ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात? | How to earn money by writing blog

ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात

ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात

ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात: तुम्ही  नऊ ते पाच जॉब करताय किंवा त्यासारखंच एखाद वेळेचं बंधन असणारं काम करताय पण तुम्हाला हवी तशी मजा त्या कामात येत नाही, किंवा तुम्ही ते काम नाईलाजाने करत आहात आणि आता तुम्हाला तुमच्या कमाईला अजून थोडासा हातभार लावेल असं काहीतरी हवं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही चांगले लिहू पण शकता तर…  आता विचार करा ब्लॉगिंग व्यवसाय तुमचीच वाट पाहत आहे आणि तुमच्या सारख्या नवीन काहीतरी लिहीणाऱ्या व्यक्तींची इंटरनेटला गरज आहे, आणि अजून गमतीची गोष्ट  म्हणजे यात काहीच गुंतवणूक नसते फक्त लिहायचं आणि  तुमचं  लिखाण लोकांना आवडायला लागलं तर लगेच तुमच लेखन आवडणारा एक स्वतंत्र वर्ग तयार होतो आणि मग काय जेवढी ऑनलाईन गर्दी तुमच्या ब्लॉग वर होईल त्यातूनच तुमची कमाई सुरु होते.

जर तुम्ही त्या लोकांपैकी आहेत जे स्वतःचे जीवन आपल्या हिशोबाने जगू इच्छितात तर हे गाईड खास तुमच्यासाठी आहे , बरेचसे लोक छान लिहितात पण आपले लिखाण लोकांपर्यंत कसे पोहचवले पाहिजे हे त्यांना माहित नसतं, आणि ज्यांना हे माहित असत, त्यांना त्या ब्लॉगच्या  माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो हे माहित नसतं, जे लोक लिहितात आणि ज्यांना ब्लॉगिंग शिकायची अशी इच्छा आहे ते लोक ब्लॉगिंग शिकणार नाही तर ते स्वतःचा बॉस बनायला शिकणार आहेत आपल्या या मराठमोळ्या वेबसाईट वर.

Part 1: Google Adsense (ब्लॉगर्स साठी जणू देवचं)

गुगल ऍडसेन्स हे खूप लोकप्रिय माध्यम आहे ब्लॉगमधून पैसे कमावण्यासाठी हि एक गुगल ची ऍड पुरवणारी सर्व्हिस आहे यामध्ये आपण एखाद्या पब्लिशर प्रमाणे असतो यात आपल्याला काही करावं लागत नाही, लोक आपल्या ब्रँड ची जाहिरात करण्यासाठी गुगल कडे जातात आणि गुगल त्या लोकांची ऍड आपल्या ब्लॉगवर लावून आपल्या ब्लॉग वर येणाऱ्या त्या गर्दीपर्यंत पोहचवते आणि त्या ऍड वर झालेल्या क्लिक च्या माध्यमातून आपण पैसे कमवतो. गुगल या कमाईतील काही भाग आपल्याला देऊन काही स्वतः ठेवते.

ब्लॉगिंग सुरु करताना लक्षात ठेवण्यासाराखी गोष्ट

ब्लॉगिंग हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावर लिहून तुमचे स्वतःचे प्रेक्षक तयार करू शकता पण फक्त पैश्यासाठी सुरु केलेले ब्लॉग्स कधीच टिकत नाहीत कारण ज्या गोष्टीत रस नसतो ती कधी ना कधी पुढे चालून कंटाळवाणी वाटायला लागते आणि परिणामी आपण ती गोष्ट करणे  सोडून देतो कारण आपल्याला त्यातून तर आनंद मिळताच नव्हता पण जर  पैसे हि मिळत नसतील तर..

पण जो माणूस आवडीचा विषय लिहितो आणि त्याला लिहायला आवडते त्याला पैसे हे दुसरी प्राथमिकता असते पण लिहिण्यामध्ये आनंद मिळतो म्हणून तो लिहीत असतो आणि तोच माणूस सतत लिहू शकतो आणि त्याचाच ब्लॉग चालण्याचे चान्सेस जास्त असतात.

खालील ब्लॉगिंग विषयीच्या पोस्ट वाचा :

Sharing Is Caring:

Leave a Comment