले असते पण आपल्याकडे पांढऱ्या बॅकग्राऊंड चा फोटो नसतो, तेव्हा आपण गोंधळून जातो, तर गोंधळून न जाता हे संपूर्ण गाईड वाचा जे तुम्हाला तुमच्या पासपोर्ट फोटो चा background white कसा करायचा हे सांगेल, आणि पासपोर्ट फोटो बद्दल इतर काही शंकांसाठी कंमेंट सेक्शन उघडे आहे.

चला तर सुरू करूया
तुम्ही फॉर्म भरताय याचा अर्थ तुमच्या फोन मध्ये पासपोर्ट फोटो आहे पण त्याचा backgraund हा पांढरा नाहीये.
किंवा तुमच्याकडे अपलोड करायला पासपोर्ट फोटोच नसेल तर घरीच पासपोर्ट size फोटो काढण्याचे गाईड खलील लिंक वर जाऊन वाचा.

हेही वाचा : घरीच मोबाइल मध्ये पासपोर्ट साईझ फोटो बनवा

आता तुमच्या फोटोच्या बॅकग्राउंड चा रंग पांढरा करण्यासाठी सगळ्यात अगोदर Google Play वरून PicsArt नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या.
ऍप उघडून त्यात तुमचा पासपोर्ट साईज फोटो टाका, आणि पुढील सर्व स्टेप्स आपण स्क्रीनशॉट च्या माध्यमातून समजून घेऊ

पाहिली स्टेप: + चिन्हावर क्लिक करा
स्टेप 2 : edit a photo या option वर क्लिक करा

आता तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो select करायचा आहे. recent वर क्लिक करून तुम्ही तुमचे सर्व फोटोंचे फोल्डर बघू शकता.


फोटो select केल्यावर कात्री च चिन्ह असलेल्या cutout या पर्यायावर क्लीक करा.
cutout या पर्यायावर क्लिक केल्यानंतर काही पर्याय उघडतील त्यातून तुम्हाला select नावाचा पर्यायावर click करायचे आहे.

आता Person या पर्यायावर क्लिक करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटोचा बॅकग्राऊंड select होईल.

आता राईट सिम्बॉल वर क्लिक केल्यावर बॅकग्राऊंड remove होईल.
आता खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे बाणाच्या बटनावर क्लिक करा

आता save बटनावर क्लिक करा, आता तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड विरहित (without background) फोटो यशस्वीरीत्या save केला आहे, आता तुम्हला त्या फोटोला पांढरा बॅकग्राऊंड टाकायचा आहे
त्यासाठी picsart बंद करा आणि पुन्हा उघडा, पुन्हा एडिट photo वर क्लिक करा 

edit photo वर क्लिक केल्यावर background या पर्यायावर क्लिक करा.


आता इथून पांढरा रंग background म्हणून select करा.


आता  तुम्ही पांढरा background select केलेला आहे आणि यावर तुम्हाला तुम्ही save केलेला तुमचा without background फोटो यावर चिटकवायचा आहे त्याआधी या बॅकग्राऊंड चा आकार तुम्हाला पासपोर्ट size 413×531 pixel करावा लागेल त्यासाठी खलील screenshot मधील दोन steps बघा

आता तुम्ही background हा पासपोर्ट size करून घेतला आहे आता शेवटची step आपल्याला त्यावर फोटो फसोफेस चिटकवायचा आहे त्यासाठी खलील स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे add photo या पर्यायावर क्लिक करा.

आता save केलेला without background फोटो select करा ADD या बटनावर क्लिक करा, 


फोटो select केल्यावर त्याची size मागील background शी आता आपल्याला मॅच करावी लागेल.
background शी फोटो मॅच करण्यासाठी खाली दिलेल्या screenshot मध्ये दाखवल्याप्रमाणे बटनाच्या साहाय्याने ओढा.

photo background शी व्यवस्थित मॅच झाल्यावर एकदा परत आपण फोटो ची size ही पासपोर्ट size 413×531 करून घ्यावी लागेल कारण एडिटिंग दरम्यान फोटोची साईज वाढते तेव्हा कुठलाही फोटो edit केल्यावर शेवटी त्याची size ही तपासून घ्यावी 
Size बदलण्यासाठी tools या पर्यायामधून Resize या पर्यायावर क्लिक करा

आता यामध्ये width 413 आणि height 531 करून RESIZE बटनावर क्लिक करा.

आता बाणाच्या बटनावर क्लिक करा.


आता save बटनावर क्लिक करा.

पुन्हा save या बटनावर click करा.


झालं! तुम्ही यशस्वीपणे तुमच्या पासपोर्ट फोटोचा background पांढरा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या