फेसबुक वर लिंक कशी लपवायची? | how to hide post link on facebook

फेसबुक वर लिंक कशी लपवायची

फेसबुक वर लिंक कशी लपवायची म्हणजे आधी समजून घ्या मला काय म्हणायचे आहे.

आजचा टॉपिक खरंच interesting आहे कारण आपण आज एक अजब टॉपिक बद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या फेसबुक पेज, ग्रुप किवा आपल्या न्यूज फीड वर एखाद्या वेबसाईट किंवा आपल्याच ब्लॉग पोस्ट ची लिंक टाकतो पण लिंक दिसते म्हणून ती पोस्ट जरा प्रोफेशनल वाटत नाही व जरा स्पॅम केल्यासारखे ती पोस्ट दिसते

म्हणून मग ती दिसू न देता फक्त त्या पोस्ट चे थम्बनेल दिसेल याप्रकारे ती लिंक कशी पोस्ट करावी?

सहज लागलेला शोध:

सहज एकदा लिंक शेअर करताना मला या गोष्टीचा शोध लागला म्हणजे अगदीच ऍक्सिडंटली तोच अनुभव आणि एक अनोखी ट्रिक शेअर करावीशी वाटली म्हणून आज ही पोस्ट लिहितोय आवडली तर नक्की शेअर करा, आणि कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

चला सुरू करूया – फेसबुक वर लिंक कशी लपवायची

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच हा ब्लॉग नवीन होता तेव्हा मी ब्लॉग पोस्ट नेहमी फेसबुक वर शेअर करायचो, तेव्हा अनेक वेळा मी लिंक पेस्ट करून पब्लिश करून टाकायचो,

पण एकदा अशी गम्मत घडली की मी लिंक पेस्ट केली आणि पोस्ट करणार तितक्यात ती लिंक भलत्याच दुसऱ्या पोस्ट ची होती हे मला प्रीव्यु मध्ये दिसले म्हणून ती मी डिलीट केली, लिंक डिलीट केल्यावर असे लक्षात आले की लिंक डिलीट केल्यावर सुद्धा प्रीव्यु तसाच राहिला, मग मी तोच प्रयोग पुन्हा जी लिंक शेअर करायची होती तिच्यासोबत केला,

मी ती लिंक फेसबुक वर पेस्ट केली आणि preview लोड झाल्यानन्तर काढून टाकली आणि पोस्ट च्या बटनावर क्लिक केले, Ureka अहो झाली ना पोस्ट ती लिंक, तीसुद्धा लिंक दिसू न देता,

अश्या या ट्रिक चा शोध अपघाताने लागला, चला तुम्हाला शंका असेल तर खलील फोटो मध्ये तुम्हाला लिंक चा स्क्रीनशॉटच देतो..

फेसबुक वर लिंक कशी लपवायची

बघितलं का? जर अजूनही शंका असेल तर बघा करून आपल्या या पोस्ट ची लिंक कॉपी आणि करा तुमच्या फेसबुक वर पेस्ट आणि preview लोड झाला रे झाला की काढून घ्या लिंक, तर बघा पोस्ट होते का तर..

ते सर्व ठीक आहे, पण आता मला सांगा की तुम्हाला माझ्या पोस्ट आवडतात की नाही, ते मला कमेंट मध्ये कळू द्या, तुमच्या कमेंट्स मुळे मला वेगळाच हुरूप येतो,

                                धन्यवाद.

वाचा: ऍटीट्युड मराठी कॅप्शन्स । Attitude marathi status | attitude marathi shayari

Sharing Is Caring:

Leave a Comment