हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी वनौषधी आणि फलाहार घ्या | हृदय मजबूत ठेवा

हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी वनौषधी आणि फलाहार

हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी…

हृदयविकार अन् प्रामुख्याने हृदयाला रक्त पुरविणाऱ्या मुख्य वाहिनीशी संबंधित कॉरनरी आर्टरीचा रोग सध्याच्या काळात घरात आढळतो. त्या मागची कारणे अनेक आहेत. विलासी किंवा चैनीचे जीवन खुर्चीवर बसून बैठे काम, रिमोट कंट्रोलचा वापर करून जागेवरूनच श्रमविरहीत जीवनचर्या, स्पर्धेच्या युगातील धावपळ, तणाव आणि दडपणात जीवनयापन इत्यादी गोष्टींमुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, गलेलठ्ठपणा यासारख्या व्याधी मागे लागतात.

यावरचा उत्तम उपाय म्हणजे, योगाभ्यास आ णि खालील काही गोष्टींचा प्रयोग करणे, त्यामुळे हमखास हृदयविकाराला दूर ठेवू शकाल.

वाचा: अंजीर: लहान फळ, मोठे फायदे! | अंजीर खाण्याचे 10 फायदे जे तुम्हाला माहित नसतील!

अर्जुन

हृदयरोगीसाठी एकमेव रामबाण औषधी म्हणजे अर्जुन अर्जुनच्या ताज्या सालीला सावलीत वाळवून त्याचे चूर्ण तयार करावे. २५० ग्राम दुधात २५० ग्राम पाणी मिसळून त्याला मंद आगीवर ठेवावे आणि त्यात चहाचा एक चमचा अर्जुनच्या सालीचे चूर्ण टाकून त्यास उकळावे. खूप उकळल्यावर पाणी आटून अर्धे दध राहिल्यावर मग त्यास शेगडीवरून खाली ठेवावे. सकाळी रिकाम्या पोटी हे एकदा प्राशन करावे. त्यानंतर दीड-दोन तास काहीही घेऊ नये. यामुळे हृदयातील शैथिल्य, वेगाची धडधड, सूज, हृदय वाढणे इत्यादी हृदयरोगांवर हे अत्यंत प्रभावी वनौषधी आहे.

हा आहार घ्या

हृदयविकारात बेदाणा. डाळिंब. आवळा, सफरचंद, द्राक्षं, लिंबाचा रस, शहाळ्याचे पाणी, गाजर, पालक, लसूण, कच्चा कांदा, बाळ हिरडा, बडीशोप, मेथी दाणा, मनुका, चणे आणि जयमिश्रीत कणकाची अनेक डाळी युक्त पोळी (मिक्सी रोटी) पॉलिशविरहीत तांदळाचे

आणि कमी स्निग्धता दुधाचे पदार्थ यांचे -सेवन करावे. जेवल्यानंतर वज्रासन करावे, थकवा वाटत असेल तर शवासन करावे. शाकाहारी भोजन, योगाभ्यास, अर्जुनची साल, आवळा, हिरडासारख्या औषधी मुळी आणि वनस्पती (जडी बुट्टी) यांच्या सेवनामुळे हृदयरोग दूर पळतात.

उच्च रक्तदाब – कांद्याचा रस

कांद्याचा रस आणि शुद्ध मध समान प्रमाणात मिसळून ते रोज दोन चमचे (दहा ग्राम) च्या प्रमाणात एकदा घेतल्यास उच्च रक्तदाबावर त्याचा हमखास फायदा होतो.

कांद्याचा रस रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराच्या झटक्याला अटकाव करतो. कांदा मनाच्या दुर्बलता किंवा नैराश्यासाठी (नव्हर्स सिस्टीम) टॉनिक आहे. त्यामुळे रक्त स्वच्छ होते. पाचनक्रिया वाढते, हृदयक्रिया सुधारते आणि अतिद्रेपासून बचाव होतो. तर मध शरीराला शांत करून रक्तवाहिन्यांची उत्तेजना कमी करते. त्याचे संकुचन करून उच्च रक्तदाब खाली आणण्याचे काम करते. मधाच्या सेवनामुळे हृदय सशक्त बनते. affic हृदयाच्या समस्त रोगांसाठी आवळा

आवश्यकतेनुसार वाळलेल्या आवळ्यावर कुटून दळून त्याचे बारीक चूर्ण तयार करावे आणि त्यात तेवढ्याच वजनाची दळलेली साखर मिसळून एखाद्या काचेच्या भांड्यात ठेवावे. रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे चूर्ण पाण्याबरोबर ग्रहण करत राहिल्यास काही दिवसातच त्याचा फायदा दिसू लागेल. मुख्यत्वे हृदयाची धडधड, हृदयाची कमजोरी आणि चैतन्य शुन्यतेसारख्या व्याधीवर अत्यंत गुणकारी अद्भुत आणि चमत्कार घडविणारे हे फळ आहे.

आवळा हृदय वेगाने धाऊ लागणे, अनियमित हृदयगति होणे, हृदय संदावणे, हृदय बरोबर काम न करणे यामुळे वाढणारा उच्च रक्तदाब इत्यादींवर कुठलीही हानी होऊ न देता परिणाम साधणारे रामबाग औषधी फळ आहे. हे हृदयाला शक्तिमान बनवते. आवळ्याचे नियमित सेवन रक्तवाहिन्यांना मृदू आणि लवचिक बनविते. तसेच त्यांना कडक, जाड होण्यापासून परावृत्त करते.

वाचा: सोयाबीन खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे | सोयाबीन मधील पोषक मूल्ये

Sharing Is Caring:

Leave a Comment