कॉम्पुटर व्हायरस काय आहे? | पहिला व्हायरस कुठून आला होता? | What is computer virus | first virus Where did it come from? | Marathi | मराठी

जसे की प्राण्यांमध्ये एखाद्या माध्यमातून विषाणू पसरतात आणि एका आजारी प्राण्यापासून दुसर्यापर्यंत त्याचा प्रसार होतो आणि इतर प्राण्यांनासुद्धा त्याची लागण होते, काही व्हायरस तर इबोला, कोरोना इतके माणसासाठी जीवघेणे असतात.
संगणकातील व्हायरस सुद्धा अशाचंप्रकारे संपूर्ण संगणकाला उध्वस्त करू शकतो किंवा संगणकाचे नुकसान करू शकतो त्यासाठीच संगणकामध्ये अँटीव्हायरस असणे खूप गरजेचे असते.

संगणक व्हायरस बद्दल सविस्तर👇

संगणक व्हायरस एक प्रोग्राम आहे जो आपल्या संगणकावर स्वयंचलितपणे प्रवेश करतो, संगणकात त्याचा प्रवेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इंटरनेट. आजच्या जगात इंटरनेटचा वापर खूप केला जात आहे आणि अशा परिस्थितीत संगणकात व्हायरस येण्याचा धोकाही झपाट्याने वाढत आहे.

हेही वाचा: कीबोर्ड शॉर्टकट्स
जेव्हा आपला संगणक खूप हळू कार्य करतो किंवा एखादे फोल्डर किंवा सॉफ्टवेअर उघडण्यासाठी अधिक वेळ घेतो, तेव्हा आपण हे समजले पाहिजे की आपल्या संगणकाचा एक मोठा भाग व्हायरसने पकडला आहे. यानंतर, आपला संगणक हळूहळू हँग होऊ लागतो आणि अशा काही फायली किंवा फोल्डर्स दिसू लागतात जे तुम्ही कधी बनवलेलेच नाहीत.
हे देखील वाचा: संगणक आणि त्याचे महत्त्व
हेही वाचा: मायक्रो सॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?
संगणक व्हायरसचे बरेच प्रकार आहेत, परंतु ते प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभागले जातात.
1. बूट सेक्टर
2. फाइल सेक्टर
3. मॅक्रो सेक्टर
जगातील पहिला संगणक व्हायरस BRAIN हा होता, जो ऑपरेटिंग सिस्टममधील फ्लॉपी डिस्कद्वारे पसरायचा. हा व्हायरस संगणकाच्या फ्लॉपी बूट सेक्टरला व्हायरस कॉपीने रिप्लेस करायचा आणि वास्तविक बूट सेक्टरला काही चुकीच्या जागी ठेवायचा या व्हायरस ने प्रभावित डिस्कचे क्षेत्र सुमारे 5 किलोबाईट नंतर सेक्टर व्हायचे. हा व्हायरस येताच डिस्क चे ओरिजनल लेबल बदलून आपोआप ©Brain व्हायचे आणि त्यानंतर काही अनावश्यक संदेश येऊ लागायचे हा व्हायरस फ्लॉपी डिस्कची गती कमालीची हळू करायचा DOS ची सुमारे सात किलोबाइट मेमरी काढून टाकायचा.
हेही वाचा: संगणक फंक्शन बटणाची माहिती
हा व्हायरस पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तयार झाला होता. हा व्हायरस दोन भावांनी मिळून तयार केला होता. अमजद फारूक अल्वी आणि बाजित फारूक अलवी असे त्त्या दोघांचे नाव होते. नंतर, त्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सॉफ्टवेअरला पायरेसी पासून वाचवण्यासाठी हा व्हायरस विकसित केला होता.
Sharing Is Caring:

Leave a Comment