म्हणजे शाळेत केली जाणारी शिक्षा आपल्या शरीरासाठी लाभदायक होती। उठबश्या म्हणजेच Superbrain Yoga

मित्रांनो तुम्ही शाळेत मुलांना कान धरून उठा बश्या काढतांना बघितलं असेलच, बरोबर
तस बघायला गेलं तर अजून बऱ्याच प्रकारच्या शिक्षा आहेत पण त्यातल्यात्यात ही शिक्षा प्रसिद्ध आणि काही वेगळी आहे ,
हि पद्धत काही लोक तमीलनाडू मध्ये ,पुलेयर गणपती मंदिरात पाया पडतांना सुद्धा करतात,त्याला टोपकरणमं असं म्हणतात ,
हि फार जुनी प्राचीन गुरुकुल पद्धत आहे ,ह्यात डावा हात उजव्या कानाला आणि उजवा हात डाव्या कानाला धरून उठाबश्या काढायला लावतात,
हि पद्धत आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असते ,आपल्या कानाच्या आजूबाजूस काही बिंद्दु असतात जे दाबल्यावर मेंदूचा एक भाग ज्याला हिपोकॅम्पस मेजर असं म्हणतात तो सक्रिय होतो जो स्मरणशक्ती वाढावतो ,कानाला पकडणं हे acupuncture सारखं आहे आणि उठाबशा काढल्याने 
रक्तप्रवाह पायापासून मेंदू पर्यंत वेगाने होऊ लागतो,प्रचंड ऊर्जा मज्जातंतू मधून वाहू लागते, पूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो ,
हि पद्धत आपल्या भारताच्या संस्कृतीची आहे पण आपण तिला ओळखू शकलो नाही ,भारता बाहेर हीच प्रथा “सुपर ब्रेन योगा” या नावाने प्रचलित आहे ,
बरेचशे डॉक्टर ,टीचर ,हेल्थ कॅन्सल्टंट आपल्या हॉस्पिटल,शाळेत आणि सेमिनार्स मध्ये शिकवतात ,या प्रथेचा बराच शोध घेतला आणि सकारात्मक निकाल आले,
हि पद्धत प्रत्येक वयोगटावर सामान लाभदायक आहे,
जी मूलं ,मोठी माणसं मानसिक आणि शारीरिक अस्थिर होती त्यांच्याकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला,
“सुपर ब्रेन योगा” हा ऑटिस्टिक मुलांना सुधा फार उपयोगी ठरतो,
म्हणून आपल्या भारतीय पद्धती मध्ये ज्या प्रथा, लोक त्याला जुन्या रूढी म्हणतात त्या आपल्या शरीरासाठी मनासाठी उपयुक्त आहेत त्या वापरा ,स्वस्थ आणि आनंदी राहा.
Sharing Is Caring:

Leave a Comment