युट्यूबवर गेम खेळून पैसे कसे कामावतात? | How to earn money by playing games | Marathi | मराठी

Game खेळून सुद्धा लोक पैसे कमावतात हे तुम्हाला माहीत आहे का? सर्व युट्युबर्स जे त्यांच्या चॅनेल्स वर गेम खेळताना दाखवतात त्यांना त्यांचे चाहते superchat च्या माध्यमातून पैसे पाठवतात, आणि त्यांचं live stream संपल्यावर जे लोक त्यांचा विडिओ उशिरा पाहतात त्यावर युट्युब द्वारे जाहिराती दाखवल्या जातात अश्याप्रकारे युट्युब वर गेम stream करून दुहेरी कमाई केली जाऊ शकते, 
त्यासाठी आपल्याला youtube वर गेम कसा stream करायचा हे माहीत असायला हवे त्यासाठी हा लेख मी लिहीत आहे कृपया पूर्ण वाचावा.
youtube वर game stream करणे तसे तर सोपे आहे पण हे पहील्यांदा करण्यासाठी एका चांगल्या गाईड ची गरज पडतेच आपण आता स्टेप बाय स्टेप मोबाईल वरून युट्युब वर गेम stream करणे शिकूया.
पहिली स्टेप : सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोर वरून Omlet Arcade हे app play store मधून डाउनलोड करा आणि ओपन करून create account वर क्लिक करून तुमचे अकाउंट बनवून घ्या
दुसरी स्टेप : आता खाली तुम्हाला जे अधिक च चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा 
तिसरी स्टेप : + च्या चिन्हावर क्लिक केल्यावर  तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यातून Go Live हा पर्याय निवडा
चौथी स्टेप : Go Live वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये असणारे गेम्स दाखविले जातील 
पाचवी स्टेप : तुम्हाला जो गेम live stream करायचा आहे तो निवडल्यावर आता तुम्हाला गेम कोणत्या platform म्हणजे youtube, facebook कुठे stream करायचा आहे ते विचारले जाईल, तुम्हाला फेसबुक वर गेम stream करायचा असेल तर facebook logo वर क्लिक करा आणि जर युट्यूब वर stream करायचा असेल तर युट्युब icon वर क्लिक करा.
सहावी स्टेप : आता युट्युब किंवा फेसबुक जे तुम्ही select केलं आहे त्या तुमच्या अकाउंट सोबत तुम्हाला लॉगिन करून घ्यावे लागेल
सातवी स्टेप : आता next क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या गेम video चे title आणि वर्णन द्यायचे आहे 
आठवी स्टेप : आता next क्लिक केल्यावर तुमची stream चालू होईल.
Sharing Is Caring:

Leave a Comment