ब्लॉग म्हणजे काय | What is Blog | blogging and Blogger | Marathi | मराठी |

blog mhanje kay in marathi

ब्लॉग म्हणजे काय : – Blog (short form web blog) एक ऑनलाइन डायरी आहे जी वारंवार अद्ययावत केली जाते आणि जी सर्वसामान्य लोक सुद्धा लिहू शकतात. सुरुवातीच्या काळात, वेगळ्या Activity किंवा विचार मांडण्यासाठी  वेबब्लॉग लिहिले गेले आणि ते इंटरनेटवर प्रकाशित केले गेले.

ब्लॉगिंग ची सुरुवात 


सामान्यतःब्लॉग्स ना त्यांच्या formats नेच परिभाषित केलं जातं, ब्लॉग पोस्ट्स उलट-कालक्रमानुसार पोस्ट केल्या जातात म्हणजे सगळ्यात शेवटी लिहिलेली पोस्ट हि सर्वात वर असते. कोणत्याही ब्लॉगमध्ये माहिती विशिष्ट विषयावर गोळा करुन पोस्ट केली जाते किंवा आपापल्या आवडीचे विषय निवडून लेखकही माहिती पोस्ट करतात. अशा प्रकारे एक ब्लॉग हा ब्लॉगर किंवा लेखक / लेखकांच्या विचारांची, मते आणि अनुभवांची नियमित नोंद आहे, जो इंटरनेटवर संघटित पद्धतीने अद्ययावत केली जाते . त्याचसाठी वापरल्या जातात ब्लॉगर आणि वर्डप्रेस सारख्या कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टिम्स ज्यामध्ये ब्लॉग लिहिणाऱ्याला लिहिण्यासाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा किंवा टूल्स दिले जातात ज्यांचा उपयोग करून लकाकी एक उत्तम प्रतीचा ब्लॉग लिहू शकतो. सुरवातीला ब्लॉगिंगद्वारे लोक फक्त आपल्या दैनंदिन जीवनाविषयी लिहायचे पण आता तसे राहिले नाही, आता अनेक लोक ब्लॉग लिहून पैसे कमवत आहेत , त्यांनी या क्षेत्रातल्या संधी ओळखून त्यावर कामसुद्धा चालू केले आहे. 

Sharing Is Caring:

Leave a Comment