जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी का साजरा केला जातो? | जागतिक महिला दिन माहिती

आंतरराष्ट्रीय महिला दिन

जागतिक महिला दिन: 8 मार्च रोजी तुम्हीसुद्धा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याच्या तयारीत गुंतले असाल.  आत्तापर्यंत काही लोकांना मेसेज करून तुम्ही शुभेच्छा दिल्या असाव्यात आणि काही खास लोकांना कॉल करून त्यांचे अभिनंदनही तुम्ही केले असेल.

पण तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो आणि हा साजरा करण्यास कधीपासून सुरूवात झाली?  हा खरोखर एखादा समारंभ आहे की अजून काहीतरी वेगळे….बघूया या पोस्टमध्ये.

वर्षानुवर्षे जगभरातील लोक आजच्या दिवशी महिला दिन साजरा करत करतात, परंतु हे सर्व कसे सुरू झाले?

वाचा: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | womens day quotes in marathi

महिला दिन कधी सुरू झाला?

जागतिक महिला दिन

वास्तविक आंतरराष्ट्रीय महिला दिनाने एका कामगार चळवळीपासून जन्म घेतला आणि याची पायाभरणी 1908 साली झाली जेव्हा न्यूयॉर्क शहरातील 15 हजार महिलांनी मोर्चा काढला आणि नोकरीसाठी कमी तासांची मागणी केली.

याशिवाय त्यांना चांगले वेतन दिले जावे व मतदानाचा हक्कही द्यावा अशी त्यांची मागणी होती.  एका वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला

आंतरराष्ट्रीय बनवण्याची कल्पना कोठून आली?

mahila din marathi quotes

ही कल्पना फक्त एका महिलेची होती.  1910 मध्ये कोपेनहेगन येथे काम करणाऱ्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सुचविले.  त्यावेळी या परिषदेत 17 देशांतील 100 महिला उपस्थित होत्या.  त्या सर्वांनी या सूचनेचे समर्थन केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये 1911 साली साजरा करण्यात आला.  परंतु तांत्रिकदृष्ट्या या वर्षी आपण 110 वा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करीत आहोत.

1975 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने थीमसह हा उत्सव साजरा करण्यास सुरवात केली तेव्हा महिला दिन अधिकृतपणे ओळखला गेला.  आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पहिली थीम होती- ‘Celebrating the past, planning for the future’.

पण फक्त 8 मार्चलाच का?

 हा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण झाला असेल की आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो?  वास्तविक, क्लारा झेटकिनने महिला दिन साजरा करण्यासाठी तारखेची पुष्टी केली नाही.

 1917 मध्ये युद्धाच्या वेळी रशियन महिलांनी ‘ब्रेड अँड पीस’ (म्हणजे अन्न आणि शांतता) मागितली.  महिलांच्या संपामुळे सम्राट निकोलस यांना पायउतार व्हावे लागले आणि अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा हक्क दिला.

त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन दिनदर्शिका वापरली जात असे.  महिलांनी हा संप सुरू केल्याची तारीख 23 फेब्रुवारी होती.  ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये हा दिवस 8 मार्चचा होता आणि तेव्हापासून 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरवात झाली.

आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात कसा साजरा केला जातो?

बर्‍याच देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते.  रशिया आणि इतर बर्‍याच देशांमध्ये फुलांची किंमत आजच्या दिवसात बरीच वाढते.  या दरम्यान महिला आणि पुरुष एकमेकांना फुले देतात.

चीनमधील बहुतांश कार्यालयांमध्ये महिलांना अर्ध्या दिवसाची रजा दिली जाते.  अमेरिकेत मार्च महिना हा महिलांचा इतिहास महिना म्हणून साजरा केला जातो.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…..

स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे प्रेम स्त्री म्हणजे विश्वास स्त्री म्हणजे माया स्त्री म्हणजे उत्पत्ती. एकाचवेळी ती किती भूमिका  साकारत  असते ती आई ती बहीण ती सखी ती पत्नी ती मुलगी अशा अनेक रूपात ती आपल्याला भेटते. सासर आणि माहेर ती दोन्ही घर जपत असते. इतरांसाठी झटता झटता स्वतः मात्र आतुन तुटत असते. 

चंदनापरी  झिजे सुगंध तीच्या मायेचा

पाठीशी आधार सदा असे तिच्या छायेचा  

आपल्या माणसांच्या प्रेमासाठी ती आयुष्य पणाला लावते मात्र जन्माला आल्यापासून  शेवटच्या श्वासापर्यंत सतत ती स्त्री असल्याची  तिला जाणीव करून दिली जाते. मुलगी म्हणजे परक्याच धन मुलगी म्हणजे बापाच्या  खांद्यावरच  ओझं असं म्हणत  म्हणत कधी तिला परकं केलं जात हे तीच तिलाच  कळत नाही.

मुलींनी  कोणते कपडे घालावेत  कस वागावं कस बोलावं  किती हसावं किती रडावं सगळं समाज ठरवणार  मात्र एका मुलानं कस वागावं काय करावं हे त्याच तोच ठरवणार. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तरी त्यात त्या मुलीलाच  दोषी  ठरवलं जात.जस मुलीला मुलगी असल्याची जाणीव करून दिली जाते तसेच मुलाला सुद्धा तू एक मुलगा आहेस आणि प्रत्येक स्त्रीचा आदर आणि रक्षण करणे तुझं कर्तव्य आहे ह्याची जाणीव प्रत्येक घरात करून दिली ना तर समाजात एकही बलात्कार होणार नाही .

 त्या  काळी सावित्रीबाईं फुलेंना  शिकवून  महात्मा  फुलेंनी  स्त्री शिक्षणाला  प्रोत्साहन तर दिल पण आज शिकून सवरून  शहाण्या झालेल्या सावित्रीच्या लेकींवर  होणारा अन्याय कोण थांबवणार? पूर्वीच्या  अशिक्षित स्त्री मध्ये आणि आजच्या सुशीक्षीत  स्त्री मध्ये खरच काही अंतर आहे का?आजही स्त्रीला तीच वागणूक मिळते जी पूर्वीच्या अशिक्षित स्त्रियांना दिली जायची, मग शिक्षणामुळे तिच्या जीवनात नेमका बदल तरी कोणता घडलाय? खरं तर शिक्षणाची खरी गरज ह्या रानटी  समाजाला आहे. खरी गरज आहे त्यांचे  विचार बदलण्याची  स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची . आजही स्त्रीला स्वतःच अस्तित्व आहे का हा वादाचा मुद्दा  ठरतो. मात्र तिला दुबळी समजणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्री एक प्रवाह आहे सळसळत्या चैतन्याचा तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केलात तरी प्रवाहाच्या  पुढे जाण तुम्हाला शक्य होणार नाही .

 आज कितीही प्रगती झाली असली तरी सगळ्याच घरी मुलींना मोकळीक  किंवा स्वतःच करिअर  स्वतः निवडायची  मुभा दिली जात नाही .एकीकडे कष्टाने  मुलीला मोठं करून शिकवणारे  आई वडील तर दुसरीकडे स्वतःच्या हाताने मुलीचा गळा घोटणारे  आई वडील आजही  इतकी विसंगती  आहे आपल्या समाजामध्ये. एकीकडे स्त्रियांची  प्रगती तर दुसरीकडे अधोगती.एकीकडे स्त्रीला देवी मानून  तिची पूजा केली जाते आणि दुसरीकडे तिच्यावर अत्याचार  केले जातात. मुलगी कितीही शिकली तरी ती दुबळीचं  ठरते कारण समाजाचा  तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाच नाही. ज्या दिवशी ह्या समाजाचे  बुरसट विचार संपतिल त्या दिवशी स्त्री खऱ्या अर्थाने  स्वतंत्र असेल. 

          अनादी तू अनंत तू  तूच आदि शक्ती 

         जननी जगतदात्री आम्ही करितो  तुझी भक्ती

                                                          स्नेहा शिंदे .

वूमन्स डे गिफ्ट

Fostelo Women's Style Diva Faux Leather Handbag (Large)

<खरेदी करा


Fostelo Women’s Style Diva Faux Leather Handbag (Large)

Sharing Is Caring:

Leave a Comment