एका सिम च्या मोबाइल मध्ये दोन सिम आणि मेमरीकार्ड कसे वापरावे | how to use dual sim and memory card in hybrid mobile | मराठी

फोन घेतांना सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे हायब्रीड सिम स्लॉट असलेले मोबाईल, म्हणजे एखादा मोबाईल आवडत असूनही फक्त या एका कारणामुळे आपण घेत नाही, आणि तुम्ही हुकून चुकून हायब्रीड सिम स्लॉट चा मोबाईल घेतलेलाच असेल तर डोक्याला हात लावून बसू नका, कारण आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे.

1.पहिला पर्याय.

तुम्ही मोबाईल सोबत काहीच प्रयोग करू इच्छित नसाल तर हा पहिला पर्याय तुमच्यासाठी उपयोगी ठरेल कारण यात तुम्हाला फक्त मोबाईल च्या दुकानात जाऊन “एक दुहेरी सिम कार्ड अडॉप्टर”(Dual SIM card adapter) खरेदी करावे लागेल आणि ते मोबाईल दुकानदाराकडून मोबाईल ला जोडून घ्यावे लागेल पण हे करताना तुम्हाला तुमचे मेमरी कार्ड त्या फोन साठी निश्चित करावे लागेल(जर तुम्ही अडॅप्टर स्वतः जोडू शकत असाल तर मेमरी कार्ड निश्चित करण्याची आवश्यकता नाही)

अडॅप्टर जोडल्यावर तुम्ही तुमच्या हायब्रीड मोबाईल मध्ये दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकाच वेळी चालवण्यात सक्षम आहात।

  • 2.पर्याय दुसरा

हा पर्याय माझ्यासारख्या मोबाईल वर प्रयोग करणाऱ्यांसाठी आहे, कारण यामध्ये तुम्हाला सिम कार्ड मधील चिप काढायची आहे ।

चिप काढण्यासाठी सिम कार्ड ला आजूबाजूने थोडेसे गरम करा सिमकार्ड चे प्लास्टिक थोडेसे गरम होत आल्यावर चिप काढून घ्या, चिप काढल्यानंतर जर चिप ची मागील बाजू जास्त जाड असेल तर किंचित घासून घ्या जे ने करून ती चिप मेमरी कार्ड वर बसेल, घासताना एक काळजी घ्या की त्यामधील यंत्रणेला धक्का लागणार नाही।

त्यानंतर ती चिप मेमरी कार्ड वर बसवून घ्या बसवताना सिम अश्याप्रकारे बसवा की एकाच पॉईंट वर फेवीक्विक लावा म्हणजे काढायचे असल्यास परत काढता येऊ शकेल.

धन्यवाद.

Sharing Is Caring:

Leave a Comment