Hanuman chalisa in marathi | हनुमान चालीसा मराठी अर्थासहित

marathi hanuman chalisa
Hanuman chalisa marathi
त्रेतायुगात संपूर्ण राक्षस कुळाचा नाश करून रामराज्याची स्थापना केल्यावर प्रभू श्री राम आपल्या लीला सहकाऱ्यांसह आपल्या निवासस्थानी येऊ लागले, त्यामुळे हनुमान आपल्या प्रभूशिवाय कसे राहू शकतील, पण रामनामाचा प्रचार, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे दमन यासाठी प्रभू श्रीरामांनी श्री हनुमानांना कलियुगात पृथ्वीवरच राहण्याची आज्ञा दिली. कलियुगाच्या प्रारंभी, भगवान शिव आणि पार्वतीने सज्जनांचे, लुटारू आणि अधर्मी लोकांपासून संरक्षण करण्यासाठी अवधी भाषेत रामचरितमानस आणि हनुमानचालिसा रचले.


    हनुमान चालिसाचे चमत्कारिक श्लोक | hanuman chalisa benefits in marathi

    रामचरितमानस आणि हनुमान चालिसाची प्रत्येक चौपई भगवान शिवाने रचलेली शाबर मंत्र आहे. ज्याच्या पठणाने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. काही लोक फक्त त्याची घोकंपट्टी करतात किंवा अर्थ ना समजून घेता वाचतात, त्याचा अर्थ समजून मनापासून वाचला तर त्याचा प्रत्येक चौपाई हि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणारी असते. त्यासाठीच आपण आज hanuman chalisa marathi lyrics याचा अर्थ marathi hanuman chalisa मराठीत समजून घेणार आहोत,  हे लक्षात ठेवा की हनुमान हे पवन पुत्र आहेत, म्हणजे जो वारा सदैव तुमच्याभोवती असतो. हनुमान चालिसाच्या या दोहे आणि चौपाईंचे पठण भक्तिभावाने करा, श्री हनुमान तुमच्या मदतीसाठी वाऱ्याच्या रूपात तुमच्यासोबत नेहमी आहेत.

    Marathi hanuman chalisa | हनुमान चालीसा मराठी अर्थासहित

    दोहा :

    श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि |
    बरनऊँ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि || 

    अर्थात :-"श्रीगुरु महाराजांच्या चरणकमळांच्या धुळीने माझ्या मनाचा आरसा शुद्ध करून, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चारही फळे देणारे श्री रघुवीर यांच्या शुद्ध कीर्तीचे मी वर्णन करतो."

    बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन-कुमार |
    बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार ||

    अर्थ :- “हे पवनकुमार ! मी तुमचे स्मरण करीत आहे, माझे शरीर आणि मन कमकुवत आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला शारीरिक शक्ती, बुद्धी आणि द्यावे  आणि माझ्या दु:खाचा आणि दोषांचा नाश  करावा.

    चौपाई :

    जय हनुमान ज्ञान गुण सागर,
    जय कपीस तिहुँ लोक उजागर॥1॥

    अर्थ :- “श्री हनुमान जी! तुम्हाला नमस्कार असो. तुमचे ज्ञान आणि गुण अगाध आहेत. हे कपीश्वर ! तुम्हास नमस्कार असो! स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती आहे.

    राम दूत अतुलित बलधामा,
    अंजनी पुत्र पवन सुत नामा॥2॥

    अर्थ :- ''हे पवनसुत अंजनी नंदन ! तुमच्यासारखा बलवान कोणी नाही.

    महावीर विक्रम बजरंगी,
    कुमति निवार सुमति के संगी॥3॥

    अर्थ :- “हे महावीर बजरंगबली! तुम्ही विशेष पराक्रमी आहेस. तुम्ही कुबुद्धी  दूर करता, आणि चांगली बुद्धी असलेल्यांचा साथ देता .

    कंचन बरन बिराज सुबेसा,
    कानन कुण्डल कुंचित केसा॥4॥

    अर्थ :- "तुम्ही  सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानातले कुंडल आणि कुरळे केस यांनी सुशोभित आहात."

    हाथ ब्रज और ध्वजा विराजे,
    काँधे मूँज जनेऊ साजै॥5॥

    अर्थ :- "तुमच्या हातात वज्र आणि ध्वज आहे आणि तुझ्या खांद्यावर मूंजच्या जनेऊचे सौंदर्य आहे."

    शंकर सुवन केसरी नंदन,
    तेज प्रताप महा जग वंदन॥6॥

    अर्थात :- "हे शंकराचे अवतार! हे केसरी नंदन, तुझे पराक्रम आणि महान कीर्तीचे जगभर वंदन केले जाते."

    विद्यावान गुणी अति चातुर,
    राम काज करिबे को आतुर॥7॥

    अर्थ :- "तुम्ही एक विशाल विद्यावान आहात, प्रतिभावान आहात आणि अत्यंत कार्यक्षम असल्याने, श्री राम कार्य करण्यास सदैव उत्सुक आहात ."

    प्रभु चरित्र सुनिबे को रसिया,
    राम लखन सीता मन बसिया॥8॥

    अर्थ :- “श्रीरामाचे चरित्र ऐकून आपणास आनंद होतो.श्रीराम,सीता आणि लक्ष्मण तुमच्या हृदयात वास करतात.”

    सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा,
    बिकट रूप धरि लंक जरावा॥9॥

    अर्थ :- "तुम्ही माता सीतेला तुमचे छोटे रूप दाखवले आणि लंका उग्र रूपाने जाळून टाकली."

    भीम रूप धरि असुर संहारे,
    रामचन्द्र के काज संवारे॥10॥

    अर्थ :- "तुम्ही भयंकर रूप धारण करून राक्षसांचा वध केला आणि श्री रामचंद्रजींचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले."

    लाय सजीवन लखन जियाये,
    श्री रघुवीर हरषि उर लाये॥11॥

    अर्थ :- "तुम्ही लक्ष्मणजींना संजीवनी वनौषधी आणून जिवंत केले, त्यामुळे श्री रघुवीरांनी तुम्हाला आनंदाने आलिंगन दिले."

    रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई,
    तुम मम प्रिय भरत सम भाई॥12॥

    अर्थ :- "श्री रामचंद्रांनी तुमची खूप स्तुती केली" आणि सांगितले की "तू माझ्या भरतासारखा प्रिय बंधू आहेस."

    सहस बदन तुम्हरो जस गावैं,
    अस कहि श्री पति कंठ लगावैं॥13॥

    अर्थ :- "श्रीरामांनी तुमची कीर्ती हजार मुखांनी प्रशंसनीय आहे असे सांगून तुम्हाला हृदयास लावले."

    सनकादिक ब्रह्मादि मुनीसा,
    नारद, सारद सहित अहीसा॥14॥

    अर्थात :-"श्री सनक, श्री सनातन, श्री सनंदन, श्री सनतकुमार आदी मुनी ब्रह्मा आदी  देव नारदजी, सरस्वतीजी, शेषनागजी सर्व आपली स्तुती करतात."

    जम कुबेर दिगपाल जहाँ ते,
    कबि कोबिद कहि सके कहाँ ते॥15॥

    अर्थ :- "यमराज, कुबेर इत्यादि सर्व दिशांचे रक्षणकर्ते, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही तुमची कीर्ती पूर्णपणे वर्णन करू शकत नाही."

    तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा,
    राम मिलाय राजपद दीन्हा॥16॥

    अर्थात :- "तुम्ही प्रभू श्रीरामांसोबत  भेट घालून सुग्रीव यांच्यावर  उपकार केलेत, त्यामुळे ते राजा झाले."

    तुम्हरो मंत्र विभीषण माना,
    लंकेस्वर भए सब जग जाना॥17॥

    अर्थात :- "सर्व जगाला माहित आहे की विभीषणजींनी तुमच्या उपदेशाचे पालन करून ते लंकेचे राजा झाले."

    जुग सहस्त्र जोजन पर भानू,
    लील्यो ताहि मधुर फल जानू॥18॥

    अर्थात :- “जो सूर्य इतक्या योजनांच्या अंतरावर आहे की त्याला पोहोचायला हजार युगे लागतात. दोन हजार योजनांच्या अंतरावर असलेल्या सूर्याला तुम्ही गोड फळ समजून गिळून टाकले."

    प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि,
    जलधि लांघि गये अचरज नाहीं॥19॥

    अर्थ :- "श्री रामचंद्रजींची अंगठी तोंडात ठेऊन तूम्ही समुद्र पार केला, त्यात आश्चर्य नाही."

    दुर्गम काज जगत के जेते,
    सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥20॥

    अर्थात :- "जगातील सर्व कठीणात कठीण कामे, तुमच्या कृपेने सुलभ होतात."

    राम दुआरे तुम रखवारे,
    होत न आज्ञा बिनु पैसारे ॥21॥

    अर्थात :- "तुम्ही श्री रामचंद्रजींच्या द्वाराचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाही, म्हणजेच तुमच्या आनंदाशिवाय, प्रभू श्रीरामांची कृपा दुर्लभ आहे."

    सब सुख लहै तुम्हारी सरना,
    तुम रक्षक काहू को डरना ॥22॥

    अर्थात :- "जो तुमचा आश्रय घेतो, त्या सर्वांनाच आनंद मिळतो, आणि जेव्हा तू त्यांचा रक्षक असतोस तेव्हा कोणाची भीती नसते."

    आपन तेज सम्हारो आपै,
    तीनों लोक हाँक ते काँपै॥23॥

    अर्थात :- "तुमचा वेग तुमच्याशिवाय कोणीही थांबवू शकत नाही,तुमच्या गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात."

    भूत पिशाच निकट नहिं आवै,
    महावीर जब नाम सुनावै॥24॥

    अर्थात :-"ज्या ठिकाणी महावीर हनुमानजींचे नामस्मरण केले जाते, तेथे भूत आणि पिशाच्च जवळही येऊ शकत नाहीत."

    नासै रोग हरै सब पीरा,
    जपत निरंतर हनुमत बीरा ॥25॥

    अर्थात :- "वीर हनुमान जी! तुमचे अखंड नामस्मरण केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व वेदना नाहीशा होतात."

    संकट तें हनुमान छुड़ावै,
    मन क्रम बचन ध्यान जो लावै॥26॥

    अर्थात :- “हे भगवान हनुमान! विचारात, कृतीत आणि बोलण्यात तुमचे जे स्मरण करतात , त्यांना तुम्ही सर्व संकटांतून सोडवता.

    सब पर राम तपस्वी राजा,
    तिनके काज सकल तुम साजा॥27॥

    अर्थात :-"तपस्वी राजा श्री रामचंद्रजी श्रेष्ठ आहेत, त्यांची सर्व कामे तुम्ही सहज केलीत."

    और मनोरथ जो कोइ लावै,
    सोई अमित जीवन फल पावै॥28॥

    अर्थात :- "ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न आहात, त्याने जर काही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते ज्याला जीवनात मर्यादा नाही."

    चारों जुग परताप तुम्हारा,
    है परसिद्ध जगत उजियारा॥ 29॥

    अर्थात :- सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग या चारही युगात तुमची कीर्ती पसरलेली आहे, तुमची  कीर्ती जगात सर्वत्र चमकत आहे.।”

    साधु सन्त के तुम रखवारे,
    असुर निकंदन राम दुलारे॥30॥

    अर्थात :- “प्रभू श्रीरामांना प्रिय असणारे ! तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांचा नाश करता.

    अष्ट सिद्धि नौ निधि के दाता,
    अस बर दीन जानकी माता॥31॥

    अर्थात :- "तुम्हाला माता श्री जानकीकडून असे वरदान मिळाले आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता."

    राम रसायन तुम्हरे पासा,
    सदा रहो रघुपति के दासा॥32॥

    अर्थात :- "तुम्ही सतत श्री रघुनाथजींच्या सानिध्यात आहात, त्यामुळे  तुमच्याजवळ वृद्धत्व आणि असाध्य रोगांच्या नाशाचे राम नावाचे औषध आहे."

    तुम्हरे भजन राम को पावै,
    जनम जनम के दुख बिसरावै॥33॥

    अर्थात :- "तुमच्या भजनाने प्रभू श्रीरामांची प्राप्ती होते आणि अनेक जन्मांचे दु:ख दूर होतात."

    अन्त काल रघुबर पुर जाई,
    जहाँ जन्म हरि भक्त कहाई॥ 34॥

    अर्थात :- "अखेरीस, आम्ही श्री रघुनाथजींच्या धामात जातो आणि जर आमचा पुनर्जन्म झाला तर श्रीरामाचे भक्त म्हणवले जाऊ."

    और देवता चित न धरई,
    हनुमत सेई सर्व सुख करई॥35॥

    अर्थात :- "हे हनुमान! तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, मग इतर कोणत्याही देवतेची गरज नाही."

    संकट कटै मिटै सब पीरा,
    जो सुमिरै हनुमत बलबीरा॥36॥

    अर्थात :- हे वीर हनुमान! जो तुमचे स्मरण करत राहतो, त्याचे सर्व संकट दूर होऊन सर्व दुःखे दूर होतात.

    जय जय जय हनुमान गोसाईं,
    कृपा करहु गुरु देव की नाई॥37॥

    अर्थात :- "हे स्वामी हनुमान! तुमचा जय हो, तुमचा जय हो, तुमचा जयजयकार असो! तुम्ही मला दयाळू श्रीगुरुंप्रमाणे आशीर्वाद द्या."

    जो सत बार पाठ कर कोई,
    छुटहि बँदि महा सुख होई॥38॥

    अर्थात :- "जो कोणी या हनुमान चालिसाचा शंभर वेळा पाठ करेल तो सर्व बंधनांतून मुक्त होऊन सुखाची प्राप्ती करेल."

    जो यह पढ़ै हनुमान चालीसा,
    होय सिद्धि साखी गौरीसा॥ 39॥

    अर्थात :- "भगवान शंकरांनी ही हनुमान चालीसा लिहून घेतली आहे, म्हणून जो कोणी तिचा पाठ करेल त्याला नक्कीच यश मिळेल."

    तुलसीदास सदा हरि चेरा,
    कीजै नाथ हृदय मँह डेरा॥40॥

    अर्थात :- "हे नाथ हनुमान! तुलसीदास हे सदैव श्री रामांचे सेवक आहेत. म्हणूनच तुम्ही त्यांच्या हृदयात वास करावा .

    टीप:- हनुमान चालिसाचे पठण करताना वरील चौपाई मध्ये तुलसीदासांच्या ऐवजी स्वतःच्या नावाचा उच्चार करावा. 

    दोहा :

    पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।

    राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभुप॥

    अर्थात :- “हे संकटमोचन पवनकुमार! तूं आनंद मांगल रूप । हे देवराज ! श्रीराम, सीताजी आणि लक्ष्मणासह तुम्हीसुद्धा माझ्या हृदयात वास करावा .

    हनुमान चलिसाचे पठन किती वेळा अणि कसे करावे?

    हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानाला समर्पित आहेत. या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने माणसाला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. अंजनीपुत्र हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते. असे मानले जाते की हनुमान चालिसाचे पठण हा हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे.

    असे मानले जाते की हनुमान चलिसाच्या पठणाने जीवनात येणाऱ्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. यासोबतच बजरंगबली प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. व्यक्तीला रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. परंतु त्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा व्यक्ती योग्य पद्धतीने आणि योग्य नियमाने हनुमान चालिसाचे पठण करते. आता आपण हनुमान चालिसाचे पठण किती वेळा आणि कसे करायचे ते जाणून घेऊया.

    हनुमान चालिसाचा पठण किती वेळा करावे ?


    हनुमान चालिसाचे पठण तेव्हाच शुभ आणि फलदायी ठरते जेव्हा ते योग्य पद्धतीने केले जाते. हनुमान चालिसाच्या एका ओळीत सांगितले आहे की,'जो शत बार पाठ कर कोई। छूटहि बंदि महा सुख होई'। म्हणजेच हनुमान चालिसाचे शंभर वेळा पठण केल्याने माणसाला प्रत्येक बंधनातून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे 100 वेळा पठण करावे. जर तुम्ही १०० वेळा करू शकत नसाल तर किमान ७, ११ किंवा २१ वेळा करावे .

    हनुमान चालीसा पठणाची योग्य पद्धत

    ज्योतिष शास्त्रानुसार बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करावा. त्यासाठी आंघोळ वगैरे नित्यक्रम करून घ्यावे. स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे पठण जमिनीवर आणि आसनावर बसूनच करावे. आसन न ठेवता पूजा करणे अशुभ मानले जाते. पठण सुरू करण्यापूर्वी श्री गणपतींना वंदन करावे  आणि भगवान श्रीरामाची पूजा करावी. यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे.

    हनुमान चालिसा पठण करण्याची योग्य वेळ

    जर तुम्हाला हनुमान यांना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे. पठण सुरू करण्यापूर्वी आंघोळ करून घ्यावी. जर तुम्ही संध्याकाळचे पठण करत असाल, तर हात पाय व्यवस्थित धुवून पठणास सुरूवात  करावी.

    marathi hanuman chalisa pdf | हनुमान चालीसा पडिएफ 
    hanuman chalisa in marathi download

    हनुमान चालिसा 559 KB

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या